एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 4 टक्क्यांची वाढ
राज्य सरकारकडून आज गुरुवारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 4 टक्क्यांची वाढ करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली.
मुंबई : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना घटस्थापनेदिवशीच शासनानं खुशखबर दिली आहे. राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ४ टक्के वाढ करण्याचा निर्णय शासनानं घेतला आहे. त्यामुळे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्याचा दर 132 वरून 136 इतका झाला आहे.
राज्य सरकारकडून आज गुरुवारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 4 टक्क्यांची वाढ करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली. वाढीव महागाई भत्त्यासह पगारवाढ 1 जानेवारी 2017 पासून लागू होईल. यातील ऑगस्टपासूनचा महागाई भत्ता कर्मचाऱ्यांना रोख स्वरुपात तर जानेवारी 2017 ते जुलै 2017 या 7 महिन्यांचा भत्ता कशाप्रकारे द्यायचा याबाबत वेगळा अध्यादेश सरकार काढणार आहे.
यापूर्वी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात एप्रिलमध्ये 7 टक्क्यांची वाढ करण्यात आली होती. एप्रिलमध्ये राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 132 टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आला होता. यात आता अजून 4 टक्क्यांची भर पडली आहे.
राज्य सरकारच्या या निर्णयाचा फायदा राज्य सरकारच्या 16 लाख कर्मचारी आणि 6 लाख निवृत्तीवेतनधारकांना होणार आहे. नुकतीच केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात एक टक्क्यानं वाढ करण्यात आली होती. 50 लाख केंद्र सरकारी कर्मचारी आणि 61 लाख निवृत्त वेतनधारकांना याचा फायदा मिळणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
ठाणे
महाराष्ट्र
Advertisement