मुंबई : हो-हो, नाही-नाही म्हणता म्हणता शिवसेना-भाजपमध्ये युतीच्या दिशेने पावलं पडताना दिसत आहेत. निवडणुका जसजशा जवळ येत आहेत, तसतसं राजकीय वातावरण तापायला सुरुवात होत आहे. त्यातच आता युतीची चर्चा करण्यासाठी दिल्लीतील भाजपचे राष्ट्रीय नेते 'मातोश्री'ची पायरी चढण्याची चिन्हं आहेत.
युतीच्या चर्चेसाठी भाजपची जोरदार लॉबिंग सुरु आहे. पुढील चर्चेसाठी भाजपचे अध्यक्ष अमित शाह, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राजनाथ सिंह असे वरिष्ठ नेते शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी 'मातोश्री'वर येण्याची शक्यता आहे. लोकसभा आणि विधानसभेत युती करण्यासाठी चर्चा होणार आहे.
अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे. सध्या अमित शाह आणि उद्धव ठाकरे यांच्यात फोनवरुन चर्चा सुरु असल्याची माहिती आहे. येत्या काही दिवसात युतीच्या चर्चांचा जोर वाढणार आहे.
चर्चा सफल ठरली तर युती अन्यथा स्वबळावर लढण्याची शिवसेनेची तयारी आहे. सध्या शिवसेना भाजपमध्ये लोकसभा आणि विधानसभेसाठी 50-50 जागवाटपाच्या फॉम्युर्ल्यावर बोलणी सुरु असल्याची माहिती आहे.
युतीच्या चर्चेसाठी अमित शाह, गडकरी, राजनाथ सिंह मातोश्रीवर येणार?
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
13 Feb 2019 01:58 PM (IST)
युतीच्या चर्चेसाठी भाजपची जोरदार लॉबिंग सुरु आहे. पुढील चर्चेसाठी भाजपचे अध्यक्ष अमित शाह, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राजनाथ सिंह असे वरिष्ठ नेते शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी 'मातोश्री'वर येण्याची शक्यता आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -