कोल्हापूर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आज कोल्हापूर पूरपरिस्थितीचा पाहणी करण्यासाठी दौऱ्यावर आहेत. दोघांनीही कोल्हापुरातील विविध पूरग्रस्त भागात जाऊन पाहणी केली.  "मी पॅकेज जाहीर करणारा मुख्यमंत्री नसून मदत जाहीर करणारा मुख्यमंत्री आहे" असा टोला फडणवीसांना लगावला. त्यानंतर फडणवीसांनी देखील या वर प्रतिक्रिया दिली आहे. 


देवेंद्र फडणवीस म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी मदतीला पॅकेज म्हणावं की मदत हा त्यांचा प्रश्न आहे. पण जे पण असेल त्याची  घोषणा लवकर करावी. सामन्य माणसाला मदत लवकरात लवकर मिळाली पाहिजे.  माझ्या दौऱ्यादरम्यान बऱ्याच लोकांकडून 2019 च्या मदतीची आठवण करण्यात आली. पाच हजार, 10 हजार किंवा आणखी काही ही तातडीची मदत गरजेची असते.  पूर ओसरल्यानंतर तातडीच्या मदतीच्या प्रतीक्षेत लोक असतात. व्यापाऱ्यांना देखील आता सरकारने मदत केली पाहिजे. सरकारने नुकसानग्रस्तांना तात्काळ मदत करावी ही आमची मागणी आहे. 



तातडीची मदत यायला उशीर  झाला 


अलमट्टी आणि राधानागरीचाही विसर्ग मोठा नाही. काही ठिकाणची उच्चपुर रेषा ही 2019 पेक्षा जास्त असल्याचं पाहायला मिळालं. कोल्हापुरात जवळजवळ 396 गाव पुराने बाधित आहेत. दोन लाखांच्या पेक्षा जास्त लोकांवर परिणाम झाला आहे. प्रशासकीय इमारती, शाळा, घरे दुकाने यांचाही मोठं नुकसान झाले आहे. हे सगळं नुकसान झाल्यानंतर राज्य सरकारकडून जी काही तातडीची मदत यायला हवी होती ती अद्याप आलेली नाही. लोक सातत्याने मदतीची विचारणा करत आहे. 


पिकांची नुकसान भरपाई द्यावी 


महावितरण नवीन मीटर स्वतः लोकांना आणायला सांगत आहे तसे न होता महावितरणने स्वतः ते बसवायला हवं. शेतीचही मोठं नुकसान झालेल आहे. पिकांची नुकसान भरपाई द्यावी लागेल. पूरग्रस्त भागाच मागच्या वेळी कर्जमाफ केलं होतं तसच यावेळीही करायला हवं, सध्याची परिस्थिती पाहता सरकारने तात्काळ दिलासा द्यावा. कुंभार समाज जो गणेशमूर्ती बनवतो त्यांचंही मोठं नुकसान झालं. सात हजार मुर्त्या खराब झाल्या आहेत. त्यांना मदत करून बिनव्याजी कर्ज कस देता येईल याकडेही सरकारने लक्ष द्यावे. फक्त कुंभार समाज नाही तर इतरही काही घटक आहे त्यांनाही दिलासा हवा, असे देखील फडणवीस म्हणाले. 



फडणवीस म्हणाले,  नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे पश्चिम महाराष्ट्रात मोठं नुकसान झालं त्याचा आढावा घेण्याकरता आणि लोकांशी बोलण्याकरता आम्ही तीन दिवसांचा दौरा केला. नंतर आम्हाला चंद्रकांतदादा पाटील देखील या दौऱ्यात सहभागी  झाले  या तीन जिल्ह्यातल्या 22 ठिकाणी आम्ही भेट दिली आणि लोकांशी बोललो. भूस्खलन होत तिथे गेलो, पाणी भरलं होत तिथे गेलो.  सामान्य लोकांच्या अडचणी समजावून घेतल्या. ही परिस्थिती पाहिल्यावर वाटत की याचा विशेष अभ्यास करावा लागेल. 2005 साली जो पाऊस झाला होता. तो खुप मोठा होता जो 21 दिवसात पडला होता.2019 साली देखील तीच परिस्थिती होती. यावेळचा पाऊस जास्त पडला आणि तेही फक्त 5 दिवसात पडला. सरासरीपेक्षा 50 टक्के जास्त पाऊस पडला आहे.  मागच्या वेळी 2019 ला ज्यावेळी पूर आला त्यावेळी अभ्यास करून 22 छोट्यामोठ्या ब्रिजचा आराखडा तयार करण्यात आला होता. चंद्रकांत पाटील आणि महाडिक यांनी मेहनत घेऊन तो तयार केला होता. तोही इथे गरजेचा पडेल त्याचाही विचार करावा.


संबंधित बातम्या :


पूरग्रस्त नागरिकांच्या मदतीत राजकारण नको, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे विरोधकांना आवाहन


मुख्यमंत्री ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस कोल्हापुरात एकाच ठिकाणी पाहणीला, हे कसं घडलं, वाचा इनसाईड स्टोरी