एक्स्प्लोर

एफआरपीचा 70-30 फॉर्म्युला मान्य, ऊस आंदोलन स्थगित

एफआरपीचा 70-30 चा फॉर्म्युला मान्य करण्यात आला आहे. आंदोलकांवरचे गुन्हे मागे घेण्याचं आश्वासन सरकारने दिलं आहे.

अहमदनगर : कारखानदार, आंदोलक आणि सरकारच्या प्रतिनिधिंमध्ये झालेल्या बैठकीनंतर ऊस आंदोलन मागे घेण्यात आलं आहे. ऊसाला पहिली उचल 2525 रुपये देण्यात येईल. एफआरपीचा 70-30 चा फॉर्म्युला मान्य करण्यात आला आहे. आंदोलकांवरचे गुन्हे मागे घेण्याचं आश्वासन सरकारने दिलं आहे. शेतकऱ्यांनी केलेल्या आंदोलनात सहा पोलीस अधिकारी आणि दोन शेतकरी जखमी झाले. आतापर्यंत 23 जणांना अटक करण्यात आली आहे. रास्ता रोको केल्याप्रकरणी अनेक शेतकऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काल 13 तर आज 9 जणांना अटक करण्यात आली. ऊसाला 3100 रुपये दर द्यावा यासाठी करण्यात आलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागलं. शेवगावमध्ये आंदोलकांनी जाळपोळ केली, तर आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराचे नळकांडे फोडले. इतकंच नाही तर पोलिसांनी हवेत गोळीबारही केल्याचं सांगण्यात येत आहे. या गोळीबारात भगवान मापारी आणि बाबूराव तुकळे हे दोन शेतकरी जखमी झाल्याचा दावा आंदोलकांनी केला आहे. दोन्हीही शेतकरी पैठणचे रहिवासी आहे.दरम्यान, गोळीबार केलेला नाही, असा दावा पोलीस उपअधीक्षक सुदर्शन मुंडे यांनी केला. राज्यात अनेक ठिकाणी ऊस दराचं आंदोलन सुरु आहे. पैठण तालुक्यातील पाटेगावातही ऊस दर आंदोलनानं पेट घेतला. यावेळी शेतकऱ्यांनी टायर पेटवले. पोलिसांनी शेतकऱ्यांना आवरण्यासाठी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. सर्व शेतकरी संघटनांनी एकत्र येऊन हा एल्गार पुकारला आहे. तर सोलापूरमध्येही शेतकरी आक्रमक झाले आहेत. शेतकऱ्यांनी मंगळवेढा रोडवर माचणूर जवळ रस्तारोको केला. पोलिसांनी आंदोलक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलंय.

संबंधित बातमी : ऊसदर आंदोलन पेटलं, पोलिसांचा हवेत गोळीबार, 2 जखमी

महत्त्वाच्या बातम्या

सेल्फीच्या जमान्यात 'ऑटोग्राफ प्लीज'; अंमली पदार्थविरोधी कार्यक्रमानंतर पोलीस अधिकाऱ्याकडे धावली शाळकरी मुले
सेल्फीच्या जमान्यात 'ऑटोग्राफ प्लीज'; अंमली पदार्थविरोधी कार्यक्रमानंतर पोलीस अधिकाऱ्याकडे धावली शाळकरी मुले
मुंबईत मॅनहोलमध्ये पडून मृत्यू, उघड्या मॅनहोलपासून 20 फूट अंतरावर मृतदेह मिळाला, BMC चा कारभार चव्हाट्यावर!
मोठी बातमी : मुंबईत मॅनहोलमध्ये पडून मृत्यू, उघड्या मॅनहोलपासून 20 फूट अंतरावर मृतदेह मिळाला, BMC चा कारभार चव्हाट्यावर!
मोफत तिकीट देण्यावरुन बसमध्येच तुफान राडा, कंडक्टरला जबर मारहाण; एसटी कर्मचाऱ्यांचा ठिय्या
मोफत तिकीट देण्यावरुन बसमध्येच तुफान राडा, कंडक्टरला जबर मारहाण; एसटी कर्मचाऱ्यांचा ठिय्या
विद्यार्थ्यांना शाळेतूनच पुस्तकांची सक्ती केली, CBSE शाळांवर कारवाई होणार; समिती नेमणार, मंत्र्यांची विधानसभेत घोषणा
विद्यार्थ्यांना शाळेतूनच पुस्तकांची सक्ती केली, CBSE शाळांवर कारवाई होणार; समिती नेमणार, मंत्र्यांची विधानसभेत घोषणा

व्हिडीओ

Mumbai Sakinaka Manhole : साकीनाका खैरानी रोडवर मॅनहोलमध्ये माणूस पडला
Siya Goyal take to home Pune : बॅग, कपडे, शूज जप्त, घरी नेऊन सिया गोयलची दीड तास कसून चौकशी
Siya Goyal Cafe : 'याच' कॅफेमध्ये सियाने रचला होता केतनला ढकलण्याचा कट
Gold-Silver Price Today : जुलैच्या पहिल्याच दिवशी सोने-चांदी स्वस्त; जाणून घ्या आजचे नवे दर!
Zero Hour Full : खासदार, आमदारांच्या फुटीनंतर आता ठाकरेंनी आत्मचिंतन करायला हवं असं वाटतं का?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Silver Rate : सोने दरातील घसरणीला ब्रेक, सोनं 3 हजारांनी तर चांदी 5000 रुपयांनी महागली, जाणून घ्या लेटेस्ट दर
सोने दरातील घसरणीला ब्रेक, सोनं 3 हजारांनी तर चांदी 5000 रुपयांनी महागली, जाणून घ्या लेटेस्ट दर
BLOG : सचिनभाऊ अभिनंदन, आतातरी बंद गिरण्या सुरू व्हाव्यात; सत्तेतूनच निघू शकतो मार्ग
BLOG : सचिनभाऊ अभिनंदन, आतातरी बंद गिरण्या सुरू व्हाव्यात; सत्तेतूनच निघू शकतो मार्ग
सेल्फीच्या जमान्यात 'ऑटोग्राफ प्लीज'; अंमली पदार्थविरोधी कार्यक्रमानंतर पोलीस अधिकाऱ्याकडे धावली शाळकरी मुले
सेल्फीच्या जमान्यात 'ऑटोग्राफ प्लीज'; अंमली पदार्थविरोधी कार्यक्रमानंतर पोलीस अधिकाऱ्याकडे धावली शाळकरी मुले
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 जुलै 2026 | गुरुवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 जुलै 2026 | गुरुवार 
Knight Riders Cricket Ground: शाहरुख खानने थेट अमेरिकेत क्रिकेट स्टेडियम उभारलं! मैदानाची पहिली झलक देत काय म्हणाला? पुजाऱ्यांकडून विधीवत पूजा
शाहरुख खानने थेट अमेरिकेत क्रिकेट स्टेडियम उभारलं! मैदानाची पहिली झलक देत काय म्हणाला? पुजाऱ्यांकडून विधीवत पूजा
Bus Accident: धक्कादायक घटना, गुटखा थुंकायला बसमधून तोंड बाहेर काढलं; 17 वर्षीय युवकाचा हाकनाक जीव गेला
धक्कादायक घटना, गुटखा थुंकायला बसमधून तोंड बाहेर काढलं; 17 वर्षीय युवकाचा हाकनाक जीव गेला
मोफत तिकीट देण्यावरुन बसमध्येच तुफान राडा, कंडक्टरला जबर मारहाण; एसटी कर्मचाऱ्यांचा ठिय्या
मोफत तिकीट देण्यावरुन बसमध्येच तुफान राडा, कंडक्टरला जबर मारहाण; एसटी कर्मचाऱ्यांचा ठिय्या
उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, बद्रीनाथ मार्गावर दरड कोसळली; महाराष्ट्रातील अनेक प्रवासी गेल्या 12 तासांपासून एकाच जागेवर ताटकळले
उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, बद्रीनाथ मार्गावर दरड कोसळली; महाराष्ट्रातील अनेक प्रवासी गेल्या 12 तासांपासून एकाच जागेवर ताटकळले
Embed widget