एक्स्प्लोर

एसटीच्या ताफ्यात एक हजार नॉन एसी स्लीपर बस

प्रवाशांना रात्री लांब पल्ल्याचा प्रवास झोपून करता यावा यासाठी एसटी महामंडळ विनावातानुकूलित शयनयान बस आणत आहे.

धुळे : खाजगी प्रवासी वाहतुकीला तोडीस तोड म्हणून एसटीमध्येही काही बदल होत आहेत. शिवनेरी, अश्वमेधनंतर शिवशाही बस त्याचाच एक भाग. आता प्रवाशांना रात्री लांब पल्ल्याचा प्रवास झोपून करता यावा यासाठी एसटी महामंडळ विनावातानुकूलित शयनयान बस आणत आहे. पुण्यातील मध्यवर्ती कार्यशाळेत विनावातानुकूलित शयनयान असलेल्या बसच्या (नॉन एसी स्लीपर कोच बस) निर्मितीचं काम सुरु आहे. येत्या वर्षभरात साधारण एक हजार विना वातानुकूलित शयनयान बसेस प्रवाशांच्या सेवेत दाखल होतील. टू बाय वन, 30 शयन कोच असणारी ही बस पुण्यातील सीआयआरटी या संस्थेकडून प्रमाणित करुन त्यानुसार बांधणी सुरु आहे. लवकरच या बस प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहेत. या विनावातानुकूलित शयनयान बससाठी एसटीचेच चालक, वाहक असतील, अशी माहिती एसटीच्या सूत्रांनी दिली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या रातराणी प्रकारात सुरु असलेल्या एसटीच्या सहाशे बससाठी असलेली भाडेआकारणी या नवीन विना वातानुकूलित शयनयान बससाठी होऊ शकते. म्हणजेच एसटीच्या रातराणी बसला जितकं भाडं प्रवाशांना द्यावं लागतं तितकंच किंवा त्यापेक्षा थोडं जास्त भाडं एसटीच्या या नव्या विना वातानुकूलित शयनयान बससाठी आकारलं जाऊ शकतं.  मात्र या संदर्भात अंतिम निर्णय अद्याप झालेला नाही. परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांच्या प्रयत्नातून सुरु झालेल्या वातानुकूलित शिवशाही बस सेवेनंतर लवकरच विना वातानुकूलित शयनयान बसेस एसटीच्या ताफ्यात दाखल होणार आहे. लाल परी म्हणून ओळख असलेली एसटी आता बदलत आहे हे यावरुन पुन्हा एकदा अधोरेखित झालं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
मोठी बातमी! उपोषण अंतरवालीतच, पण मुंबईलाही जाणार; मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं, सरकारला थेट इशारा
मोठी बातमी! उपोषण अंतरवालीतच, पण मुंबईलाही जाणार; मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं, सरकारला थेट इशारा
Ladki Bahin Yojana: 'लाडक्या बहिणीं'ची संख्या 92 लाखांनी घटली, बेकायदेशीर लाभाच्या वसुलीचे काम रखडले; RTI मधून खुलासा
'लाडक्या बहिणीं'ची संख्या 92 लाखांनी घटली, बेकायदेशीर लाभाच्या वसुलीचे काम रखडले; RTI मधून खुलासा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार

व्हिडीओ

Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
Dharashiv School : म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
Junnar Pimpalwandi Case: सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
Ind vs Pak Hockey: जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
Embed widget