एक्स्प्लोर

देवेंद्र फडणवीस सरकार नाही, तर हे जनरल डायर फडणवीस सरकार आहे : सुप्रिया सुळे

या तरुणांच्या मागण्यांची सरकारने गंभीर दखले घेतली पाहिजे. तातडीने चर्चा करुन यावर तोडगा काढला पाहिजे. सरकारने लवकरात लवकर या तरुणांच्या मागण्यांकडे लक्ष न दिल्यास मी सुद्धा या तरुणांसोबत उपोषण करणार असल्याचा इशारा सुप्रिया सुळेंनी दिला.

पुणे : पुण्यात आपल्या न्याय हक्कासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून मूकबधिर तरुण जमले होते. मात्र या मूकबधिर तरुणांवर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचा प्रकार घडला आहे. या घटनेचा राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांना निषेध केला. तसेच घटनास्थळी जाऊन आंदोलनकर्त्या तरुणांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला.

सरकार असं असंवेदनशील वागू शकतं, याचा मला धक्का बसला आहे. हे देवेंद्र फडणवीस सरकार नाही, तर जनरल डायर फडणवीस सरकार आहे, अशी टीका सुप्रिया सुळेंनी केली. ज्यांना आवाज नाही त्यांच्यावर लाठीचार्ज करणे, ही महाराष्ट्रासाठी लाजिरवाणी गोष्ट आहे. महाराष्ट्रात असा प्रकार आजवर झालेला नाही आणि या घटनेचा मी निषेध करत असल्याचं सुप्रिया सुळेंनी म्हटलं.

VIDEO | कर्णबधिर मोर्चेकऱ्यांवर लाठीचार्ज, राष्ट्रवादी खासदार सुप्रिया सुळेंची सरकारवर टीका | पुणे | एबीपी माझा

<

आंदोलनकर्ते तरुण सकाळपासून उपाशी आहेत. निदान पाणी तरी प्या अशी विनंती सुप्रिया सुळेंनी या विद्यार्थ्यांना केली, मात्र त्यांनी नकार दिला. उद्या दिवसभर सुप्रिया सुळे या मुलांसोबत आंदोलनस्थळी असणार आहेत.

हा राजकीय प्रश्न नाही तर सामाजिक प्रश्न आहे. सातत्याने असंवेदनशील वागणाऱ्या सरकारचा अतिरेक झाला आहे. या तरुणांच्या मागण्या ऐकून घेण्यास सरकार तयार नाही. घटना घडल्यानंतर सरकारचा एकाही प्रतिनिधीने या आंदोलनकर्त्या तरुणांची भेट घेतली नाही. प्रचारासाठी गावभर फिरणाऱ्या सरकारच्या प्रतिनिधींकडे या आंदोलनकर्त्या तरुणांना भेटण्यास वेळ नसल्याचं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

या तरुणांच्या मागण्यांची सरकारने गंभीर दखले घेतली पाहिजे. तातडीने चर्चा करुन यावर तोडगा काढला पाहिजे. सरकारने लवकरात लवकर या तरुणांच्या मागण्यांकडे लक्ष न दिल्यास मी सुद्धा या तरुणांसोबत उपोषण करणार असल्याचा इशारा सुप्रिया सुळेंनी दिला.

पुण्यात समाज कल्याण आयुक्तालयासमोर आपल्या प्रलंबित मागण्यांकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून कर्णबधिर तरुण-तरुणी आज पुण्यात आले होते. मात्र आंदोलनकर्त्या तरुणांवर पोलिसांना लाठीचार्च करुन आंदोलन दडपडण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर सर्वच स्तरातन या घटनेचा निषेध होताना दिसत आहे.

VIDEO | देवेंद्र फडणवीस सरकार नाही, तर हे जनरल डायर फडणवीस सरकार आहे : सुप्रिया सुळे | पुणे | एबीपी माझा

महत्त्वाच्या बातम्या

मुख्यमंत्र्यांनी गोकुळमध्ये पोरकटपणा करायची गरज नव्हती, लोकशाहीने महायुतीचा पराभव, राजू शेट्टींचा हल्लाबोल  
मुख्यमंत्र्यांनी गोकुळमध्ये पोरकटपणा करायची गरज नव्हती, लोकशाहीने महायुतीचा पराभव, राजू शेट्टींचा हल्लाबोल  
Praful Patel Meet Sharad Pawar: ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये तातडीची भेट, त्यादिवशी शरद पवारांशी काय बोलणं झालं? प्रफुल पटेलांनी अखेर मौन सोडलं, म्हणाले...
ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये तातडीची भेट, त्यादिवशी शरद पवारांशी काय बोलणं झालं? प्रफुल पटेलांनी अखेर मौन सोडलं, म्हणाले...
ऊसाला 3600 भाव द्या, अन्यथा 1 लाख शेतकऱ्यांचा धडक मोर्चा, शेट्टींचा सोलापूर जिल्ह्यातील कारखानदारांना  इशारा 
ऊसाला 3600 भाव द्या, अन्यथा 1 लाख शेतकऱ्यांचा धडक मोर्चा, शेट्टींचा सोलापूर जिल्ह्यातील कारखानदारांना  इशारा 
जास्त काळ भाजपसोबत राहू नका, रोहित पवारांची एकनाथ शिंदेंना विनंती, म्हणाले सरकारचं  डोकं सटकलंय
जास्त काळ भाजपसोबत राहू नका, रोहित पवारांची एकनाथ शिंदेंना विनंती, म्हणाले सरकारचं  डोकं सटकलंय

व्हिडीओ

Raosaheb Danve Arjun Khotkar Jalna : कटुता 100 टक्के संपली, रावसाहेब दानवे - खोतकरांची फटकेबाजी
NCP Merger News : तटकरेंचा यू-टर्न, पुन्हा चर्चेत विलिनीकरण Special Report
Ameet Satam vs Shiv Sena : साटमांना आमंत्रण, वादाला निमंत्रण Special Report
Raju Shetti Andolan Kolhapur : 'उसाला द्या दाम' , हायवेवर चक्काजाम Special Report
Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
क्रेडिट कार्डवरील नो-कॉस्ट ईएमआय पूर्णपणे मोफत नाहीच, प्रोसेसिंग फी आणि 18 टक्के जीएसटीमुळे अतिरिक्त भार; खरेदी करण्यापूर्वी या 5 गोष्टी तपासा!
क्रेडिट कार्डवरील नो-कॉस्ट ईएमआय पूर्णपणे मोफत नाहीच, प्रोसेसिंग फी आणि 18 टक्के जीएसटीमुळे अतिरिक्त भार; खरेदी करण्यापूर्वी या 5 गोष्टी तपासा!
Jay Pawar : दिवाळी म्हणजे प्रकाशाचा सण; पण आमच्या आयुष्यातील खरा प्रकाश तुम्ही होता Dad, जय पवार यांनी अजितदादांच्या आठवणींना दिला उजाळा
दिवाळी म्हणजे प्रकाशाचा सण; पण आमच्या आयुष्यातील खरा प्रकाश तुम्ही होता Dad, जय पवारांची अजितदादांच्या आठवणीत भावनिक स्टोरी
Gold Rate : आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर 24 टक्क्यांनी तर भारतात 20 टक्क्यांनी कोसळले, फरक नेमका कशामुळं? भारतात सोनं उच्चांकावरुन 36700 रुपयांनी घसरलं
आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर 24 टक्क्यांनी कोसळले, भारतात सोनं 20 टक्क्यांनी स्वस्त, फरक कशामुळं? 
"राजू, काहीही कर, पण यंदा दिवाळीला फराळाला अंजनीत यायचंच!" राजू शेट्टी स्वर्गीय आरआर आबांच्या आईच्या भेटीला, लेकाच्या आठवणीत माऊलीच्या कडा पाणावल्या
Diwali : नरकचतुर्दशी आणि लक्ष्मीपूजनानिमित्त श्री विठ्ठलास व रूक्मिणी मातेस हिरेजडीत अलंकाराचा साज
नरकचतुर्दशी आणि लक्ष्मीपूजनानिमित्त श्री विठ्ठलास व रूक्मिणी मातेस हिरेजडीत अलंकाराचा साज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 नोव्हेंबर 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 नोव्हेंबर 2026 | रविवार
हौथींचा सौदी अरेबियावर क्षेपणास्त्र हल्ला, रियाधमधील तेल कंपनी अरामकोच्या इमारतीचे नुकसान, हवाई हल्ल्यानंतर प्रत्युत्तराचा इशारा
हौथींचा सौदी अरेबियावर क्षेपणास्त्र हल्ला, रियाधमधील तेल कंपनी अरामकोच्या इमारतीचे नुकसान, हवाई हल्ल्यानंतर प्रत्युत्तराचा इशारा
गेल्या 8 वर्षात प्रथमच मुहूर्त ट्रेडिंगवर घसरण! सेन्सेक्स 29 अंकांनी, निफ्टी 44 अंकांनी घसरून बंद; बँकिंग कंपन्यांच्या शेअर्समध्ये विक्री
गेल्या 8 वर्षात प्रथमच मुहूर्त ट्रेडिंगवर घसरण! सेन्सेक्स 29 अंकांनी, निफ्टी 44 अंकांनी घसरून बंद; बँकिंग कंपन्यांच्या शेअर्समध्ये विक्री
Embed widget