मुंबई : राज्यातील एसटीला (ST Mahamandal) ऐन दिवाळीत मोठा धनलाभ झाला आहे. त्यामुळे एसटीच्या उत्पन्नाचा नवा विक्रम (ST Income In Diwali) झाला आहे. 20 नोव्हेंबर रोजी एसटी महामंडळाच्या इतिहासातील विक्रमी उत्पन्नाची नोंद झाली सून या एका दिवसात राज्यात एसटीने 37 कोटी 63 लाख रुपयांची कमाई झाली. दिवाळी सुट्टीत एसटी मालामाल झाली असून गर्दीचे आणि उत्पन्नाचे अनेक विक्रम केले आहेत. एसटीच्या 75 वर्षांच्या इतिहासातील एक दिवसांत मिळवलेल्या सर्वाधिक उत्पन्नापैकी हे सर्वाधिक उत्पन्न आहे.
यंदाच्या दिवाळीत प्रवाशांनी एसटीला पसंती दिली आहे. 1-20 नोव्हेंबर दरम्यान एसटीचला 510 कोटी रुपये उत्पन्न मिळले. तर ऐन दिवाळीत म्हणजे 8 ते 20 नोव्हेंबर दरम्यान तब्बल 390 कोटी रुपये उत्पन्न मिळाले आहे. 20 नोव्हेंबरला एसटीच्या इतिहासातील विक्रमी उत्पन्न मिळले असून एसटीने तब्बल 37 कोटी 63 लाख रुपयांची कमाई केली आहे. 8-27 नोव्हेंबर दरम्यान करण्यात आलेल्या 10 टक्के भाडेवाढीचा एसटीला मोठा फायदा झाला आहे. एसटी महामंडळाचे नोव्हेंबर महिन्यातील उत्पन्न जवळपास 800 कोटींपर्यंत जाण्याचा अंदाज आहे. तसं झाल्यास डिसेंबरच्या सुरुवातीला एसटी नफ्यात असणार आहे.
दिवाळी ही एसटी महामंडळासाठी खास
राज्यात कोणतीही घडामोड घडली तर त्याचा थेट परिणाम हा एसटीवर होतो. ग्रामीण भागात एसटी हा आजही एकमेव पर्याय आहे. पण अनेकदा या एसटीवर संकंट कोसळ्याचं चित्र होतं. पण यंदाची दिवाळी ही एसटी महामंडळासाठी देखील खास ठरली. भाऊबीजेच्या पार्श्वभूमीवर म्हणजेच 14 ते 16 नोव्हेंबर दरम्यान 95 कोटी 35 लाख रुपयांचं उत्पन्न एसटीने कमावले आहे. एसटी महामंडळाच्यावतीने होळी, गणेशोत्सव, दसरा-दिवाळी आदी सण-उत्सवाच्या काळात जादा वाहतूक चालवली जाते. या दरम्यान, एसटीला अधिक उत्पन्न मिळवण्याची संधी असते.
मराठा आंदोलनाचा फटका
दिवाळीच्या सुट्टीत महाविद्यालये व शाळांना सुट्टी असते. त्यामुळे अनेक कुटुंबे मुलांसह गावी, धार्मिक स्थळे किंवा पर्यटनस्थळांना भेटी देण्याचे नियोजन करतात. तर नोकरीनिमित्त बाहेर असणारे कर्मचारीही या सणात आपल्या घरी जात असतात. अशावेळी हे सर्व प्रवाशी एसटीला प्राधान्य देतात. मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान अनेक ठिकाणी एसटी बसला लक्ष्य करण्यात आलं होतं. मराठा समाजाच्या आंदोलनामुळे एसटीला फटका बसला होता. एसटी बसेसची जाळपोळ आणि तोडफोडीच्या घटना घडल्या यामुळे लालपरीची सेवा ठप्प होती. ते नुकसान भरून काढण्याचा मदत झाली आहे.
हे ही वाचा :