एक्स्प्लोर

भटक्या कुत्र्याचा बाळावर हल्ला, तुटलेले कान कॅरीबॅगमध्ये घेऊन रुग्णालयात

सोलापूर जिल्ह्यातल्या माणकेश्वर गावात घडलेली घटना ऐकून थक्क व्हाल. अंगणात खेळणाऱ्या एका चिमुकल्यावर हल्ला करून कुत्र्याने त्याचे कान तोडले.

सोलापूर: राज्यात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव काही कमी व्हायचं नाव घेत नाही. कालपर्यंत रस्त्यावर जाणाऱ्या लोकांचा चावा घेणारी कुत्री आता चिमुकल्यांच्या जीवावर उठली आहे. सोलापूर जिल्ह्यातल्या माणकेश्वर गावात घडलेली घटना ऐकून थक्क व्हाल. अंगणात खेळणाऱ्या एका चिमुकल्यावर हल्ला करून कुत्र्याने त्याचे कान तोडले.  दीड वर्षाच्या या जखमी  बालकावर सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दीड वर्षाच्या या बालकावर भटक्या कुत्र्याने केलेला हल्ला पाहून जशी पालकांची घाबरगुंडी झाली, तसंच या बालकाची अवस्था पाहिल्यावर सामान्य नागरिकही हळहळला.  बार्शी तालुक्यातील माणकेश्वर गावात ही घटना घडली. भटक्या कुत्र्याने अक्षरशः चिमुकल्याचे कान तोडले. दीड वर्षाच्या या मुलाचा कान कुरतडून बाजूला काढला. ताहेर बादेला असं जखमी झालेल्या मुलाचं नाव आहे. प्राथमिक उपचार करून या बाळाला उपचारासाठी सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तुटलेले कान पालकांनी कॅरीबॅगमध्ये आणलेलं पाहून डॉक्टरांच्या अंगावरही शहारे आले. ताहेरला अंगणात खेळत असताना कुत्र्याने  जबर चावा घेतला. बाळाचं ओरडणं ऐकून बाहेर आलेल्या आईने कुत्र्याला हुसकवून लावलं खरं. पण तोपर्यंत बाळाचे कान वेगळे झाले होते. आता शासकीय रुग्णालयात बालकावर उपचार सुरु आहेत. भटक्या कुत्र्यांची वाढलेली संख्या, चावा घेतल्याने होणारा रेबीज, शासकीय रुग्णालयात असणारी रेबीज प्रतिबंधक लसीची कमतरता आणि रस्स्यावर कुत्रे आडवे येऊन होणारे अपघात.  यावर उपाययोजना होत नसल्याने भटक्या कुत्र्यांची समस्या गंभीर बनत चालली आहे. या बाळाला आणखी 6 सहा दिवस शासकीय रुग्णालयात ठेवण्यात येणार आहे. जखमा खोल असल्याने भरून येण्यासाठी वेळ लागेल. शिवाय तुटलेल्या कानावर प्लास्टिक सर्जरी करता येते का याचा विचार रुग्णालय प्रशासन करत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

हुकुमशाही आहे की आणीबाणी! भाजपला परिणाम भोगावेच लागतील, CJP च्या आंदोलनावरुन दावनेंचा सरकारवर हल्लाबोल 
हुकुमशाही आहे की आणीबाणी! भाजपला परिणाम भोगावेच लागतील, CJP च्या आंदोलनावरुन दावनेंचा सरकारवर हल्लाबोल 
सरकार सध्या गुंडगिरीच्या भूमिकेत; दिल्लीत आंदोलकांची धरपकड, अभिजीत दिपकेंना अटक, जरांगे पाटील संतापले
सरकार सध्या गुंडगिरीच्या भूमिकेत; दिल्लीत आंदोलकांची धरपकड, अभिजीत दिपकेंना अटक, जरांगे पाटील संतापले
केजरीवाल, ममता बॅनर्जी, ध्रुव राठी ते अभिजीत दिपके, दिल्ली पोलिसांकडून हजारो आंदोलक जेरबंद, सरकारविरोधात विरोधी पक्षांचा संताप
केजरीवाल, ममता बॅनर्जी, ध्रुव राठी ते अभिजीत दिपके, दिल्ली पोलिसांकडून हजारो आंदोलक जेरबंद, सरकारविरोधात विरोधी पक्षांचा संताप
Nitesh Rane: नितेश राणेंचा ध्रुव राठी अन् CJP आंदोलकांवर घणाघाती हल्ला; म्हणाले,
नितेश राणेंचा ध्रुव राठी अन् CJP आंदोलकांवर घणाघाती हल्ला; म्हणाले, "मोदींना शिव्या देणारे वाचत आहेत पाकिस्ताची स्क्रिप्ट"

व्हिडीओ

Sanjay Raut Pune :पंतप्रधान म्हणून यंदा मोदींचा शेवटचा वाढदिवस असेल, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
Datta Bharne Vijay Shivtare : वाहिनी गप्पा मारणारी आणि जास्त कानाला लागणारी माणसं आता ओळखा
Abhijeet Dipke On Delhi Protest : CJP आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी का नाकारली?
Nana Patekar Funeral Full VIDEO : 'नटसम्राट' अनंतात विलीन.. डोणजे गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Abhijeet Dipke on PM Modi : 'मोदींनी 'आणीबाणी'अधिकृत ठरवली', अभिजीत दिपकेंची टीका : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'भारत अघोषित आणीबाणीत, अटकेतील आंदोलकांची उद्यापर्यंत सुटका झाली नाही, तर..' सोनम वांगचूक यांचा गर्भित इशारा, दिल्लीतील रस्त्यावरची उचलाउचली पाहून निर्णय अवघ्या काही तासात बदलला
'भारत अघोषित आणीबाणीत, अटकेतील आंदोलकांची उद्यापर्यंत सुटका झाली नाही, तर..' सोनम वांगचूक यांचा गर्भित इशारा, दिल्लीतील रस्त्यावरची उचलाउचली पाहून निर्णय अवघ्या काही तासात बदलला
Satara News : ज्वेलर्सचं दुकान फोडत 4 किलो चांदी, 4 तोळे सोन्याची चोरी, चोरट्यांचा डाव हाणून पाडत पोलिसांकडून चार तासात करेक्ट कार्यक्रम, दोघांना बेड्या 
साताऱ्यात ज्वेलर्सचं दुकान फोडून 10 लाखांचे दागिने पळवले, पोलिसांकडून 4 तासात करेक्ट कार्यक्रम
Gondia Crime News: वृद्ध महिलेला संपवलं; एक महिना तपास अन्...; चघळलेल्या सुपारीच्या तुकड्यामुळं सापडला आरोपी, शेजाऱ्यानेच..., गोंदियातील घटनेचा महिन्याने झाला उलगडा
वृद्ध महिलेला संपवलं; एक महिना तपास अन्...; चघळलेल्या सुपारीच्या तुकड्यामुळं सापडला आरोपी, शेजाऱ्यानेच..., गोंदियातील घटनेचा महिन्याने झाला उलगडा
सरकार सध्या गुंडगिरीच्या भूमिकेत; दिल्लीत आंदोलकांची धरपकड, अभिजीत दिपकेंना अटक, जरांगे पाटील संतापले
सरकार सध्या गुंडगिरीच्या भूमिकेत; दिल्लीत आंदोलकांची धरपकड, अभिजीत दिपकेंना अटक, जरांगे पाटील संतापले
Nitesh Rane: नितेश राणेंचा ध्रुव राठी अन् CJP आंदोलकांवर घणाघाती हल्ला; म्हणाले,
नितेश राणेंचा ध्रुव राठी अन् CJP आंदोलकांवर घणाघाती हल्ला; म्हणाले, "मोदींना शिव्या देणारे वाचत आहेत पाकिस्ताची स्क्रिप्ट"
केजरीवाल, ममता बॅनर्जी, ध्रुव राठी ते अभिजीत दिपके, दिल्ली पोलिसांकडून हजारो आंदोलक जेरबंद, सरकारविरोधात विरोधी पक्षांचा संताप
केजरीवाल, ममता बॅनर्जी, ध्रुव राठी ते अभिजीत दिपके, दिल्ली पोलिसांकडून हजारो आंदोलक जेरबंद, सरकारविरोधात विरोधी पक्षांचा संताप
Home Loan : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं रेपो रेट वाढवला, ऑक्टोबरमध्ये सर्वात कमी व्याज दरावर गृहकर्ज कोणती बँक देते?  
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं रेपो रेट वाढवला, ऑक्टोबरमध्ये सर्वात कमी व्याज दरावर गृहकर्ज कोणती बँक देते?  
केंद्रीय पथक दुष्काळ पाहणी दौरा; शेतकऱ्यांच्या डोळ्यातही पाणी, आयुक्त म्हणाले, 7 दिवसांत अहवाल येईल
केंद्रीय पथक दुष्काळ पाहणी दौरा; शेतकऱ्यांच्या डोळ्यातही पाणी, आयुक्त म्हणाले, 7 दिवसांत अहवाल येईल
Embed widget