कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील (Kolhapur News) राधानगरी तालुक्यातील (Radhanagari) सोन्याची शिरोलीत भाजपच्या (BJP) आगामी लोकसभेच्या तयारीसाठी जाहिरातीचा फंडा असलेल्या विकसित भारत संकल्प यात्रेचा रथ (Viksit Bharat Sankalp Yatra Rath In Kolhapur) अडवून नागरिकांनी प्रश्नांचा अक्षरश: भडीमार केला. संकल्प यात्रेत शासकीय कर्मचारी असलेले ग्रामसेवक दिसून आल्याने गावकऱ्यांनी त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. यामध्ये त्यांना अनेक प्रश्नांची उत्तरे देता आली नाहीत. देशाचं सरकार की मोदीचं (PM Modi) सरकार? एका व्यक्तीचं सरकार असतं का? एकट्या पंतप्रधानांचे सरकार असतं का? योजना एकट्याच्या असतात का? भारत सरकार शब्द का वापरला नाही? सेल्फी पाँईंटला तिरंगा का नाही? भाजपच्या झेंड्यासारखं का दिसतंय? अशा अनेक प्रश्नांचा भडिमार गावकऱ्यांनी केला. मोदी साहेबांचं म्हणजे काय? तुम्ही अधिकारी कोणाचे? अशीही विचारणा करण्यात आली. आमच्या गावात आला आहात, तर उत्तरे दिली पाहिजेत, असेही गावकरी म्हणाले. 


कोल्हापूर जिल्ह्यातल्या राधानगरी तालुक्यामध्ये सोन्याची शिरोली या ठिकाणी नागरिकांनी जाब विचारला. सरकारी खर्चातून भाजपचा प्रचार करत आहे का? असा देखील जाब विचारला. या रथाच्या स्क्रीनवर उज्वला गॅस योजनेची माहिती दिली जात होती. त्याचवेळी हा गॅस मोदी सरकारने किती रुपयाला नेऊन ठेवला त्याचे उत्तर द्या असे देखील प्रश्न केले. सुमारे चारशे रुपयांचा गॅस सिलेंडर हजार रुपयापर्यंत पोहोचला, त्याचे उत्तर अधिकाऱ्यांकडे गावकऱ्यांनी मागितले. शिवाय या संकल्प यात्रेच्या रथावर कुठेही केंद्र सरकारचे नाव नसून मोदी सरकार असे लिहिले आहे त्यावर देखील नागरिकांनी आक्षेप घेतला. 20 हजार शाळा बंद करणार आहेत त्याचं काय? असाही प्रश्न विचारण्यात आला. 


सरकारी खर्चात भाजपचा प्रचार


बंद होत असलेल्या सरकाळी शाळा, वाढलेली महागाई आणि उज्वला गॅसची जाहिरात असल्याने गावकऱ्यांचा संताप अनावर केला. जोपर्यंत आमच्या प्रश्नांची उत्तरे मिळत नाहीत, तोपर्यंत गावातून जाऊ देणार नाही, अशी भूमिका घेतली. यावेळी उपस्थित पदाधिकारी संबंधितांना फोनाफोनी करतानाही दिसून आले. कोल्हापुरातील सोशल मीडियात हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. पळता भुई थोडी, यालाच म्हणतात, अशी कॅप्शन देऊन हा व्हिडिओ व्हायरल केला जात आहे. 


योजना कोणाच्या मोदींच्या की भारत सरकारच्या?


आपला संकल्प विकसित भारत रथ गावात पोहोचल्यानंतर योजनांच्या नावावर फक्त मोदी दिसून आल्याने या योजना व्यक्तीच्या की भारत सरकारच्या? अशी विचारणा करण्यात आली. यावेळी रथाच्या पदाधिकाऱ्याने योजना भारत सरकारची असल्याचे सांगितले. यानंतर  तर भारत शब्द का नाही? सेल्फी पाँईंटवर तिरंगा का नाही? अशा विविध प्रश्नांनी भंडावून सोडले. उज्वला योजनेची जाहिरात केली जात आहे, पण 365 रुपयांचा गॅस हजार रुपयाला केल्याचेही गावकरी म्हणाले. 


इतर महत्वाच्या बातम्या