सिंधुदुर्ग : शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनानंतर एक पर्व हरपल्याची भावना व्यक्त केली जात आहे. राजकारणी नेत्यांपासून ते कलाकारांपर्यंत सारेच बाबासाहेबांना श्रद्धांजली अपर्ण करत आहेत. अशातच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुमन दाभोलकरने दगडावर स्टोन आर्ट साकारत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंना अनोख्या पद्धतीने श्रद्धांजली वाहिली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली मधील स्टोन आर्ट साकारणारा चित्रकार सुमन दाभोलकरने दगडाला कोणत्याही प्रकारचा आकार न देता शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचं स्टोन आर्ट साकारून त्यांना अनोख्या पध्दतीने श्रद्धांजली वाहिली आहे. दगडावर रंगांची उधळण करून सुमन दाभोलकरने शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचं स्टोन आर्ट साकारलं आहे.
सुमन दाभोळकर म्हणतो, निसर्गाने जे सहज उपलब्ध करून दिलं आहे, निसर्गाने उपलब्ध करून दिलेल्या गोष्टी कलेच्या माध्यमातून नव्याने समोर आणाव्यात या हेतूने मी दगडांवर काम करायला सुरुवात केली. त्यातून मग विविध आकार जन्मास येऊ लागले. प्राणी,कार्टून्स, मासे, विविध वस्तू उलगडून समोर येऊ लागल्या. कला,क्रीडा,विज्ञान या क्षेत्रांतील मातब्बर व्यक्तींचे चेहरे मी दगडात साकारले आहेत. त्यात शिवाजी महाराज ,सावित्रीबाई फुले, जोतिबा फुले, जगप्रसिद्ध वैज्ञानिक आइन्स्टाइन, एपीजे अब्दुल कलाम, अभिनेता नसिरउद्दीन शाह, नाना पाटेकर , अमिताभ बच्चन , स्वप्नील जोशी ,क्रिकेटपटू विराट कोहली, सर्वांचा लाडका मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, कपिल देव, ओशो, रतन टाटा, कविवर्य नारायण सुर्वे इत्यादींच्या रंगशिल्पांचा समावेश आहे".
सुमन पुढे म्हणतो,"दगड ही निसर्गाची निर्मिती आहे. त्यातून एक रंगशिल्प साकारलं जातंय हे मला भावतं.निसर्ग हा एक भला मोठा कॅनव्हास आहे. तो खूप काही शिकवत असतो".
संबंधित बातम्या
राज ठाकरे यांची शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना व्यंगचित्रातून श्रद्धांजली
Shivshahir Aani Mi : काय म्हणाले होते PM Modi शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्याबद्दल ?
Babasaheb Purandare : एका युगाचा अस्त! शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे अनंतात विलिन
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha