ST Workers Strike : एसटी कर्मचाऱ्यांचा संप मोडीत काढण्यासाठी एसटी महामंडळ सरसावलं आहे.  रोजंदारीवर काम करणाऱ्या 2296 कामगारांना एसटी महामंडळाने सेवा समाप्तीची नोटीस बजावली आहे. या कामगारांनी 24 तासांत कामावर हजर व्हावे अन्यथा कोणतीही पूर्वसूचना न देता सेवा समाप्त करण्यात येईल असं या नोटीशीत म्हटलं आहे. 


एसटी महामंडळाने आतापर्यंत 2 हजार 178 कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. दरम्यान मंगळवारी एसटी महामंडळाचे सुमारे साडेसात हजार कर्मचारी कामावर हजर झाले. काल संध्याकाळी सहापर्यंत 66 बसेस राज्याच्या विविध भागात सोडण्यात आल्या असून जवळपास दोन हजार प्रवाशांनी प्रवास केला. सध्या एसटीची हजेरी पटावरील एकूण कामगारांची संख्या 92 हजार 266 आहे. तर सध्या हजर कर्मचाऱ्यांची संख्या  7 हजार 400 आहे. यामध्ये प्रशासकीय 5224 कर्मचारी, 1773 कार्यशाळा कर्मचारी, 264 चालक आणि 139 वाहक आहेत.  प्रत्यक्षात संपामध्ये भाग घेतलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या 84, 866 आहे. 


ठाकरे सरकारला जागे करण्यासाठी लढा आणखी तीव्र करावा लागेल : रामदास आठवले


एसटी कर्मचाऱ्यांचा संप अजूनही सुरू आहे. आझाद मैदानात सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पाठिंबा दर्शवला. रामदास आठवले यांनी पाठिंबा दर्शवण्यासाठी आझाद मैदानात आंदोलकांची भेट घेतली. यावेळी त्यांनी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले. यावेळी ठाकरे सरकारला जागे करण्यासाठी हा लढा आणखी तीव्र करावा लागेल असं रामदास आठवले यांनी म्हटले. 


रामदास आठवले यांच्यासह भाजप आमदार गोपीचंद पडळकर, आमदार सदाभाऊ खोत हेदेखील उपस्थित होते. एसटी कर्मचाऱ्यांना संबोधित करताना रामदास आठवले यांनी आपल्या खास शैलीत राज्य सरकारवर टीका केली. एसटीचे विलीनीकरण आणि इतर मागण्या पूर्ण करून घेण्यासाठी ठाकरे सरकारला जाग आणावी लागणार आहे. त्यासाठी लढा आणखी तीव्र करावा लागेल असे आठवले यांनी म्हटले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी या प्रश्नाकडे लक्ष द्यावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. एसटी नसती तर मी पुढारी नसतो असेही आठवले यांनी म्हटले. रामदास आठवले यांनी आपल्या कवितांच्या माध्यमातून सरकारवर टीका केली. 


ST Strike: महामंडळाचं संपाविरोधात मोठं पाऊल



संबंधित बातम्या :


ठाकरे सरकारला जागे करण्यासाठी लढा आणखी तीव्र करावा लागेल; केंद्रीय मंत्री रामदास आठवले


एसटी संपाच्या न्यायालयीन लढाईचा तिढा कायम; संपकऱ्यांना समितीपुढे भुमिका स्पष्ट करण्याचे हायकोर्टाचे निर्देश


मागण्या मान्य करण्यासाठी तुटेल एवढं ताणू नका, ST कर्मचारी आणि संघटनांना शरद पवारांचं आवाहन