ST Workers Strike Live : ST कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचा सातवा दिवस, वाचा प्रत्येक अपडेट

St Workers Strike :  एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा आज सातवा दिवस आहे. विलीनीकरणाच्या मागणीसाठी ठाम असणाऱ्या एसटीच्या कर्मचाऱ्यांचं आंदोलन आणखी तीव्र होणार आहे.

abp majha web team Last Updated: 13 Nov 2021 09:49 AM
एसटीच्या बसेसची संख्या वाढली; राज्यातील वेगवेगळ्या भागात शनिवारी 71 बस प्रवाशांसह आगाराबाहेर

एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू असताना दुसरीकडे महामंडळाने उपलब्ध कर्मचाऱ्यांच्या आधाारे एसटी बसेस आगाराबाहेर काढण्यास सुरुवात केली आहे.  राज्यातील वेगवेगळ्या भागात शनिवारी 71 बस आगाराबाहेर काढण्यात आल्या. 

शिष्टमंडळ एसटी कर्मचाऱ्यांशी प्रस्तावावर चर्चा करुन संप मागे घेण्यावर विचार करणार

बैठकीतील प्रस्तावाची माहिती एसटी कर्मचाऱ्यांना सांगणार आहे, शिष्टमंडळ एसटी कर्मचाऱ्यांशी प्रस्तावावर चर्चा करुन संप मागे घेण्यावर विचार करणार आहोत, हायकोर्टाच्या आदेशाप्रमाणे नेमलेल्या कमिटीच्या अहवालासाठीचा कालावधी 12 आठवड्यांहून कमी करुन घेण्यात येईल, असे मत परिवहन मंत्री अनिल परब यांनी मांडले आहे. 

सहयाद्रीवर बैठकीला सदाभाऊ खोत, गोपीचंद पडळकर आणि एसटी कर्मचारी प्रतिनिधी पोहोचले, परिवहन मंत्र्यासोबत बैठक 

सहयाद्रीवर बैठकीला सदाभाऊ खोत, गोपीचंद पडळकर आणि एसटी कर्मचारी प्रतिनिधी पोहोचले, परिवहन मंत्र्यासोबत बैठक 

आपल्यातील काही प्रतिनिधी चर्चेला जाताय, आपल्या हिताचे असेल तर बघू - गोपीचंद पडळकर

गोपीचंद पडळकर म्हणाले, आपल्यातील काही प्रतिनिधी चर्चेला जाताय, आपल्या हिताचे असेल तर बघू 


आपल्यातील काही प्रतिनिधी आमच्यासोबत असतील


हिताचे असेल तर बघू नाहीतर नाही म्हणू 


सदाभाऊ खोत सोबत असतील एसटी कर्मचरी कृती समिती यामध्ये नसेल

परिवहन मंत्री अनिल परब यांनी शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर राज्याचे मुख्य सचिव सिताराम कुंटे यांच्या सोबत होणार बैठक

परिवहन मंत्री अनिल परब यांनी शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर राज्याचे मुख्य सचिव सिताराम कुंटे यांच्यासोबत होणार बैठक


एसटी महामंडळ विलीनीकरण शक्य नाही मात्र इतर पर्यायावरती होणार चर्चा


राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या प्रमाणे वेतन आणि इतर सोयी सुविधा देण्याचा होऊ शकतो आज निर्णय

परिवहन मंत्री अनिल परब यांनी घेतली शरद पवार यांची भेट

परिवहन मंत्री अनिल परब यांनी घेतली शरद पवार यांची भेट


एसटी कामगार यांच्या संपाच्या संदर्भात घेतली भेट


या विषयावर काल राज ठाकरे यांनी ही शरद पवार यांची घेतली होती भेट 


त्यामुळे शरद पवार यांच्या भेटीनंतर अनिल परब काही भूमिका घेतात का याकडे सर्वांचं लक्ष

पार्श्वभूमी

St Workers Strike :  एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा आज सातवा दिवस आहे. विलीनीकरणाच्या मागणीसाठी ठाम असणाऱ्या एसटीच्या कर्मचाऱ्यांचं आंदोलन आणखी तीव्र होणार आहे. आंदोलक कर्मचारी आज परिवहन मंत्री अनिल परब यांच्या घरावर धडकणार आहेत. संपकरी परिवहन मंत्र्यांच्या घरावर मोर्चा काढून संताप व्यक्त करणार आहेत. अनिल परबांनी पुन्हा एकदा एसटी कर्मचाऱ्यांना संप मागे घेण्याचं आवाहन केलं आहे. तसंच सदाभाऊ खोत आणि पडळकर कर्मचाऱ्यांना भडकवण्याचं काम करतायत असंही अनिल परबांनी म्हटलं आहे. काल रात्री विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आझाद मैदानात उपस्थित राहून आंदोलकांना पाठिंबा दर्शवला. दुसरीकडे काल मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी काल शरद पवारांची भेट घेतली आहे.. एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात त्यांनी शरद पवारांची भेट घेतली आहे. 


दुसरीकडे वारंवार आवाहन करुनही कर्मचारी कामावर येत नाहीय. त्यामुळं आता हा संप मोडीत काढण्याची तयारी राज्य सरकारनं सुरु केली आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी आगारातून खासगी बस, शालेय बस आणि वडाप सोडल्या जात आहेत. विविध डेपोतून शिवशाही बस मार्गस्थ झाल्यात. या बसेसना पोलीस संरक्षणही देण्यात आलं. तसंच खासगी बसचालकांची मदत घेऊनही एसटी सुरु करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. दरम्यान, अनेक कर्मचारी कामावर रुजू होण्यास तयार असल्याचा दावा एसटी महामंडळाने केला आहे. यासाठी कर्मचाऱ्यांना संरक्षण दिले जाईल, असे आश्वासनही परिवहन मंत्र्यांनी दिलंय.  


एसटी कर्मचारी विलीनीकरणाच्या मागणीसाठी गेल्या सात दिवसांपासून संपावर ठाम आहेत. वारंवार आवाहन करुनही कर्मचारी कामावर येत नाहीय. त्यामुळं आता हा संप मोडीत काढण्याची तयारी राज्य सरकारनं सुरु केली आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी आगारातून खासगी बस, शालेय बस आणि वडाप सोडल्या जात आहेत. 


गेल्या सात दिवसांपासून एसटी कर्मचारी मुंबईतल्या आझाद मैदानावर आंदोलन करताहेत. या आंदोलनाचं नेतृत्व करणारे भाजपचे नेते गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत देखील आझाद मैदानावर तळ ठोकून आहेत. गेले सात दिवस आझाद मैदानातल्या त्यांच्या दिवसाची सुरुवात घोषणाबाजीनं होतेय. मात्र आजचा दिवस त्याला अपवाद ठरलाय.  आज भाजप नेते संपकऱ्यांसोबत योगासनं केली. 




 


- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.