एक्स्प्लोर

ऊसाला 200 रुपयांचा वाढीव एफआरपी, कोल्हापुरातील बैठकीत निर्णय

ऊस दरासंदर्भात घेण्यात आलेल्या बैठकीत तोडगा काढण्यात सरकारला यश आलं आहे. आज रविवारी दुपारी ऊस दरासंदर्भात झालेल्या बैठकीत प्रतिटन उचलीला 200 रुपयांचा वाढीव एफआरपी देण्याचा निर्णय घेण्यात आला. गेल्या काही दिवसांपासून स्वाभिमानी शेतकरी संघटना ऊस दराच्या प्रश्नावरुन आक्रमक झाली होती.

कोल्हापूर : ऊस दरासंदर्भात घेण्यात आलेल्या बैठकीत तोडगा काढण्यात सरकारला यश आलं आहे. आज रविवारी दुपारी ऊस दरासंदर्भात झालेल्या बैठकीत प्रतिटन उचलीला 200 रुपयांचा वाढीव एफआरपी देण्याचा निर्णय घेण्यात आला. गेल्या काही दिवसांपासून स्वाभिमानी शेतकरी संघटना ऊस दराच्या प्रश्नावरुन आक्रमक झाली होती. आज ऊस दरासंबंधी कोल्हापूरमध्ये खासदार राजू शेट्टी, सदाभाऊ खोत, चंद्रकांतदादा पाटील आणि साखर कारखानदारांमध्ये बैठक झाली. या बैठकीत प्रतिटन पहिल्या उचलीबरोबर 100 रुपये आणि दोन महिन्यांनतर 100 रुपये असे एकूण 200 रुपये वाढीव देण्याचा निर्णय घेण्यात आला. या नव्या एफआरपी दराला कारखानदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेनंही हिरवा कंदील दाखवला आहे. शेतकरी संघटना ऊसाला टनामागं 3 हजार 500 रुपयांचा दर द्यावा यावर ठाम होती. मात्र, ही मागणी व्यवहार्य नसल्याचं सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी सांगितलं होतं. एफआरपीचे पैसे सुलभतेनं मिळण्यासाठी प्रयत्न केले जातील, सिस्टीम ऑनलाईन केली जाईल, वजनकाटे नियंत्रणात ठेवण्यासाठी वजनकाटे समिती गठीत केली जाईल असंही सहकार मंत्र्यांनी सांगितलं होतं. तर रघुनाथ पाटलांनी गुजरातचं उदाहरण देत, भाजप सरकारवर टीकास्त्र डागलं होतं. “गुजरात आणि इतर राज्यात एकाच पक्षाचे राज्य असलेल्या ठिकाणी एफआरपीला चांगला भाव मिळतो. मात्र, महाराष्ट्रात एफआरपी कमी सांगितली जात आहे. त्यामुळे आम्ही आमच्या हक्काचे पैसे मागत आहोत. ऊस शेतकऱ्यांना आत्महत्या करायला लावू नका,” असा इशाराही रघुनाथ पाटील यांनी यावेळी दिला होता. दरम्यान, सरकार शेतकऱ्यांच्याच बाजूनं काम करत असून त्यांना ऊसाला क्विंटलमागं 3400 ते 3500 रुपयांचा देण्यासाठी प्रयत्न करेल, असं आश्वासन कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी दिलं होतं.

महत्त्वाच्या बातम्या

मुलीला का मारलं विचारणाऱ्या आईला वीट अन् काठीने मारहाण; उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू, मुलीचा आक्रोश
मुलीला का मारलं विचारणाऱ्या आईला वीट अन् काठीने मारहाण; उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू, मुलीचा आक्रोश
NCP Sharad Pawar : शरद पवारांचा खासदार फुटणार नाहीत, ऑपरेशन तुतारीला तुर्तास ब्रेक; विश्वसनीय सूत्रांची माहिती
शरद पवारांचा खासदार फुटणार नाहीत, ऑपरेशन तुतारीला तुर्तास ब्रेक; विश्वसनीय सूत्रांची माहिती
देवाभाऊंनी देशाचं नेतृत्व करावं, आषाढीला आपण पांडुरंगाला साकडं घालू; दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य
देवाभाऊंनी देशाचं नेतृत्व करावं, आषाढीला आपण पांडुरंगाला साकडं घालू; दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य
Devendra Fadnavis on Farmers: देवाभाऊंची मोठी घोषणा, शेतकऱ्यांची वीजबिलाची पाटी कोरी केली, थकित वीजबिल माफ
देवाभाऊंची मोठी घोषणा, शेतकऱ्यांची वीजबिलाची पाटी कोरी केली, थकित वीजबिल माफ

व्हिडीओ

Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?
Sachin Ahir UNCUT Speech : वरळीकरांकडून जंगी सत्कार, ठाकरे पिता-पुत्रांवर टीका, सचिन अहिरांचं भाषण!
Uddhav Thackeray Nagpur Ramraksha Andolan : नागपुरात रामरक्षा आंदोलनाची नवी कक्षा Special Report
Zero Hour Full : राष्ट्रवादीतील अंतर्गत कलह ते नागपुरात रामरक्षा आंदोलन, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
Eknath Shinde Delhi Visit to Meet Amit Shah : दिल्लीवारीचं कारण विस्तार की राजकारण? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raju Shetti : कर्जमाफीआधीच मुख्यमंत्र्यांचा सत्कार; राजू शेट्टी म्हणाले, स्वतःची पाठ स्वतः थोपटून घेण्याचा प्रकार, कर्जमाफीच्या अंमलबजावणीवरून सरकारला दिला अल्टिमेटम
कर्जमाफीआधीच मुख्यमंत्र्यांचा सत्कार; राजू शेट्टी म्हणाले, स्वतःची पाठ स्वतः थोपटून घेण्याचा प्रकार, कर्जमाफीच्या अंमलबजावणीवरून सरकारला दिला अल्टिमेटम
मुलीला का मारलं विचारणाऱ्या आईला वीट अन् काठीने मारहाण; उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू, मुलीचा आक्रोश
मुलीला का मारलं विचारणाऱ्या आईला वीट अन् काठीने मारहाण; उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू, मुलीचा आक्रोश
देवाभाऊंनी देशाचं नेतृत्व करावं, आषाढीला आपण पांडुरंगाला साकडं घालू; दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य
देवाभाऊंनी देशाचं नेतृत्व करावं, आषाढीला आपण पांडुरंगाला साकडं घालू; दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य
विलासरावांचा पुढाकार, मनमोहनसिंगाची धडपड; सोनम वांगचूकांची तब्येत खालवताच राजू शेट्टींना अण्णा आंदोलनाची आठवण
विलासरावांचा पुढाकार, मनमोहनसिंगाची धडपड; सोनम वांगचूकांची तब्येत खालवताच राजू शेट्टींना अण्णा आंदोलनाची आठवण
Supriya Sule on NCP: राष्ट्रवादी काँग्रेस मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला पाठिंबा देणार असल्याच्या बातम्या निराधार, आमच्याकडे कोणताही प्रस्ताव आलेला नाही: सुप्रिया सुळे
राष्ट्रवादी काँग्रेसकडून मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला पाठिंबा देण्याच्या बातम्या निराधार, आमच्याकडे कोणताही प्रस्ताव आलेला नाही: सुप्रिया सुळे
Dhule News: रक्ताच्या पिशव्या येण्यापूर्वीच प्रुसतीसाठी ऑपरेशन टेबलवर घेतलं, धुळ्यातील रुग्णालयात डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे महिलेचा मृत्यू
रक्ताच्या पिशव्या येण्यापूर्वीच प्रुसतीसाठी ऑपरेशन टेबलवर घेतलं, धुळ्यातील रुग्णालयात डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे महिलेचा मृत्यू
Shiv Puran: मृत्यूपूर्वी मनुष्याला मिळतात 'हे' 10 संकेत, शिवपुराणातील असे वर्णन, जे कलियुगातही लोकांना आश्चर्यचकित करते, जाणून घ्या...
मृत्यूपूर्वी मनुष्याला मिळतात 'हे' 10 संकेत, शिवपुराणातील असे वर्णन, जे कलियुगातही लोकांना आश्चर्यचकित करते, जाणून घ्या...
Railway Ticket Booking IRCTC : रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा! तिकीट बुकिंगमधील कॅप्चा कोडची कटकट संपणार; IRCTC संकेतस्थळात महत्त्वाचे बदल
रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा! तिकीट बुकिंगमधील कॅप्चा कोडची कटकट संपणार; IRCTC संकेतस्थळात महत्त्वाचे बदल
Embed widget