16th August Headlines :  आज  दिवसभरात महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत. सामाजिक, राजकीय वर्तुळात महत्त्वाच्या घडामोडी होणार आहेत. आज, पारशी नववर्षाचा पहिला दिवस आहे. हा दिवस नवरोझ म्हणून देखील ओळखला जातो. पारशी समाजाचं नवं वर्ष ही नव्या पारशी वर्षाची/ कॅलेंडरची सुरूवात असते. अग्यारी या त्यांच्या धार्मिकस्थळाला भेट देऊन ते प्रार्थना करतात. देशाचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा आज स्मृतीदिन आहे. 



माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा स्मृतीदिन


माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचा आज स्मृतीदिन आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक नेते त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी त्यांच्या स्मृतीस्थळाला भेट देणार आहेत.



दिल्ली विधानसभेचे विशेष अधिवेशन 


दिल्ली विधानसभेचे विशेष अधिवेशन आजपासून सुरू होत आहे.  संसदेच्या दिल्ली सेवा विधेयकाच्या मंजुरीनंतर प्रथमच सत्र बोलवण्यात आले आहे. हे सत्र 16 आणि 17 ऑगस्ट 2023 या दोन दिवसांसाठी बोलवण्यात आले आहे. कामकाजाच्या अत्यावश्यकतेनुसार सभागृहाचा कालावधी वाढवला जावू शकतो. 


उद्धव ठाकरे यांच्याकडून लोकसभा निवडणुकीसाठी बैठकांचा धडाका


शिवसेना ठाकरे गटाचे (Shiv Sena UBT) पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याकडून लोकसभा निवडणुकांच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर आजपासून बैठका सुरू होणार आहेत. 16 ते 19 ऑगस्ट दरम्यान पहिल्या टप्प्यात एकूण 16 लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेतला जाणार आहे.


मुंबई-गोवा महामार्गासाठी मनसेचा निर्धार मेळावा 


मुंबई गोवा महामार्गप्रश्नी आता मनसे आक्रमक झाली आहे. जवळपास 17 वर्ष रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गाचे काम पूर्ण करण्यासाठी मनसे मैदानात उतरली आहे. पनवेल इथे मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) कोकणातील पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेणार आहेत. 
 


काँग्रेसच्या कोअर समितीची बैठक


काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेस पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक एमसीए क्लब वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स(BKC) येथे होणार आहे. या बैठकीत लोकसभा निवडणूक संदर्भात आढावा, राष्ट्रवादी पक्षाची भुमिका आणि विरोधकांची आघाडी 'इंडिया'च्या बैठकी संदर्भात चर्चा होणार आहे.
 


राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची बैठक


राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार (Ajit Pawar) गटाच्यावतीने पक्षांतर्गत आढावा घेण्यासाठी 'देवगिरी' बंगल्यावर बैठक बोलावण्यात आली आहे. बैठकीमध्ये संघटनात्मक आढावा घेण्यात येणार आहे. 


वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ घेणार ससून रुग्णालयात बैठक


पुणे - वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ हे ससून रुग्णालयात बैठक घेऊन रुग्णालयाच्या परिस्थितीचा आढावा घेणार