एक्स्प्लोर

'चिअर्स' महाग! महाराष्ट्रात आजपासून बिअरची दरवाढ

राज्य सरकारने माईल्ड बिअरवर 25 टक्क्यांनी, तर स्ट्राँग बिअरवर 35 टक्क्यांनी जकात कर वाढवला आहे.

मुंबई : बिअर पिऊन चिल आऊट करणाऱ्या मद्यप्रेमींच्या खिशाला आता आणखी चाट पडणार आहे. एक्साईज कर 25 ते 35 टक्के वाढवल्यामुळे महाराष्ट्रात बिअरचे दर वाढणार आहेत. माईल्ड बिअरचा पिंट (330 मिली) पिण्यासाठी 3 रुपये, तर स्ट्राँग बिअर पिण्यासाठी साडेचार रुपये अधिक मोजावे लागणार आहेत. माईल्ड बिअरची पूर्ण बॉटल (650 मिली) रिचवण्यासाठी 5 रुपये, तर स्ट्राँग बिअरच्या पूर्ण बॉटलसाठी साडेसहा रुपयांची दरवाढ होणार आहे. राज्य सरकारने माईल्ड बिअरवर 25 टक्क्यांनी, तर स्ट्राँग बिअरवर 35 टक्क्यांनी जकात कर वाढवला आहे. मॅन्युफॅक्चरिंग कॉस्टवर एक्साईज ड्युटी मोजली जाते. विक्रीची किंमत किंवा एमआरपी ही व्हॅट (35 टक्के) आकारल्यानंतर ठरते. त्यामुळे प्रत्येक ब्रँडची नवीन किंमत येत्या काही दिवसात स्पष्ट होईल. किंगफिशर, कार्ल्सबर्ग, बडवाईजर यासारख्या ब्रँड्सच्या पिंटची किंमत 60 ते 100 रुपयांच्या घरात आहे, तर एका बॉटलसाठी सध्या 110 ते 230 रुपयांच्या दरम्यान रक्कम मोजावी लागते. आधीचा फॉर्म्युला माईल्ड बिअरवर एक्साईज ड्युटीसाठी मॅन्युफॅक्चरिंग कॉस्टवर 150 टक्के किंवा प्रतिलीटर 33 रुपये यापैकी जे जास्त असेल, ती रक्कम आकारली जात होती. त्यानंतर मॅन्युफॅक्चरिंग कॉस्टवर 175 टक्के किंवा प्रतिलीटर 42 रुपये यापैकी जे जास्त असेल, ती रक्कम आकारण्याचा फॉर्म्युला तयार करण्यात आला. स्ट्राँग बिअरवर एक्साईज ड्युटीसाठी मॅन्युफॅक्चरिंग कॉस्टवर 200 टक्के किंवा प्रतिलीटर 60 रुपये यापैकी जे जास्त असेल, ती रक्कम आकारली जात होती. त्यानंतर मॅन्युफॅक्चरिंग कॉस्टवर 235 टक्के किंवा प्रतिलीटर 80 रुपये यापैकी जे जास्त असेल, ती रक्कम आकारण्यात येईल. महाराष्ट्रात वर्षाला 33 कोटी लिटर बिअरची विक्री होते. त्यामुळे जकात कर वाढवल्यामुळे वार्षिक महसूल 150 कोटी रुपयांनी वाढेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे, महाराष्ट्रातील वाईन इंडस्ट्रीला चालना देण्यासाठी वाईनवर एक्साईज आकारला जात नाही. नाशकातील वाईन ब्रँड्सना प्रमोट करण्याचा सरकारचा हेतू आहे.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Ashok Kharat: भोंदू अशोक खरातकडे 4 सिमकार्ड, महिलांसाठी खास नंबर, 3 कार्डवरून 3 वेगळे कांड, SIT तपासात हादरवणारी माहिती
भोंदू अशोक खरातकडे 4 सिमकार्ड, महिलांसाठी खास नंबर, 3 कार्डवरून 3 वेगळे कांड, SIT तपासात हादरवणारी माहिती
Maharashtra Live blog updates: मुंबईतील गृहिणीला तोतया पोलिसांनी लुटले, 2 लाख घेऊन पसार
Maharashtra Live blog updates: मुंबईतील गृहिणीला तोतया पोलिसांनी लुटले, 2 लाख घेऊन पसार
Ashok Kharat Brother Dilip Kharat: भोंदू खरातच्या भावाचा 'शालार्थ आयडी' घोटाळ्यात समावेश? आता दिलीप खरात मैदानात; केसरकरांशी संबंधांच्या आरोपाबाबत सगळंच सांगितलं
भोंदू खरातच्या भावाचा 'शालार्थ आयडी' घोटाळ्यात समावेश? आता दिलीप खरात मैदानात; केसरकरांशी संबंधांच्या आरोपाबाबत सगळंच सांगितलं
Sushma Andhare On Ashok Kharat Case: अशोक खरातसोबत भागीदार, दोघांचे पाप सारखेच; सुषमा अंधारेंनी आणखी एक नाव बाहेर काढलं!
अशोक खरातसोबत भागीदार, दोघांचे पाप सारखेच; सुषमा अंधारेंनी आणखी एक नाव बाहेर काढलं!

व्हिडीओ

Sanjay Raut PC : खरातच्या हमाममध्ये सगळेच नग्न, कुणा-कुणाची नावं घेणार, एसआयटीने नावं जाहीर करावीत
Eknath Khadse Jalgaon : महार वतनाच्या जमीन हडपल्याचा आरोप, एकनाथ खडसे काय म्हणाले?
Ashok Kharat Book : खरातची अंधभक्ती, आत्मचरित्रात स्तुती, पुस्तकातली भाकणूक, भोळ्या भक्तांची फसवणूक Special Report
Satara SP Tushar Doshi Compulsory Leave : सक्तीची सुट्टी वादाची मुक्ती? Special Report
Mohit Kamboj Aditya Thackeray : राजकीय खुन्नस ते बर्थडे पार्टी,चर्चांना जोर... Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ashok Kharat Crime: महिलांना दिवस जाऊ नयेत म्हणून अशोक खरात... एसआयटीच्या तपासात धक्कादायक अँगल समोर, नाशिकमधील डॉक्टर पोलिसांच्या रडारवर
महिलांना दिवस जाऊ नयेत म्हणून अशोक खरात... एसआयटीच्या तपासात धक्कादायक अँगल समोर, नाशिकमधील डॉक्टर पोलिसांच्या रडारवर
Gokul Election : गोकुळचं राजकारण भाजपला वगळून शक्य नाही, निवडणुकीचा निर्णय महायुती म्हणून घेऊ; चंद्रकांत पाटलांचा रोख कुणाकडे?
गोकुळचं राजकारण भाजपला वगळून शक्य नाही, निवडणुकीचा निर्णय महायुती म्हणून घेऊ; चंद्रकांत पाटलांचा रोख कुणाकडे?
Mumbai Crime news: वडिलांसोबतच्या भांडणाचा राग चिमुरड्यावर काढला, रिक्षातून बाहेर काढून जोरात जमिनीवर आपटलं, रक्ताची उलटी, वसईत हादरवणारी घटना
वडिलांसोबतच्या भांडणाचा राग चिमुरड्यावर काढला, रिक्षातून बाहेर काढून जोरात जमिनीवर आपटलं, रक्ताची उलटी, वसईत हादरवणारी घटना
राज्यात अवकाळीचा तडाखा! गारपीट, विजांचा कडकडाट अन् वादळी पाऊस; गहू, मका, आंबा जमीनदोस्त, आज कुठे हाय अलर्ट?
राज्यात अवकाळीचा तडाखा! गारपीट, विजांचा कडकडाट अन् वादळी पाऊस; गहू, मका, आंबा जमीनदोस्त, आज कुठे हाय अलर्ट?
Rupali Chakankar and Ashok Kharat: नाशिकला पदराने अशोक खरातचे पाय पुसायला जायचात अन् आता म्हणताय, 'मी महिला, प्रवास जमणार नाही'; अंजली दमानियांची रुपाली चाकणकरांवर टीका
तेव्हा नाशिकला जायचात अन् आता म्हणताय, 'मी महिला, प्रवास जमणार नाही'; दमानियांची चाकणकरांवर टीका
Electricity Rates Decrease In Mumbai मोठी बातमी: बेस्ट, टाटा, अदानीच्या वीजदरात कपात, 1 एप्रिलपासून नवे दर लागू, पाहा जुने आणि नवीन दर!
मोठी बातमी: बेस्ट, टाटा, अदानीच्या वीजदरात कपात, 1 एप्रिलपासून नवे दर लागू, पाहा जुने आणि नवीन दर!
Share Market Crash : मार्च महिन्यात भारतीय शेअर बाजार घसरणीचे वारे , गुंतवणूकदारांचे तब्बल 44 लाख कोटी बुडाले, पुढं काय?
मार्च महिन्यात भारतीय शेअर बाजार घसरणीचे वारे , गुंतवणूकदारांचे तब्बल 44 लाख कोटी बुडाले, पुढं काय?
South Cinema Actress Net Worth: ना अनुष्का शेट्टी, ना समंथा अन् ना तमन्ना भाटीया; 'ही' साऊथची सर्वात श्रीमंत अभिनेत्री, एकूण संपत्ती 200 कोटी
ना अनुष्का शेट्टी, ना समंथा अन् ना तमन्ना भाटीया; 'ही' साऊथची सर्वात श्रीमंत अभिनेत्री, एकूण संपत्ती 200 कोटी
Embed widget