Bharat Ratna : महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुलेंना भारतरत्न द्या, सुधीरभाऊंच्या मागणीला सर्वपक्षीय 100 आमदारांचा पाठिंबा
Bharat Ratna For Mahatma Jyotiba And Savitribai Phule: महात्मा फुले, सावित्रीबाई फुलेंना भारतरत्न देण्याची मुनगंटीवारांची मागणी केली आहे. तब्बल 100 आमदारांच्या सह्यांचे पत्र आज विधीमंडळात सादर केले जाणार आहे.

मुंबई- आद्य समाजसुधारक व वंचित समाजघटक आणि महिलांच्या शिक्षणासाठी आयुष्यभर संघर्ष करणारे महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न देण्यात यावा, अशी मागणी भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्याकडून करण्यात आली आहे. भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या मागणीला सर्वपक्षीय 100 आमदारांनी पाठिंबा दिला आहे. तब्बल 100 आमदारांच्या सह्यांचे पत्र आज विधीमंडळात सादर केले जाणार आहे. राज्य शासनाने केंद्राकडे आग्रह धरत शिफारस करण्याची विनंती करण्यात आली आहे. सोबतच, सुधीर मुनगंटीवार यांच्याकडून पंतप्रधान यांना पत्र देण्यात आलं आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून मागणी
महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांना भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान 'भारतरत्न' देण्यात यावा, ही मागणी प्रामुख्याने गेल्या अनेक वर्षांपासून करत आहे. महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न देऊन त्यांच्याप्रती आदर व्यक्त केला जावा, याआधी देखील राज्य सरकार केंद्राकडे शिफारस करण्यात आली आहे. महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न देऊन त्यांच्याप्रती आदर व्यक्त केला जावा, यासाठी राज्य सरकार केंद्राकडे शिफारस करेल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी 2016 मध्ये विधानसभेत दिले होते. त्यानंतर आता पुन्हा देखील ही मागणी जोर धरू लागली आहे.
महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न द्या, अशी मागणी भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्याकडून करण्यात आली आहे. सुधीर मुनगंटीवार यांच्या मागणीला सर्वपक्षीय 100 आमदारांचा पाठिंबा असल्याची माहिती आहे. तब्बल 100 आमदारांच्या सह्यांचे पत्र आज विधीमंडळात सादर केले जाणार आहे. राज्य शासनाने केंद्राकडे आग्रह धरत शिफारस करण्याची विनंती करण्यात आली आहे. सोबतच, सुधीर मुनगंटीवार यांच्याकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र देण्यात येणार आहे.
























