मुंबईराज्य शासनाच्यावतीने देण्यात येणारे शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार आज जाहीर करण्यात आले आहेत. येत्या 17 फेब्रुवारी रोजी गेट वे ऑफ इंडिया येथे राज्यपाल सी. विदयासागर राव यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात येणार असल्याची माहिती क्रीडा मंत्री विनोद तावडे यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेमध्ये दिली.

सन 2017-18 या वर्षांचे पुरस्कार देण्यात येणार असून खेळाडूमार्गदर्शकसंघटक आदींना गौरवण्यात येणार आहे. मल्लखांबसाठी योगदान देणाऱ्या उदय देशपांडे यांना सन 2017-18 यावर्षीचा जीवगौरव पुरस्कार तर साहसी क्रीडा पुरस्कार प्रियांका मोहिते  यांना जाहीर करण्यात आला आहे.

उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार 15 जणांना घोषित 

अमेय शामसुंदर जोशी (जिम्नॅस्टिक्स)सागर श्रीनिवास कुलकर्णी (जिम्नॅस्टिक्स)गजानन पाटीलपुणे ॲथलेटिक्समृणालीनी वैभव औरंगाबादकर (बुध्दीबळ)संजय बबन माने (कुस्ती)डॉ. भूषण पोपटराव जाधव (तलवारबाजी)उमेश रमेशराव कुलकर्णी (तायक्वोंदो)बाळकृष्ण मलप्पा भंडारी (तायक्वोंदो)स्वप्नील सुनील धोपाडे (बुध्दीबळ)निखिल सुभाष कानेटकर (बॅडमिंटन)सत्यप्रकाश माताशरन तिवारी (बॅडमिंटन)दिपाली महेंद्र पाटील (सायकलिंग)पोपट महादेव पाटील (कबड्डी)राजेंद्र प्रल्हाद शेळके (रोईंग)डॉ.लक्ष्मीकांत माणिकराव खंडागळे (वॉटरपोलो) यांना जाहीर झाला असल्याची घोषणा तावडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

सन 2017-18 या वर्षासाठी शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार खेळाडू

अ.क्रं खेळाचे नाव पुरुष महिला
1 आर्चरी प्रविण रमेश जाधव भाग्यश्री नामदेव कोलते
2   ॲथलेटिक्स सिध्दांत उमानंद थिंगलिया (थेट पुरस्कार) मोनिका मोतीराम आथरे (थेट पुरस्कार)
कालिदास लक्ष्मण हिरवे मनीषा दत्तात्रय साळुंखे
3 ट्रायथलॉन अक्षय विजय कदम --
4 वुशु शुभम बाजीराव जाधव श्रावणी सोपान कटके
5 स्केटिंग सौरभ सुशील भावे --
6 हॅण्डबॉल महेश विजय उगीले समीक्षा दामोदर इटनकर
7 जलतरण श्वेजल शैलेश मानकर युगा सुनिल बिरनाळे
8 कॅरम पंकज अशोक पवार मैत्रेयी दत्तात्रय गोगटे
9 जिम्नॅस्टिक्स सागर दशरथ सावंत दिशा धनंजय निद्रे
10 टेबल टेनिस सुनील शंकर शेट्टी --
11 तलवारबाजी अक्षय मधुकर देशमुख रोशनी अशोक मुर्तंडक
12 बॅडमिंटन अक्षय प्रभाकर राऊत नेहर पंडि
13 बॉक्सिंग -- भाग्यश्री शिवकुमार पुरोहित
14 रोईंग राजेंद्र चंद्रबहादुर सोनार पुजा अभिमान जाधव
15 शुटींग -- हर्षदा सदानंद निठवे
16 बिलीयर्डस अँड स्नूकर धृव आश्विन सित्वाला --
सिध्दार्थ शैलेश पारीख --
17 पॉवरलिप्टींग मनोज मनोहर गोरे अपर्णा अनिल घाटे
18 वेटलिप्टींग -- दिक्षा प्रदीप गायकवाड
19 बॉडीबिल्डींग दुर्गाप्रसाद सत्यनारायण दासरी --
20 मल्लखांब सागर कैलास ओव्हळकर --
21 आटयापाटया उन्मेष जीवन शिंदे गंगासागर उत्तम शिंदे
22 कबड्डी विकास बबन काळे सायल संजय केरीपाळे
23 कुस्ती उत्कर्ष पंढरीनाथ काळे रेश्मा अनिल माने
24 खो-खो अनिकेत भगवान पोटे ऐश्वर्या यशवंत सावंत
25 बुध्दीबळ राकेश रमाकांत कुलकर्णी (थेट पुरस्कार) दिव्या जितेंद्र देश्मुख (थेट पुरस्कार)
रोनक भरत साधवानी (थेट पुरस्कार) सलोनी नरेंद्र सापळे (थेट पुरस्कार)
हर्षिद हरनीश राजा (थेट पुरस्कार) --
26 लॉन टेनिस -- त्रृतुजा संपतराव भोसले
27 व्हॉलीबॉल -- प्रियांका प्रेमचंद बोरा
28 सायकलिंग रवींद्र बन्सी करांडे वैष्णवी संजय गभणे
29 स्कॅश महेश दयानंद माणगावकर उर्वशी जोशी
30 क्रिकेट -- स्मृती मानधना
31 हॉकी सुरज हरिशचंद्र करेकरा --

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (संघटक/कार्यकर्ते) म्हणून पुढीलप्रमाणे नावे घोषित करण्यात आली आहेत. यामध्ये मुंबई विभागाचे अंकुर भिकाजी आहेरपुणे विभागाचे महेश चंद्रकांत गादेकरकोल्हापूर विभागाचे मुन्ना बंडू कुरणेअमरावती विभागाचे डॉ.नितीन गणपतराव चवाळेनाशिक विभागाचे संजय आनंदराव होळकरलातूर विभागाचे जर्नादन एकनाथ गुपिलेनागपूर विभागाचे राजेंद्र शंकरराव भांडारकर यांचा समावेश आहे

तसेच सन 2017-18 या वर्षांसाठी  दिव्यांग खेळाडूंना एकलव्य राज्य क्रीडा पुरस्कार घोषित करण्यात आला आहे.

अ.क्रं पुरुष महिला
1 संदिप प्रल्हाद गुरव व्हीलचेअर -तलवारबाजी (थेट पुरस्कार) मानसी गिरीशचंद्र जोशी बॅडमिंटन (थेट पुरस्कार)
2 मार्क जोसेफ धर्माई बॅडमिंटन (थेट पुरस्कार) रुही सतीश शिंगाडे बॅडमिंटन (थेट पुरस्कार)
3 सुकांत इंदुकांत कदम बॅडमिंटन (थेट पुरस्कार) गीताजली चौधरी जलतरण
4 स्वरुप महावीर उन्हाळकर नेमबाजी (थेट पुरस्कार) --
5 चेतन गिरीधर राऊत जलतरण --
6 आदिल मोहमंद नाझिर अन्सारी आर्चरी (थेट पुरस्कार) --