मुंबई : कोरोनाचा पुन्हा एकदा वाढता प्रादुर्भाव पाहता शाळांबाबत नवी नियमावली नुकतीच जाहीर करण्यात आली. पण एकीकडे कोरोनामुळे जनजीवन विस्कळीत होत असताना विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचाही तोटा होत आहे. यामुळे राज्य शिक्षणमंत्री बच्चू कडू यांनी एबीपी माझाशी बोलताना महत्त्वाची माहिती दिली. शाळा सुरु करण्याबाबत प्रस्ताव उद्याच सचिवांकडे पाठवणार असल्याचं कडू माझाच्या शिक्षण परिषदेत म्हणाले.
काय म्हणाले बच्चू कडू?
बच्चू कडू यांनी एबीपी माझातर्फे आयोजित शिक्षण परिषद कार्यक्रमात शाळा सुरु करण्याच्या निर्णयासंबधी एक मोठी घोषणा केली. ते म्हणाले 'शाळाबंदीचा निर्णय तज्ज्ञांना विचारुनच घेतला आहे. आता तरीसुद्धा मी आयुक्तांशी बोललो, मुख्यमंत्र्यांशीही बोलणार आहे. शाळांबाबत स्थानिक प्रशासनावर निर्णय सोपवा, कलेक्टर, तहसीलदारांकडे निर्णय द्या, पालकांची संमती असेल तर शाळा सुरु करावी, असा प्रस्ताव आज किंवा उद्या मुख्य सचिवांकडे पाठवू, जिथे कोरोनाचा प्रभाव कमी आहे तिथे शाळा सुरु करता येतील का असा प्रस्ताव शिक्षण विभागामार्फत पाठवला जाईल.'
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Coronavirus Update : दिलासादायक! मुंबईसह राज्यातील रुग्ण वाढ मंदावली
- Omicron : तिसऱ्या लाटेचा धोका! केंद्रीय आरोग्य सचिवांचं राज्यांना पत्र, दिल्या 'या' सूचना
- नागपूरमध्ये नव्या पद्धतीनं होणार जिनोम सिक्वेसिंग, दोन दिवसांत मिळणार अहवाल
- कोरोनाच्या उपचारात 'मोलनुपिरावीर' औषधाचा समावेश नाही : ICMR
- Omicron Symptoms: लहान मुलं आणि तरूणांमध्ये ओमिक्रॉनची लक्षणं वेगळी, कसं ओळखायचं? घ्या जाणून