Omicron : दक्षिण आफ्रिकेत सर्व प्रथम आढळलेला ओमायक्रॉन (Omicron) व्हेरियंट आता जगभर पसरला आहे. भारतातही ओमायक्रॉनच्या रूग्णांमध्ये वाढ होत आहे. परंतु, ओमायक्रॉनबाबत अजून बरेच प्रश्न अनुत्तरीत आहेत. ओमायक्रॉनमधून बरे होत असताना शरीराला वेळ देणे महत्वाचे आहे का? ओमायक्रॉन झाल्यानंतर लक्षणांचा त्रास होऊ नये यासाठी नेमकं काय करावं? अशा प्रश्नांवर छाती रोग तज्ज्ञ डॉ. हरीश चाफळे (Dr Harish Chafle) यांनी माहिती दिली आहे.  


"ओमायक्रॉनची बाधा झालेल्या रूग्णांना अंगदुखी, थकवा, पाठ दुखी अशक्तपणा या सारखी लक्षणं मोठ्या प्रमाणावर आढळतात. परंतु, सर्वच रूग्णांना अशा प्रकारची लक्षणं जाणवतील असे नाही. मात्र ओमायक्रॉनच्या बहुतांशी रुग्णांना पाठ दुखी आणि अशक्तपणा ही लक्षणे आढळत असल्याचे डॉ. हरीश चाफळे यांनी सांगितले. 


डॉ. हरीश चाफळे सांगतात, ओमायक्रॉनमधून बरे झाल्यानंतर शरीराला वेळ दिला पाहिजे. कारण ओमायक्रॉनच्या स्ट्रेसमुळे शरीराला त्रास होऊ शकतो. ओमायक्रॉन झाल्यानंतर रूग्णाला जास्त गंभीर लक्षणं दिसत नाहीत. डेल्टा आणि डेल्टा प्लस व्हेरियंटच्या पोस्ट कोव्हीडमध्ये ब्रेन फॉगची लक्षणं दिसत होती. परंतु, ओमायक्रॉनच्या रूग्णांमध्ये ब्रेन फॉगची लक्षणं दिसत नाहीत. ब्रेन फॉगमध्ये डोखेदुखी आणि काही प्रमाणात स्मृतिभ्रंश अशा प्रकारची लक्षणं आढळतात. परंतु, ही लक्षणं सर्वांनाच आढळत नाहीत," 


"ओमायक्रॉनचा फुफ्फुसांवर परिणाम होत नाही. आतापर्यंत झालेल्या अभ्यासातून ओमायक्रॉनची लक्षणं सौम्य असल्याचे पाहायला मिळाले आहे. ओमायक्रॉनची बाधा झाल्यानंतर डॉक्टरांनी दिलेली औषधे वेळेवर आणि योग्य पद्धतीने घ्यावीत. हाय प्रोटीन डाइट घ्यावे. ओमायक्रॉनमधून रिकव्हर होत असताना रिकवरीला वेळ लागतो. त्यामुळे शरीराला वेळ द्यावा," अशी माहिती डॉ. हरीश चाफळे यांनी दिली. 


महत्वाच्या बातम्या