बीड : बीड जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने याची दखल विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांनी घेतली. काल जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांनी तातडीची बैठक घेतली. या बैठकीमध्ये त्यांनी अधिकार्‍यांना चांगलेच झापले. रुग्णांची संख्या वाढत असल्याचे पाहून 2 हजार बेड तयार ठेवण्याच्या सूचना त्यांनी आरोग्य विभागाला दिल्या. मास्क न वापरणार्‍यांविरोधात कारवाई करण्याच्या सूचनाही त्यांनी पोलीस प्रशासनाला दिले आहेत. इथून पुढे बेजबाबदारपणा खपवून घेतला जाणार नाही. जे अधिकारी बेजबाबदारपणे वागतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल, अशा सूचनाही त्यांनी  बैठकीमध्ये दिल्या. 


ना बॉडीगार्ड, ना लवाजमा, IAS सुनील केंद्रेकर यांचा साधेपणा; पत्नीसह केंद्रेकर आठवडी बाजारात


भाजी विक्रेते, किराणा दुकानदार, फळ विक्रेते यांच्या तुम्ही फक्त अँटीजेन टेस्ट करता, कधी कधी कोरोना रुग्ण अँटीजेन टेस्टमध्ये पॉझिटिव्ह आढळून येत नाही त्यामुळे इथून पुढे सर्व टेस्ट ह्या आरटीपीसीआर झाल्या पाहिजेत. कोरोना रुग्णाला ऑक्सीजन देताना त्या ऑक्टीसनच्या ओटूमधील पाणीसुद्धा बदलले जात नाही, अशा एक ना अनेक चुका आरोग्य विभागाच्या आहेत. त्याला जिल्हा महसूल प्रशासनाच्या अधिकार्‍यांनी पाठिशी घातले नाही पाहिजे. येणारे दोन महिने अतिशय काळजी करण्यासारखे आहेत. या दोन महिन्यामध्ये रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणावर भर पडणार आहे. प्रत्येकाला मास्क अत्यावश्यक करा, विनामास्क कोणी दिसले तर पोलीसांनी सक्तीने कारवाई करावी, असे म्हणत विभागीय आयुक्त केंद्रेकर यांनी काल अचानकपणे जिल्ह्यात वाढत असलेल्या कोरोनाच्या अनुषंगाने बैठक घेतली. 


Coronavirus Outbreak | मराठवाड्यात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढला, सुनील केंद्रेकरांच्या ऑडिओ मेसेजमधून प्रशासनाचा हलगर्जीपणा समोर


राज्यात कोरोना रुग्णसंख्येचा उद्रेक! 


राज्यात मागील काही दिवसांपासून सुरु असणारं कोरोनाचं थैमान काही केल्या थांबण्याचं नाव घेत नाही आहे. काल तर कोरोना रुग्णसंख्येने नवा उच्चांक गाठला आहे. सातत्यानं वाढणारी रुग्णसंख्या पाहता लॉकडाऊनची छाया गडद होताना दिसत आहे. राज्याच्या आरोग्य विभागानं प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार मंगळवारी दिवसभरात राज्यात एकूण 21,63,391 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांचा आकडा पाहता राज्यातील कोरोनामुक्त होणाऱ्यांचं प्रमाण (Recovery Rate) 91.26 टक्के इतकं झालं आहे. तर काल राज्यात 23,179 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. तर राज्यात 84 कोरोना बाधित रुग्णाच्या मतृकांची नोंद झालीय. सध्या राज्यातील मत्यूदर 2.24% एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 1,78,35,495 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 23,70,507 (13.29 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात काल एकूण 1,52,760 अॅक्टिव रुग्ण आहेत.