एक्स्प्लोर

पुन्हा संप करणार नाही; हमीपत्रावर घेतली जातेय एसटी कर्मचाऱ्यांची स्वाक्षरी?

ST Workers Strike : संपानंतर कामावर रूजू होणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून एसटी प्रशासनाकडून संप करणार नसल्याचे हमीपत्र लिहून घेतले जात आहेत.

ST Workers Strike Updates : वेतन वाढ व एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलिनीकरण करावे यासाठी राज्यभरात एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता. सरकार, एसटी महामंडळाने संपावर तोडगा म्हणून वेतनवाढीची घोषणा केली आणि कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर रुजू होण्याचे आवाहन परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांनी केले. सरकारच्या आश्वासनावर विश्वास ठेवत अनेक कर्मचारी कामावर रूजू झाले. मात्र, भविष्यात संप करणार नाही, अशा पत्रावर कर्मचाऱ्यांच्या स्वाक्षरी घेतली जात आहेत. याबाबतचे पत्र व्हायरल होत आहे. 

राज्यातील एसटी आगारातून एसटीची वाहतूक सुरू झाली आहे. मात्र, अद्यापही मोठा कर्मचारी वर्ग अजूनही संपावर आहे. तर, दुसऱ्या बाजूला अनेक कर्मचारी संपातून माघार घेत सेवेत रूज होत आहे. आता अशा कर्मचाऱ्यांकडून काही विभागांमध्ये 'वचनपत्र' भरून घेतले जात आहे. व्हायरल होणाऱ्या 'वचनपत्रा'तील मजकूरही कर्मचाऱ्यांना अडचणीत आणणारा असल्याचे कर्मचाऱ्यांनी म्हटले. 

वचनपत्रातील मजकूर काय?

ठाणे विभागीय कार्यालयाच्या वचनपत्रानुसार, आठ नोव्हेंबर 2021 पासून सुरू झालेल्या बेकायदेशीर संप/ आंदोलनात सहभागी झालो होतो. आज दिनांकपासून कर्तव्यावर रुजू होत आहे. या पुढे संपात सहभागी होणार नाही. तसेच आंदोलन कालावधीत रजेची मागणी करणार नाही असे वचनपत्र सादर करत आहे, असा मजकूर वचनपत्रात नमूद करण्यात आला आहे. भविष्यातील संपात सहभागी झाल्यास प्रशासनाकडून होणारी कारवाई मान्य असेल असेही या वचनपत्रात म्हटले आहे. 


पुन्हा संप करणार नाही; हमीपत्रावर घेतली जातेय एसटी कर्मचाऱ्यांची स्वाक्षरी?

निलंबन कारवाईच्या भीतीने वाहकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपात सहभागी असलेले नांदेड आगारातील वाहक दिलीप विठ्ठलराव वीर यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. नांदेड आगारात जवळपास 450 एसटी कर्मचाऱ्यावर महामंडळाने निलंबनाची कार्यवाही केली आहे. आज प्रशासनाने वीर यांच्यावर कारवाई केली. कारवाईच्या धसक्याने त्यांना  ह्रदय विकाराचा तीव्र झटका आला. त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. 

एसटीच्या एमडी समोर कर्मचाऱ्यांनी मांडली व्यथा

एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी बीडमध्ये एसटी कर्मचाऱ्या सोबत तब्बल अडीच तास संवाद साधला मात्र या चर्चेतून काहीही निष्पन्न झालं नाही.. उलट यावेळी एसटी कर्मचाऱ्यांनी आपली कैफियत त्यांच्यासमोर मांडली. शेखर चन्ने यांनी यावेळी आंदोलनकर्त्या कर्मचाऱ्या ना  आंदोलन मागे घेण्याची विनंती केली.. त्यावेळी ते म्हणाले की शासनाने मान्य केलेल्या मागण्या नक्कीच पूर्ण केल्या जातील अशी तरतूद करण्यात आलेली आहे.. पूर्वी नव्याने रुजू होणार्‍या कर्मचाऱ्याला बारा हजार रुपये पर्यंत वेतन मिळत होते ते आता चोवीस हजार रुपये मिळणार आहे. तरीसुद्धा कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या सुविधा संदर्भात शासन व एसटी महामंडळ कटीबध्द आहे असे सांगितले. 

इतर महत्त्वाच्या बातम्या:

 

महत्त्वाच्या बातम्या

सातारा जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा, IPS अधिकारी स्मार्तना पाटील ‘उत्कृष्ट सेवा पदक’ जाहीर 
सातारा जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा, IPS अधिकारी स्मार्तना पाटील ‘उत्कृष्ट सेवा पदक’ जाहीर 
1962 चा रणसंग्राम! फक्त अंगावरचे कपडेच घरी आले, देशासाठी प्राणाची आहुती देणारे अहिल्यानगरचे शहीद सोन्याबापू बोरुडे
1962 चा रणसंग्राम! फक्त अंगावरचे कपडेच घरी आले, देशासाठी प्राणाची आहुती देणारे अहिल्यानगरचे शहीद सोन्याबापू बोरुडे
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 ऑगस्ट 2026 | शुक्रवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 ऑगस्ट 2026 | शुक्रवार

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Chakan Traffic Jam : पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
Share Market : शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
Burger King : डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
NCP : पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद? सूत्रांची माहिती
पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद?
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
Sri Lanka vs India, 1st Test: तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
Investment Tips :  राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
Embed widget