मुंबई : अमरावतीत झालेल्या दंगलीमागे (Amravati Violence) रझा अकादमीसह अनेक राजकीय पक्षांचाही हात असल्याचा महाराष्ट्र पोलिसांना संशय आहे. सुत्रांच्या माहितीनुसार अमरावती हिंसाचारात रझा अकादमीबरोबरचं भाजप आणि युवा सेनेच्याही लोकांचाही हात असल्याची माहिती समोर येत आहे. शिवसेना आमदार सुनील प्रभू यांनी प्रत्युत्तर दिले आहे. आरोप खोटे असून युवासेनेला बदनाम करण्याचा डाव असल्याचे म्हटले आहे.
आमदार सुनील प्रभू म्हणाले, युवासेनेचे नाव गुंतवण्यांचे हे षडयंत्र आहे. देशभरात समाजहितासाठी काम करणाऱ्या तरुणांच्या संघटनेला बदनाम करण्याचा हा डाव आहे. युवासेनेचा हात असल्याचा कोणताही अहवाल समोर आलेला नाही. पोलिस याचा तपास करत असून लवकरचं जे खरं आहे ते समोर येईल.
29 ऑक्टोबर, 1 नोव्हेंबर आणि 6 नोव्हेंबरलाही या प्रकरणी अमरावतीमध्ये निदर्शने झाली होती. पण 6 नोव्हेंबर रोजीच एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली. ज्यात त्रिपुरातल्या अनेक मशिदींना पाडण्यात आल्याचा दावा केला होता. हीच ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आणि 12 तारखेला रझा अकादमीनं अमरावती बंदचा नारा दिला.
दंगलीआधी 60 ते 70 पोस्ट व्हायरल केल्या गेल्या. ज्याचा वास्तवाशी कोणताही संबंध नव्हता. विशेष म्हणजे अमरावतीमध्ये आज भाजपचे आमदार आणि माजी मंत्री प्रवीण पोटे यांनी पोलिसांसमोर आत्मसमर्पणही केलं याआधी अनिल बोंडे यांनाही पोलिसांनी अटक केली होती. अमरावतीतील हिंसाचारानंतर पोलिसांनी 35 गुन्हे दाखल आहे. आतापर्यंत 198 जणांना अटक केली आहे,. अटक करण्यात आलेल्यांपैकी 24 जण भाजपचे असून त्याचील तीन जण माजी मंत्री आहे.
त्रिपुरातील घटनेचे पडसाद महाराष्ट्राच्या काही भागात उमटले. यात अमरावतीमध्ये वातावरण खूप तणावाचे झाले असून आक्रमक आंदोलकांनी या दुकानांवर दगडफेक करत तोडफोड केली. यानंतर कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनीही आक्रमक पवित्रा घेत दगडफेक करणाऱ्यांवर लाठीचार्ज केला.
Sunil Prabhu यांची प्रतिक्रिया
संबंधित बातम्या :