एक्स्प्लोर

Maharashtra Education: विद्यार्थ्यांकडे शाळा सोडल्याचा दाखला नसेल तरीही प्रवेश द्यावा, शिक्षण विभागाचा महत्वपूर्ण निर्णय

शाळेच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांकडे शाळा सोडल्याचा दाखला (TC/LC)नसल्यास सुद्धा विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात यावा. शाळा सोडल्याचा दाखला नसल्यास विद्यार्थ्यांच्या जन्म प्रमाणपत्रवर विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात यावा, असा महत्वाचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. 

मुंबई : शाळेच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांकडे शाळा सोडल्याचा दाखला (TC/LC)नसल्यास सुद्धा विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात यावा. शाळा सोडल्याचा दाखला नसल्यास विद्यार्थ्यांच्या जन्म प्रमाणपत्रवर विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात यावा, असा महत्वाचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. 

शासन निर्णयात म्हटलं आहे की, प्रत्येक मुलाला शिकण्याचा तसेच एका शाळेतून दुसऱ्या शाळेत प्रवेश घेण्याचा अधिकार आहे. सध्याच्या कोरोना काळात असामान्य परिस्थितीत आर्थिक कारणांमुळे शालेय शुल्क भरू न शकलेल्या विद्यार्थ्यांना शाळा सोडल्याचा दाखला (T.C/L.C) काही शाळा नाकारत असल्याचे कळत आहे, असं यात म्हटलं आहे.

शाळा सोडल्याचा दाखला नसल्याने विद्यार्थ्यांना इतर शासकीय व अनुदानित शाळांत प्रवेश नाकारला जात असल्याचे कळते. केवळ L.C./T.C. नसल्याने विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारणे अन्यायकारक तसेच RTE कायद्याची पायमल्ली करणारे आहे. त्यामुळे सरकारने अतिशय महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

ज्या विद्यार्थ्यांना त्यांचा T.C/L.C उशिरा दिला जात असेल किंवा नाकारला असेल अशा विद्यार्थ्यांना तात्पुरता प्रवेश देऊन तरतुदीनुसार पुढील कार्यवाही करावी. शिक्षण अधिकार कायद्यांतर्गत आठवीपर्यंत अशी तरतूद आहे. हा नियम आता नववी-दहावीच्या प्रवेशासाठी सुद्धा लागू केला आहे, असंही या निर्णयात म्हटलं आहे. 

विद्यार्थ्यांना TC/LC अभावी प्रवेश नाकारू नये. विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये, याची मुख्याध्यापकांनी दक्षता घ्यावी. विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहिल्यास संबंधित मुख्याध्यापक / शाळाप्रमुख यांच्याविरुद्ध नियमातील व कायद्यातील तरतुदीनुसार योग्य ती कारवाई केली जाईल. 

पूर्वीच्या शाळेकडून LC/TC प्राप्त न झाल्यास प्रवेशित होणाऱ्या शाळेत विद्यार्थ्यांना वयानुरूप वर्गात प्रवेश द्यावा. यासाठी विद्यार्थ्यांचे जन्माचे प्रमाणपत्र पुरावा म्हणून ग्राह्य धरावे, असं या निर्णयात म्हटलं आहे. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

बीड महिला अत्याचारप्रकरणाची मुंबईतून दखल; पोलीस पाटील अन् ग्रामसेवकावरही गुन्हा दाखल करण्याचे निर्देश
बीड महिला अत्याचारप्रकरणाची मुंबईतून दखल; पोलीस पाटील अन् ग्रामसेवकावरही गुन्हा दाखल करण्याचे निर्देश
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 मार्च 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 मार्च 2026 | रविवार
मोठी बातमी! प.बंगालसह 5 राज्यातील विधानसभा निवडणुकांची तारीख जाहीर; दोन टप्प्यात मतदान, 4 मे रोजी निकाल
मोठी बातमी! प.बंगालसह 5 राज्यातील विधानसभा निवडणुकांची तारीख जाहीर; दोन टप्प्यात मतदान, 4 मे रोजी निकाल
Chhatrapati Sambhajinagar News : मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि मनोज जरांगे यांच्या विरोधात पोलिस महानिरीक्षकांकडे तक्रार; नेमकं कारण काय?
मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि मनोज जरांगे यांच्या विरोधात पोलिस महानिरीक्षकांकडे तक्रार; नेमकं कारण काय?

व्हिडीओ

Baramati Rahuri Election : बारामती, राहुरीची पोटनिवडणूक 23 एप्रिलला, निवडणूक आयोगाची माहिती
North Korea Ballistic missile: एकीकडे इराण Vs अमेरिका युद्ध शिगेला, दुसरीकडे किम जोंग उन मैदानात, उत्तर कोरियाने 10 बॅलेस्टिक मिसाईल सोडल्या
Kishori Pednekar on Ritu Tawde : मुंबईच्या महापौर पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांपेक्षा मोठ्या झाल्या का? पेडणेकर आक्रमक
kharg Island Special Report : इराणच्या मुकूटमणीवर अमेरिकेचा शक्तिशाली बॉम्बहल्ला
Election Comission PC : 5 राज्यांच्या निवडणुकांचे बिगुल वाजणार? निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
West Bengal: निवडणूक जाहीर होताच पहिला ओपिनियन पोल आला; पश्चिम बंगालमध्ये कोणाची सत्ता? भाजप-तृणमूलमध्येच जोरदार टक्कर
पश्चिम बंगालमध्ये कोणाची सत्ता? तृणमूल काँग्रेस आणि भाजपमध्ये जोरदार लढत, पहिला ओपिनियन पोल समोर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 मार्च 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 मार्च 2026 | रविवार
SA vs NZ :  दक्षिण आफ्रिकेनं टी 20 वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीतील पराभवाचा वचपा काढला, न्यूझीलंडवर 7 विकेटनं दणदणीत विजय
दक्षिण आफ्रिकेनं टी 20 वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीतील पराभवाचा वचपा काढला, न्यूझीलंडवर 7 विकेटनं दणदणीत विजय
बीड महिला अत्याचारप्रकरणाची मुंबईतून दखल; पोलीस पाटील अन् ग्रामसेवकावरही गुन्हा दाखल करण्याचे निर्देश
बीड महिला अत्याचारप्रकरणाची मुंबईतून दखल; पोलीस पाटील अन् ग्रामसेवकावरही गुन्हा दाखल करण्याचे निर्देश
West Bengal Election in 2 phases: केरळ, तमिळनाडू एकाच टप्प्यात अन् पश्चिम बंगालमध्ये दोन टप्प्यात मतदान; सीएम ममता अन् केरळात डाव्यांसमोर गड राखण्याचे आव्हान
केरळ, तमिळनाडू एकाच टप्प्यात अन् पश्चिम बंगालमध्ये दोन टप्प्यात मतदान; सीएम ममता अन् केरळात डाव्यांसमोर गड राखण्याचे आव्हान
Baramati and Rahuri By Election : बारामती आणि राहुरीची पोटनिवडणूक जाहीर, 23 एप्रिलला मतदान, मतमोजणी 'या' दिवशी, निवडणुकीचं संपूर्ण वेळापत्रक, जाणून घ्या
बारामती आणि राहुरीची पोटनिवडणूक जाहीर, 23 एप्रिलला मतदान, मतमोजणी 'या' दिवशी, निवडणुकीचं संपूर्ण वेळापत्रक
West Bengal Election: निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेतील अवघा दीड बाकी असतानाच सीएम ममता बॅनर्जींचा मास्टरस्ट्रोक!
निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेतील अवघा दीड बाकी असतानाच सीएम ममता बॅनर्जींचा मास्टरस्ट्रोक!
मोठी बातमी! प.बंगालसह 5 राज्यातील विधानसभा निवडणुकांची तारीख जाहीर; दोन टप्प्यात मतदान, 4 मे रोजी निकाल
मोठी बातमी! प.बंगालसह 5 राज्यातील विधानसभा निवडणुकांची तारीख जाहीर; दोन टप्प्यात मतदान, 4 मे रोजी निकाल
Embed widget