एक्स्प्लोर

भ्रष्टाचार होतो हे मंत्रीच कबूल करतायेत, सुळेंचा हल्लाबोल, म्हणाल्या, सरकारनं हार्वेस्टरमागे 8 लाख रुपये मागितले हे गंभीर

सरकारच घोटाळा झाल्याचे मान्य करत असल्याचे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केलं.

Supriya Sule : राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी 400 कोटी रुपयांचा पीक विमा घोटाळा झाल्याचे वक्तव्य केले आहे. तर सुरेश धस यांनी 5000 कोटींचा पीक विमा घोटाळा झाल्याचे म्हटले आहे. त्यामुळं हे सरकारच घोटाळा झाल्याचे मान्य करत असल्याचे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केलं. कोकाटे म्हणाले की, केंद्र सरकार महाराष्ट्राला निधी देत नाही तसेच 3 ते 5 टक्के भ्रष्टाचार होतोच असे सुळे म्हणाल्या. सरकारने हार्वेस्टरमागे 8 लाख रुपये मागितले हे गंभीर असल्याचे सुळे म्हणाल्या. भ्रष्टाचार होतो हे मंत्रीच कबूल करत आहेत. हे मी पार्लमेंट सेशनमध्ये मांडणार असल्याचं सुळे यांनी सांगितलं.

राज्यात कायदा सुव्यवस्था काही राहीली नाही

राज्यात कायदा सुव्यवस्था काही राहीली नाही. सरकारला दोन महिने झाले. ते 100 दिवसांचा प्रोग्राम देणार होते, आज 60 दिवस झाले आहेत, असे सुळे म्हणाल्या. इंदापूरवर अन्याय झाला आहे. पालकमंत्रीपद दिले नाही. मी सरकारला बोलणार आहे, असे म्हणत सुळे यांनी मंत्री दत्तात्रय भरणे यांना टोला लगावला. सरकार स्थापन होऊन 60 दिवस झाले तरी कोणतेच काम झाले नाही, अेही सुळे म्हणाल्या.  

 निवडणुकीच्या पारदर्शकतेवर प्रश्न

निधी नसल्यामुळं निरा भीमा नदी जोड प्रकल्प ठप्प आहे. निधी का मिळत नाही? असा सवाल सुळे यांनी केला. निधी नसल्यामुळं शेतकऱ्यांचा डीपी बसवला जात नाही, असेही सुळे म्हणाल्या. विधानसभा निवडणुकीत हर्षवर्धन पाटील यांच्या पराभवाला अनेक कारणं असल्याचे सुळे म्हणाल्या. उत्तम जानकर निवडून आले तरी त्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यामुळं मला निवडणुकीच्या पारदर्शकतेवर प्रश्न पडला असल्याचे सुळे म्हणाल्या. लोक बॅलेटवर निवडणुका घेण्याची मागणी करत आहेत. समाजात अस्वस्थता असेल तर लोकांच्या मागणीप्रमाणे बॅलेटवर निवडणुका घ्याव्यात असेही सुळे म्हणाल्या.  

सरकार खुनी लोकांना का लपवत आहे?

सुप्रिया सुळे जितेंद्र पवार रोहित पवार संदीप क्षीरसागर सोळंकी सुरेश धरण बजरंग सोनवणे अंजली दमानिया नमिता मुंडदा हे 9 लोक आणि काँग्रेसचे लोक सातत्याने वाल्मीकरांना 302 मध्ये आरोपी करा हा मुद्दा मांडत आहेत असे सुळे म्हणाल्या. राज्यातील 6 पक्ष सातत्याने मागणी करत आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी याचे उत्तर दिले पाहिजे. सरकार का खुनी लोकांना लपवत आहे असे सुळे म्हणाल्या. 

राज्यात प्रचंड अस्वस्थ करणारी परिस्थिती

बदलापूर घटनेतील आरोपी अक्षय शिंदे यांच्या एनकाउंटरवरून न्यायालयाने पोलिसांना दोषी ठरवलं आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती नेमली आहे, यावरुन खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आज-काल जेल ऑफ चॉईस ही नवीन स्कीम सरकारने काढली आहे. प्रचंड अस्वस्थ करणारी परिस्थिती राज्यात आहे. एवढा मोठा जनाधार या सरकारला मिळाला आहे. सातत्याने सर्वसामान्य माणसांना फसवल्याचा फील का येतोय असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी सरकारवर निशाणा साधलाय. 

महत्त्वाच्या बातम्या

बळीराजाचे डोळे आभाळाकडे! राज्यात कधी पडणार चांगला पाऊस, पंजाबराव डखांनी दिली महत्वाची माहिती
बळीराजाचे डोळे आभाळाकडे! राज्यात कधी पडणार चांगला पाऊस, पंजाबराव डखांनी दिली महत्वाची माहिती
साखरेच्या दरात वाढ, पण शेतकऱ्यांच्या पदरात काय? बळीराजाला तब्बल 16 हजार 87 कोटींचा फटका, वाचा नेमकं प्रकरण काय?
साखरेच्या दरात वाढ, पण शेतकऱ्यांच्या पदरात काय? बळीराजाला तब्बल 16 हजार 87 कोटींचा फटका, वाचा नेमकं प्रकरण काय?
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 ऑगस्ट 2026 | शुक्रवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 ऑगस्ट 2026 | शुक्रवार
पावसाची दांडी, पाण्याअभावी पिकं लागली करपू, बनगरवाडीतील शेतकऱ्यांवर गाव सोडण्याची वेळ, ग्रामविकासमंत्र्यांच्या मतदारसंघात भीषण वास्तव  
पावसाची दांडी, पाण्याअभावी पिकं लागली करपू, बनगरवाडीतील शेतकऱ्यांवर गाव सोडण्याची वेळ, ग्रामविकासमंत्र्यांच्या मतदारसंघात भीषण वास्तव  

व्हिडीओ

Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News
Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!
PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : साहिलच्या शरीरात छर्रे, आठ तासानंतर एफआयर दाखल, गृहसचिव आणि अमित शाह यांना अंतिम परवानगी द्यावी लागली, राहुल गांधी यांचा दावा
साहिल लोचब याच्यासोबत आठ तास ठिय्या, एफआयआर दाखल होताच राहुल गांधी म्हणाले, न्यायाच्या दिशेनं पहिलं पाऊल
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
Nashik Road Issue : नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, रस्त्यांच्या दर्जाचा प्रश्न ऐरणीवर, पाहा Video
नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, Video व्हायरल
Tarique Rahman India Visit: बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
Tukaram Mundhe: राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
Sugar Price Hike : साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड दोन कारणं सांगत म्हणाले...
साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दोन कारणं सांगितली
'तुझी बहिण घरी चालणार नाही, पोटगीपोटी दीड कोटी दे..' लव्ह मॅरेज केलेल्या ICICI बँक मॅनेजर बायकोची कोर्टात मागणी; व्यथित SBI अधिकाऱ्याने तीन पिस्तूल खरेदी केल्या अन् अवघ्या 30 मिनिटात संपूर्ण कुटुंब संपवलं
'तुझी बहिण घरी चालणार नाही, पोटगीपोटी दीड कोटी दे..' लव्ह मॅरेज केलेल्या ICICI बँक मॅनेजर बायकोची कोर्टात मागणी; व्यथित SBI अधिकाऱ्याने तीन पिस्तूल खरेदी केल्या अन् अवघ्या 30 मिनिटात संपूर्ण कुटुंब संपवलं
Bhiwandi Crime News: जेवणासाठी थांबला; दोघांनी धमकावून लुटण्याचा प्रयत्न केला, ड्रायव्हरनं प्रतिकार करताना मानेवर सपासप वार केले अन्...भिवंडीत मध्यरात्री 2.45 वाजताचा थरार
जेवणासाठी थांबला; दोघांनी धमकावून लुटण्याचा प्रयत्न केला, ड्रायव्हरनं प्रतिकार करताना मानेवर सपासप वार केले अन्...भिवंडीत मध्यरात्री 2.45 वाजताचा थरार
Embed widget