ST Workers Strike Live : ST कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचा आठवा दिवस, वाचा प्रत्येक अपडेट

St Workers Strike :  एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा आज आठवा दिवस आहे. विलीनीकरणाच्या मागणीसाठी ठाम असणाऱ्या एसटीच्या कर्मचाऱ्यांचं आंदोलन आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.

abp majha web team Last Updated: 14 Nov 2021 01:32 PM
आशिष शेलार एसटी कामगारांच्या भेटीला आझाद मैदानात दाखल

आशिष शेलार एसटी कामगारांच्या भेटीला आझाद मैदानात दाखल, म्हणाले, इथला आवाज मंत्रालय आणि मातोश्रीपर्यंत जायला पाहिजे

जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आझाद मैदान सोडणार नाही

मागील 8 दिवसांपासून आझाद मैदानात ठाण मांडून बसलेल्या एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आझाद मैदान सोडणार नसल्याचा पवित्रा घेतला आहे. आता या कर्मचाऱ्यांनी आपल्या कुटुंबियांना देखील आझाद मैदानात आणून कुटुंबासह आंदोलनात सहभाग घेतला आहे. 

महिला एसटी कर्मचाऱ्यांचा अंगावर रॉकेल ओतून घेऊन आत्मदहन करण्याचा प्रयत्न, मंत्रालयासमोरची घटना
आमची कर्मचाऱ्यांसोबत चर्चा झाली त्यांचं म्हणणं आहे की, मागणी मान्य झाल्याशिवाय हालायचं नाही, आंदोलनावर ठाम- गोपीचंद पडळकर

- आम्ही आंदोलनावर ठाम आहोत आमची कर्मचाऱ्यांसोबत चर्चा झाली त्यांचं म्हणणं आहे मागणी मान्य झाल्याशिवाय हालायचं नाही


- कोर्टाच्या देखील लक्षात येईल सध्या कशाप्रकारे चुकीच्या कारवाया सुरू आहेत आणि कर्मचाऱ्यांवर अन्याय होत आहे


- कोर्टाचा निर्णय आम्हाला मान्य असेल आमचा न्यायालयावर विश्वास आहे


- निलंबित कर्मचाऱ्यांचं निलंबन मागे घ्यायला हवं यासोबतच आमच्या मागण्या मान्य व्हायला हव्यात अन्यथा आम्ही हलणार नाही

आम्ही 10 वाजेपर्यंत निर्णय घेणार आहोत, संप मागे घेऊ नये ही एस टी कर्मचाऱ्यांची मागणी-गोपीचंद पडळकर

गोपीचंद पडळकर काय म्हणाले...
ST बस कर्मचाऱ्यांचा मुंबईच्या आझाद मैदानात आंदोलनाचा आज 6 दिवस आहे. काल बैठक झाली मात्र तोडगा निघाला नाही. 


आज आम्ही 10 वाजेपर्यंत निर्णय घेणार आहोत, संप मागे घेऊ नये ही एस टी कर्मचाऱ्यांची मागणी आहे. 


- एस टी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या करू नये 


- आज ही परिस्थिती निर्माण झालीय त्याला सरकार जबाबदार


- पालघरमधील आत्महत्या करण्याचा प्रकार गंभीर आता सरकारने आता लक्ष घालावे

आशिष शेलार आज दुपारी 12 वाजता आझाद मैदान येथे जाऊन एसटी कर्मचाऱ्यांची भेट घेणार

भाजपा नेते आमदार अॅड आशिष शेलार आज दुपारी 12 वाजता आझाद मैदान येथे जाऊन एसटी कर्मचाऱ्यांची भेट घेऊन संपाला पाठिंबा देणार 

महिला एसटी कर्मचाऱ्यांचा अंगावर रॉकेल ओतून घेऊन आत्मदहन करण्याचा प्रयत्न, मंत्रालयासमोरची घटना

मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत अजूनही तोडगा निघत नाही त्यामुळे आज तीन ते चार महिला एस टी कर्मचाऱ्यांनी अंगावर रॉकेल ओतून घेऊन आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. मात्र वेळीच पोलीस कर्मचाऱ्यांनी या आंदोलक महिलांना रोखलं त्यामुळे पुढील अनर्थ टळला. या आंदोलकांची एसटी महामंडळाचे राज्य सरकतमध्ये विलिनीकरण करा अशी मागणी आहे

पार्श्वभूमी

St Workers Strike : एसटी संपाचा आज आठवा दिवस आहे... एसटीच्या शासकीय विलीनीकरणासह इतर मागण्यांसाठी कर्मचारी ८ दिवसांपासून कामबंद आंदोलन करताहेत. मागील ८ दिवसांपासून कर्मचारी संघटना आणि शिष्टमंडळाच्या परिवहन मंत्र्यांशी चर्चेच्या फेऱ्या सुरु आहेत. पण अजूनही तोडगा न निघाल्यानं कर्मचारी आंदोलनावर ठाम आहेत. भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत सुरु असलेल्या आंदोलनाचा आज सहावा दिवस आहे. त्यात एसटी कर्मचाऱ्यांवर शासनानं निलंबनाची कारवाई केल्यानं संपकरी आणखी संतापलेत. त्यात काल परिवहनमंत्र्यांनी संप मागे घ्या, निलंबन मागे घेऊ असा शब्द दिलाय. तरी, संप अजूनही मागे घेतलेला नाही. त्यात आज पुन्हा एकदा परिवहन मंत्री अनिल परबांशी चर्चा होणार आहे. थोड्याच वेळात बैठक घेऊन आंदोलक नेते पुढची भूमिका ठरवणार आहेत.


अनिल परबांनी पुन्हा एकदा एसटी कर्मचाऱ्यांना संप मागे घेण्याचं आवाहन केलं आहे. तसंच सदाभाऊ खोत आणि पडळकर कर्मचाऱ्यांना भडकवण्याचं काम करतायत असंही अनिल परबांनी म्हटलं आहे. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आझाद मैदानात उपस्थित राहून आंदोलकांना पाठिंबा दर्शवला. दुसरीकडे  मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी काल शरद पवारांची भेट घेतली आहे.. एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात त्यांनी शरद पवारांची भेट घेतली आहे. 


दुसरीकडे वारंवार आवाहन करुनही कर्मचारी कामावर येत नाहीय. त्यामुळं आता हा संप मोडीत काढण्याची तयारी राज्य सरकारनं सुरु केली आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी आगारातून खासगी बस, शालेय बस आणि वडाप सोडल्या जात आहेत. विविध डेपोतून शिवशाही बस मार्गस्थ झाल्यात. या बसेसना पोलीस संरक्षणही देण्यात आलं. तसंच खासगी बसचालकांची मदत घेऊनही एसटी सुरु करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. दरम्यान, अनेक कर्मचारी कामावर रुजू होण्यास तयार असल्याचा दावा एसटी महामंडळाने केला आहे. यासाठी कर्मचाऱ्यांना संरक्षण दिले जाईल, असे आश्वासनही परिवहन मंत्र्यांनी दिलंय.  


एसटी कर्मचारी विलीनीकरणाच्या मागणीसाठी गेल्या आठ दिवसांपासून संपावर ठाम आहेत. वारंवार आवाहन करुनही कर्मचारी कामावर येत नाहीय. त्यामुळं आता हा संप मोडीत काढण्याची तयारी राज्य सरकारनं सुरु केली आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी आगारातून खासगी बस, शालेय बस आणि वडाप सोडल्या जात आहेत. 


गेल्या सहा दिवसांपासून एसटी कर्मचारी मुंबईतल्या आझाद मैदानावर आंदोलन करताहेत. या आंदोलनाचं नेतृत्व करणारे भाजपचे नेते गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत देखील आझाद मैदानावर तळ ठोकून आहेत.  

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.