Dr. Babasaheb Ambedkar jayanti : आज भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे. या जंयती उत्साह आज राज्यभर साजरा केला जात आहे. जयंतीनिमित्त राज्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले जात आहे. नांदेडमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्य जयंतीनिमित्त चिमुकल्यांसह अबाल वृद्धांनी सलग अठरा तास अभ्यासाचा उपक्रम राबवत महामानव आंबडेकर यांची जयंती साजरी करण्यात येत आहे.




नांदेड शहरातील तक्षशिला बौद्ध विहारात हा अभिनव उपक्रम राबवण्यात आला आहे. याठिकाणी चिमुकल्यांनी अठरा तास अभ्यास करत अनोख्या पद्धतीने बाबासाहेबांना अभिवादन केले आहे. या सलग अठरा तास अभ्यास करण्याच्या उपक्रमात अबालवृद्धांसह युवक देखील मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अठरा अठरा तास अभ्यास करत देशाचे संविधान लिहिले आहे. त्याची नव्या पिढीला जाण रहावी यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला आहे.




14 एप्रिल म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवस, तसेच हा एक प्रमुख भारतीय सण व उत्सव आहे. हा उत्सव दरवर्षी भारतासह जगभरात साजरा केला जातो. हा सामाजिक, सांस्कृतिक तसेच धार्मिक स्वरूपाचा सण आहे. महाराष्ट्रासह भारतातील अनेक राज्यांत या दिवशी सार्वजनिक सुट्टी असते. आंबेडकरवादी लोक या दिनाला 'समता दिन' म्हणून तर महाराष्ट्र शासन 'ज्ञान दिन' म्हणून साजरा करते. 
डॉ. आंबेडकरांनी तब्बल 32 पदव्या संपादित केल्या होत्या. यामध्ये बीए, एमए, पीएचडी (अर्थशास्त्र), एमएससी (Provincial Decentralization of Imperial Finance in British India), बॅरिस्टर इन लॉ, डीएससी (The Problem of the Rupee – Its origin and its solution), एलएलडी (HIS achievements, Leadership and authoring the constitution of India), डी.लिट. या काही महत्वाच्या पदव्या आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्वांत महत्त्वाची संकल्पना मांडली ती ‘शेतीचे राष्ट्रीयकरण’ करण्याची. शासनाने शेतजमिनी ताब्यात घेऊन, त्या विकसित कराव्यात, अशा विकसित शेतजमिनी शेतकऱ्यांना काही अटींवर कसण्यासाठी द्याव्यात. हा एका अर्थाने सामुदायिक शेतीचाच प्रयोग होता. अशी शेती करण्यासाठी शासनाने अधिनियम बनवावेत. पीकपद्धती, पाणी उपलब्धता, बांधबंदिस्ती, उत्पादकता वाढ, साठवण व्यवस्था, शेतमालाची विक्री, शेतमालाचे भाव या संदर्भात स्पष्ट नियम करावेत. यामुळे कोणत्याही एकाच पिकाखाली मोठे क्षेत्र येऊन, शेतमालाच्या उपलब्धतेत विषमता येणार नाही.