कोल्हापूर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आज कोल्हापूर पूरपरिस्थितीचा पाहणी करण्यासाठी दौऱ्यावर आहेत. दोघांनीही कोल्हापुरातील विविध पूरग्रस्त भागात जाऊन पाहणी केली.  जिथं मुख्यमंत्री येणार होते तिथेच फडणवीस देखील पोहोचले. मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते दोघेही एकाच ठिकाणी शाहुपुरीत भेटले. मात्र हे  दोघं एकत्र भेटण्याआधी काय घडलं? याबाबतची ही इनसाईड स्टोरी.

Continues below advertisement


त्याचं झालं असं, उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस वेगवेगळ्या ठिकाणी होते.  याची माहिती उद्धव ठाकरेंना मिळताच देवेंद्र फडणवीसांना तिकडेच थांबण्याचा निरोप पाठवला गेला.  शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांनी देवेंद्र फडणवीस यांना उद्धव ठाकरेंचा निरोप पाठवला.  “वेगवेगळी पाहणी करण्यापेक्षा एकत्र पाहणी करूया” असा फोन उद्धव ठाकरेंकडून देवेंद्र फडणवीसांना गेला.  त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांची विनंती मान्य करून शाहुपुरीतच थांबण्याचा निर्णय घेतला.  त्यानंतर एकत्र पाहणी झाली.


 पूरग्रस्तांना तातडीची मदत तर दिलीच पाहिजे, मात्र यावर कायमस्वरुपी उपाय काढावा, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मागणी केली आहे.