Raj Thackeray tribute shivshahir babasaheb purandare : शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनामुळे महाराष्ट्रात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचा विशेष स्नेह होता. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यंगचित्राद्वारे आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे. राज यांनी व्यंगचित्राद्वारे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना श्रद्धांजली अपर्ण केली आहे. 


मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी 'शिवाज्ञा' या व्यंगचित्राद्वारे बाबासाहेब पुरंदरे यांना अनोख्या पद्धतीने श्रद्धांजली वाहिली आहे. बाबासाहेब पुरंदरे यांनी अनेक दशके शिवचरित्राशी संबंधित कार्य केले. त्याचा संदर्भ देत राज ठाकरे यांनी हे व्यंगचित्र रेखाटले आहे. 


व्यंगचित्रात छत्रपती शिवाजी महाराज शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे स्वागत करताना दिसत आहे. सिंहासनवर असलेल्या शिवाजी महाराज बाबासाहेब पुरंदरेचे स्वागत करताना, , 'ये रे माझ्या गड्या, मला शोधण्यासाठी जगभर खूप पायपीट केलीस, अविश्रांत मेहनत घेतलीस, माझ्यासाठी संपूर्ण आयुष्य खर्ची घातलंस. ये आता जरा आराम कर.' असे म्हणताना दिसत आहे. तर, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे हे शिवाजी महाराजांसमोर दोन्ही हात जोडून उभे असल्याचे व्यंगचित्रात दाखवण्यात आले आहे. 


 






 


राज ठाकरे यांनी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनानंतर श्रद्धांजली वाहिली होती. 'बाबासाहेबांनी आपलं आयुष्य शिवचरित्र सांगण्यासाठी खर्च केलं. परंतु असं असतानाही वर्तमानातील प्रश्न आणि भविष्यातील आव्हानं ह्याबाबत त्यांच्याकडून कायम मार्गदर्शन होत आलं. माझ्या व्यक्तिगत आयुष्यात ते माझे मार्गदर्शक तर होतेच, परंतु मला पितृत्युल्य होते असल्याचे राज ठाकरे यांनी म्हटले होते. बाबासाहेब पुरंदरे यांची आठवण सांगताना राज यांनी म्हटले की,  बाबासाहेब मला नेहमी सांगत, महाराजांचा जिथे जिथे पदस्पर्श झाला, तिथे तिथे मी आजपर्यंत अनेकदा जाऊन आलो आहे. आता फक्त एकच जागा उरली आहे, महाराज जिथे गेलेत तिथे जायची. शिवछत्रपती महाराजांचा सेवक आज साक्षात छत्रपतींची सेवा करण्यासाठी निघाला. राज ठाकरे यांनी याच भावनांवर आधारीत व्यंगचित्रातून श्रद्धांजली अपर्ण केली आहे.