एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
गणित चुकल्याने विद्यार्थ्याच्या तोंडात लाकडी छडी कोंबली!
शिक्षकाच्या या अमानूष शिक्षेमुळे रोहनच्या तोंडातील अवयवांना जखमा झाल्या असून, रोहनला श्वसनास त्रास सरु झाला आहे.
![गणित चुकल्याने विद्यार्थ्याच्या तोंडात लाकडी छडी कोंबली! student beaten by teacher in ahmednagar गणित चुकल्याने विद्यार्थ्याच्या तोंडात लाकडी छडी कोंबली!](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/04/14155750/ahmednagar-boy.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
अहमदनगर : अहमदनगरला गणित चुकल्यानं 8 वर्षीय विद्यार्थ्याच्या तोंडात लाकडी छडी कोंबून शिक्षकाने मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. रोहन जंजीरे असे विद्यार्थ्याचे नाव असून, तो दुसरी इयत्तेत शिकतो आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील पिंपळवाडी जिल्हा परिषदेच्या शाळेत ही धक्कादायक घटना घडली. चंद्रकांत शिंदे असे या मारहाण करणाऱ्या शिक्षकाचे नाव आहे.
पिंपळवाडी जिल्हा परिषदेच्या शाळेतली घटना, दहा तारखेला सकाळी अकरा वाजता दुसरीतल्या रोहन जंजीरे या आठ वर्षीय विद्यार्थ्याला मारहाण, चंद्रकांत शिंदे नावाच्या शिक्षकानं केली मारहाण,
शिक्षकाच्या या अमानूष शिक्षेमुळे रोहनच्या तोंडातील अवयवांना जखमा झाल्या असून, रोहनला श्वसनास त्रास सरु झाला आहे. रोहनला पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये उपचरासाठी दाखल करण्यात आले आहे.
या प्रकरणी रोहनच्या आईने कर्जत पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी गुन्हा म्हणून नोंदवून घेतला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांनी सुरु केला आहे.
Khelo khul ke, sab bhool ke - only on Games Live
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बॉलीवूड
ट्रेडिंग न्यूज
ठाणे
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion