एक्स्प्लोर

एसटीच्या पहिल्या स्लीपर कोचचं लोकार्पण, दोन नव्या बस ताफ्यात

एसटीचं रुपडं पालटणाऱ्या दोन नवीन बसही आता एसटी महामंडळाच्या ताफ्यात दाखल होणार आहेत.

मुंबई : एसटी महामंडळाच्या वतीने आज विविध योजना आणि दोन नवीन एसटी बसेसचं लोकार्पण करण्यात आलं. 2019 च्या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते नवनवीन योजनांचा धडाका सुरु झाला आहे. एक अनोखी योजना म्हणजे आता आदिवासी महिला एसटी चालक होणार आहे. येत्या दिवाळीपासून आदिवासी महिला एसटी चालक दिसणार आहेत. तर एसटीचं रुपडं पालटणाऱ्या दोन नवीन बसही आता एसटी महामंडळाच्या ताफ्यात दाखल होणार आहेत. एसटीच्या पहिल्या स्लीपर कोचचं लोकार्पण, दोन नव्या बस ताफ्यात एसटी महामंडळाच्या वतीने 'राष्ट्रीय कृतज्ञता दिन' सोहळ्यात विविध योजनांचं लोकार्पण करण्यात आलं. एसटीच्या नवीन डिझाईनच्या परिवर्तन बसचं म्हणजे लालपरीचं आणि एसटीच्या पहिल्या किफायतशीर (शयनयान) स्लीपर कोच बसचं उद्घाटन करण्यात आलं. एसटीच्या पहिल्या स्लीपर कोचचं लोकार्पण, दोन नव्या बस ताफ्यात यवतमाळच्या आदिवासी महिलांची एसटी चालक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. दिवाळीपर्यंत महिला एसटी चालवताना दिसतील. तर गडचिरोली जिल्ह्यातील आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवादी युवकांची एसटी महामंडळाच्या विविध पदांवर नियुक्ती करण्यासाठीही योजना जाहीर करण्यात आली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे शहीद सन्मान योजनेची घोषणा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे शहीद सन्मान योजनेचीही घोषणा करण्यात आली. या योजनेंतर्गत शहिदांच्या वारसांना नोकरी आणि पत्नीला मोफत आजीवन प्रवास पास देण्यात येईल. परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी ही घोषणा केली. पुण्याच्या स्वारगेट एसटी स्थानकाच्या ठिकाणी अत्याधुनिक मल्टीमॉडेल बस पोर्ट तयार करणार येतील. या ठिकाणी मेट्रो, बस आणि इतर वाहतूक सेवा एकत्रित करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. एसटी डेपोत लोक तासन् तास थांबतात, त्यांच्यासाठी छोटेखानी मराठी चित्रपटांसाठी राखीव सिनेमागृहाची संकल्पनाही मुख्यमंत्र्यांनी बोलून दाखवली. ट्रेनी चालकांना प्रशिक्षणादरम्यान प्रती महिना 400 रुपयांपासून 2500 रुपये वाढवण्यास तत्वतः मान्यता देण्यात आलीय, ती पूर्णत्वास नेऊ, असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं. दिवाकर रावतेंची नक्षलवाद्यांशी चर्चा दरम्यान, दिवाकर रावतेंनी नक्षलवाद्यांची भेट घेऊन चर्चा केली. नक्षलवाद्यांना समजून घेऊन मुख्य प्रवाहात आणण्याचं आवाहन त्यांनी मुख्यमंत्र्यांना केलं. त्यांनी नक्षलग्रस्त भागातल्या हल्ला झालेल्या मडके गावाला भेट दिली. त्या ठिकाणी शिवसेनेच्या तालुका प्रमुखाची हत्या करण्यात आली होती. नक्षलवाद्यांनी शिवसैनिकाला मारलं हे विचारण्यासाठी रावतेंनी एका नक्षलवाद्याची जाऊन भेट घेतली. त्याच्याशी पाऊण तास चर्चा केली. या गावाच्या पाहणी दरम्यान रावतेंना जिवंत बॉम्ब सापडला होता. हा बॉम्ब घेऊन ते हिवाळी अधिवेशनात सभागृहात जाणार होते. पण त्यांना बॉम्बला हात लावू नये, असा सोबत असलेल्या नक्षलवाद्याने सल्ला दिल्याचं त्यांनी सांगितलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli : रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
गुडन्यूज! राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
गुडन्यूज! राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
Palghar News: वडिलांचा कारमधील मृतदेह पाहून लेकाने फोडला टाहो; आरोपींना तशीच शिक्षा द्या, माझ्याही जिवाला धोका
वडिलांचा कारमधील मृतदेह पाहून लेकाने फोडला टाहो; आरोपींना तशीच शिक्षा द्या, माझ्याही जिवाला धोका
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ashok Dhodi Palghar : कारमध्ये सापडलेला मृतदेह अशोक धोडी यांचाच, पोलिसांची माहितीJob Majha : जॉब माझा :भारतीय राष्ट्रीय महासागर सूचना सेवा केंद्र येथे विविध पदांसाठी भरती :ABP MajhaBuldhana : बुलढाणा केसगळती प्रकरण, गावातील नागरिकांच्या रक्तात, केसात हेवी मेटल असलेलं 'सेलेनियम'Chhatrapati Shivaji Maharaj Statue :जपानच्या टोकियोत बसवणार शिवरायांचा पुतळा, देशभरात रथयात्रा सुरू

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli : रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
गुडन्यूज! राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
गुडन्यूज! राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
Palghar News: वडिलांचा कारमधील मृतदेह पाहून लेकाने फोडला टाहो; आरोपींना तशीच शिक्षा द्या, माझ्याही जिवाला धोका
वडिलांचा कारमधील मृतदेह पाहून लेकाने फोडला टाहो; आरोपींना तशीच शिक्षा द्या, माझ्याही जिवाला धोका
पुणेकरांनो सावधान! खासगी टँकरमधून घरी येणारं पाणी दूषित; GBS रोगाचा धोका, 15 पाँईटवर कारवाई
पुणेकरांनो सावधान! खासगी टँकरमधून घरी येणारं पाणी दूषित; GBS रोगाचा धोका, 15 पाँईटवर कारवाई
मुंबईतील उद्यानात बिबट्या सफारी सुरू होणार; पर्यंटकांना बिबट्याचे दर्शन; पालकमंत्री आशिष शेलारांचे निर्देश
मुंबईतील उद्यानात बिबट्या सफारी सुरू होणार; पर्यंटकांना बिबट्याचे दर्शन; पालकमंत्री आशिष शेलारांचे निर्देश
मृत्युपूर्वी गोपीनाथ मुंडेंनी इशारा दिला होता, सांभाळून राहा, पण ऐकलं नाही; प्रकाश महाजनांनी सांगितला भस्मासूर
मृत्युपूर्वी गोपीनाथ मुंडेंनी इशारा दिला होता, सांभाळून राहा, पण ऐकलं नाही; प्रकाश महाजनांनी सांगितला भस्मासूर
धक्कादायक! तपोवन एक्सप्रेससमोर ट्रक आडवा; लोको पायलटने शहाणपणा दाखवला, दुर्घटना टळली
धक्कादायक! तपोवन एक्सप्रेससमोर ट्रक आडवा; लोको पायलटने शहाणपणा दाखवला, दुर्घटना टळली
Embed widget