Swabhimani Shetkari Sanghatana Raju Shetti : आयात शुल्क न लावता आपल्या देशात मका आयात (Import of maize) करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी केंद्र सरकारच्या पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विभागाने वाणिज्य मंत्रालयाकडे केलीय. ही मागणी चुकीची असून येत्या महिन्याभरात खरीप हंगामातील मक्का बाजारात येणार आहे. यामुळं हा निर्णय झाला तर मका उत्पादक शेतकरी संकटात सापडणार आहे. त्यामुळं सदरचा निर्णय घेण्यात येवू नये अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी वाणिज्य मंत्री पियुष गोयल व कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांचेकडे लेखी पत्राद्वारे केली.


देशांतर्गत मकेची किंमती घसरण्याची शक्यता


केंद्र सरकारकडून या निर्णयाची अंमलबजावणी झाल्यास अनेक महत्त्वपूर्ण समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. देशांतर्गत, मका आधीच अत्यंत कमी किमतीत विकला जातेय.  उत्पादन खर्च वाढल्यानं किमान आधारभूत किंमत (MSP) वाढवण्याची मागणी शेतकरी सातत्याने करत आहेत. आयात शुल्काशिवाय मक्याच्या आयातीला परवानगी दिल्यानं देशांतर्गत मक्याच्या किमती आणखी घसरतील. ज्यामुळं आमच्या मका उत्पादकांचा नाश होईल. मका हे एक महत्त्वाचे पीक आहे, विशेषत: निकृष्ट दर्जाची जमीन असलेल्या शेतकऱ्यांसाठी आणि प्रामुख्याने मराठवाडा आणि महाराष्ट्रातील विदर्भ प्रदेशात पीक घेतले जाते. कारण बहुतेकदा ते त्यांच्या उत्पन्नाचे एकमेव विश्वसनीय स्त्रोत आहे. यावर्षीचा मान्सून चांगला असल्याने शेतकऱ्यांना मक्याचे अधिक उत्पादन मिळेल. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत मका आयात करण्याची गरज नसल्याचे शेट्टींनी पत्रात म्हटलं आहे.


मकेची आयात थांबवावी, मक्याच्या किंमतीत वाढ करावी


देशातील पोल्ट्री उत्पादक लॉबीच्या दबावामुळं हा निर्णय घेण्यात आला असावा, असे दिसते. आपण पोल्ट्री उद्योगाच्या गरजा समजून घेत असताना, आपल्या शेतकऱ्यांच्या उपजीविकेच्या विरुद्ध असा निर्णय न घेता समतोल राखणे आवश्यक आहे. अल्पभुधारक असलेल्या मका उत्पादक शेतकऱ्यांना योग्य मोबदला देण्यासाठी मक्याच्या किंमतीत वाढ करण्यात यावी, देशांतर्गत किंमतीत आणखी घसरण रोखण्यासाठी परदेशातून मक्याची आयात तात्काळ थांबवण्याची मागणी राजू शेट्टी यांनी केली आहे. मका हे एक महत्वाचे पीक आहे. विशेषत मराठवाडा आणि विदर्भात या पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. यावर्षी मान्सूनचा पाऊस चांगला झाला आहे. त्यामुळं मकेच्या पिकातून शेतकऱ्यांना चार पैसे मिळण्याची अपेक्षा आहे.


महत्वाच्या बातम्या:


'लोकसभेला फटका बसला, विधानसभेला बसायची वाट पाहू नका', राजू शेट्टींचा दूध दरावरून सरकारला इशारा