Supreme Court Hearing Live : राज्यातील सत्तासंघर्षाची 'सर्वोच्च' सुनावणी; प्रत्येक अपडेट एका क्लिकवर...

Maharashtra Political Crisis LIVE Updates : सत्ता संघर्षाबाबतचं प्रकरण पटलावर घेण्यास सुप्रीम कोर्टानं मान्यता दिली आहे. आज दुपारी सुप्रीम कोर्टात सुनावणीची शक्यता.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 23 Aug 2022 01:00 PM
Supreme Court Hearing Live : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर गुरुवारी सुनावणी करणार, परवाच्या सुनावणीपर्यंत निवडणूक आयोगानं निर्णय घेऊ नये, कोर्टाच्या सूचना

Supreme Court Hearing Live : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर गुरुवारी सुनावणी करणार, परवाच्या सुनावणीपर्यंत निवडणूक आयोगानं निर्णय घेऊ नये, कोर्टाच्या सूचना

Maharashtra Politics : आताची सर्वात मोठी बातमी! महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष आता घटनापीठाकडे

Maharashtra Politics : आताची सर्वात मोठी बातमी! महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष आता घटनापीठाकडे, पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे सत्तासंघर्षाची सुनावणी


 





Maharashtra News : सत्तासंघर्षाचं प्रकरण घटनापीठाकडे सोपवलं जाणार? आज सर्वोच्च सुनावणी

Maharashtra News : महाराष्ट्रात (Maharashtra) नवनिर्वाचित शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झालं असलं, तरी सत्तापेच मात्र कायम आहे. कारण महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा पेच अद्याप सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) प्रलंबित आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीत 'तारीख पे तारीख'चं सत्र सुरु झालं आणि जूनपासून प्रलंबित असलेल्या या प्रकरणाच्या सलग चार तारखा लांबणीवर गेल्या. 

Maharashtra Politics : वारंवार तारीख पुढे जात असल्यानं सर्वोच्च न्यायालयात आज शिवसेनेच्या वकिलांनी हे प्रकरण मेन्शन केलं

Maharashtra Politics : आज सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) सुनावणी पार पडणार आहे. दुपारी साडेबारा वाजता तीन न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर या प्रकरणावर सुनावणी होणार आहे. वारंवार तारीख पुढे जात असल्यानं सर्वोच्च न्यायालयात आज शिवसेनेच्या (Shiv Sena) वकिलांनी हे प्रकरण मेन्शन केलं होतं. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयानं हे प्रकरण पटलावर घ्यायला मान्यता दिली आहे. 

Maharashtra Political Crisis : आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

Maharashtra Political Crisis : आज सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) सुनावणी पार पडणार आहे. दुपारी साडेबारा वाजता तीन न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर या प्रकरणावर सुनावणी होणार आहे. वारंवार तारीख पुढे जात असल्यानं सर्वोच्च न्यायालयात आज शिवसेनेच्या (Shiv Sena) वकिलांनी हे प्रकरण मेन्शन केलं होतं. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयानं हे प्रकरण पटलावर घ्यायला मान्यता दिली आहे. 

CM Eknath Shinde vs Uddhav Thackeray : काही क्षणात सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

CM Eknath Shinde vs Uddhav Thackeray : राज्यातील सत्ता संघर्षाबाबत याघडीची सगळ्यात मोठी बातमी. तासाभरात महाराष्ट्रातील सत्ता संघर्षासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. सत्ता संघर्षाबाबतचं प्रकरण पटलावर घेण्यास कोर्टाने मान्यता दिलीय. वारंवार तारीख पुढे जात असल्याने शिवसेनेच्या वकिलांनी हे प्रकरण कोर्टात मेन्शन केलं होतं. सरन्यायाधीश एन व्ही रमण्णा, न्या. हिमा कोहली, न्या. कृष्णमुरारी यांच्याच पीठासमोर होणार ही सुनावणी होणार आहे.


सविस्तर वृत्त वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

Maharashtra Politics : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सुनावणी आजच

Maharashtra Politics : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर (Maharashtra Politics) आज सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) सुनावणी पार पडणार आहे. दुपारी साडेबारा वाजता तीन न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर या प्रकरणावर सुनावणी होणार आहे. वारंवार तारीख पुढे जात असल्यानं सर्वोच्च न्यायालयात आज शिवसेनेच्या (Shiv Sena) वकिलांनी हे प्रकरण मेन्शन केलं होतं. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयानं हे प्रकरण पटलावर घ्यायला मान्यता दिली आहे. 


यापूर्वी 3 आणि 4 ऑगस्ट अशी सलग दोन दिवस सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली होती. तेव्हापासूनच सातत्यानं हे प्रकरण पुढे ढकललं जात होतं. शिवसेनेसाठी हे प्रकरण अत्यंत महत्त्वाचं असल्यामुळे त्यांनी आज हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात शिवसेनेच्या वतीनं तातडीनं मेन्शन करण्यात आलं. त्यामुळे आज अखेर या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडणार आहे. 


सविस्तर वृत्त वाचण्यासाठी येथे क्लिक करा

Maharashtra Political Crisis : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाबाबत आज साडेबारा वाजता सुनावणी

पार्श्वभूमी

Maharashtra Political Crisis : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडणार आहे. दुपारी साडेबारा वाजता तीन न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर या प्रकरणावर सुनावणी होणार आहे. वारंवार तारीख पुढे जात असल्यानं सुप्रीम कोर्टात आज शिवसेनेच्या वकिलांनी हे प्रकरण मेन्शन केलं होतं. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयानं हे प्रकरण पटलावर घ्यायला मान्यता दिली आहे. 


यापूर्वी 3 आणि 4 ऑगस्ट अशी सलग दोन दिवस सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली होती. तेव्हापासूनच सातत्यानं हे प्रकरण पुढे ढकललं जात होतं. शिवसेनेसाठी हे प्रकरण अत्यंत महत्त्वाचं असल्यामुळे त्यांनी आज हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात शिवसेनेच्या वतीनं तातडीनं मेन्शन करण्यात आलं. त्यामुळे आज अखेर या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडणार आहे. 


दरम्यान, महाराष्ट्रातल्या सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्टात होणारी सुनावणी गेल्या 24 तासांत दुसऱ्यांदा लांबणीवर गेली होती. सर्वोच्च न्यायालयात होणाऱ्या सुनावणीबाबत अनिश्चितता होती. सुप्रीम कोर्टाच्या सप्लिमेंट्री लिस्टमध्ये महाराष्ट्राच्या कामकाजाचा आजसाठी समाविष्ट नव्हतं. त्यामुळे सुनावणी आज होण्याची शक्यता कमीच दिसत होती. अशातच वारंवार तारीख पुढे जात असल्यानं सुप्रीम कोर्टात आज शिवसेनेच्या वकिलांनी हे प्रकरण मेन्शन केलं होतं. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयानं हे प्रकरण पटलावर घ्यायला मान्यता दिली आहे. त्यामुळे आज या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. 


महाराष्ट्रात (Maharashtra) नवनिर्वाचित शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झालं असलं, तरी सत्तापेच मात्र कायम आहे. कारण महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा पेच अद्याप सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) प्रलंबित आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीत 'तारीख पे तारीख'चं सत्र सुरु झालं आणि जूनपासून प्रलंबित असलेल्या या प्रकरणाच्या सलग चार तारखा लांबणीवर गेल्या. 


यापूर्वी हे प्रकरण 22 तारखेला सहाव्या क्रमांकावर सुनावणीसाठी सर्वोच्च न्यायालयात होतं. पण त्यावेळीही सुनावणी पुन्हा लांबणीवर गेल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांनी जोर धरला आहे. दरम्यान, सध्याचे सरन्यायाधीश एनव्ही रमण्णा यांच्या कारकिर्दीत प्रकरणातच या सत्तासंघर्षाचा ऐतिहासिक फैसला होणार की, मोठ्या खंडपीठाकडे प्रकरण सोपवलं जाणार? हे पाहण महत्त्वाचं ठरणार आहे. 


सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश एनव्ही रमण्णा यांच्या निवृत्तीची तारीख 26 ऑगस्ट


सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश एनव्ही रमण्णा (N. V. Ramana) यांच्या निवृत्तीची तारीख 26 ऑगस्ट आहे. त्यात सत्तासंघर्षावरील सुनावणी लांबत असल्यानं खंडपीठ हेच राहणार का? याबद्दलही प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. तातडीच्या सुनावणीसाठी उद्धव ठाकरे गटाला सर्वोच्च न्यायालयाकडे पुन्हा मेन्शनिंग करावं लागेल पण ती विनंती मान्य होईल का? याचीही उत्सुकता लागली होती. 


उद्धव ठाकरे गटाकडून (Uddhav Thackeray) कपिल सिब्बल (Kapil Sibbal), अभिषेक मनु सिंघवी (Abhishek manu Singvi) तर शिंदे गटाकडून (CM Eknath shinde) हरीश साळवे (Harish Salve) सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडत आहे. तर निवडणूक आयोगाकडून (Election Commission) अरविंद दातार बाजू मांडत आहेत.  


यापूर्वीच्या सुनावणीत काय घडलं? 


यापूर्वी 3 आणि 4 ऑगस्ट अशी सलग दोन दिवस सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. या सुनावणीत बंडखोर आमदारांच्या अपात्रतेवरुन सुरु झालेली कायदेशीर लढाई थेट शिवसेना नेमकी कोणाची? उद्धव ठाकरेंची की, शिंदे गटाची या प्रश्नापर्यंत येऊन पोहोचली होती. यावर कोर्टानं महत्त्वाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं नोंदवला. पक्षाच्या चिन्हाबाबत कोणताही निर्णय नको, असं सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं होतं.


निवडणूक आयोगातही महत्वाचा दिवस


आज मंगळवारी निवडणूक आयोगातही महत्वाचा दिवस आहे. कारण 23 ऑगस्टपर्यंत उद्धव ठाकरे गटानं आपलं म्हणणं मांडावं, असं निवडणूक आयोगानं म्हटलं आहे. साहजिक आहे, जर कोर्टातली कारवाई लांबणार असेल तर त्याआधी आयोगाचा निर्णय येतोय का? हे पाहावं लागेल. मागच्या सुनावणीत कोर्टानं आयोगाला महत्वाचे निर्णय घेऊ नका, असं तोंडी सांगितलं होतं. पण कारवाई थांबवली नव्हती. तसेच लेखी आदेशात निर्णय न घेण्याबद्दलची स्पष्टता नाही. त्यामुळे आयोगाच्या निर्णयावरही बऱ्याच गोष्टी अवलंबून असतील. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.