Bank Holidays in December 2023 : नोव्हेंबर महिना संपून आता डिसेंबर महिना अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. अशातच वर्षाचा शेवटचा महिना सुरु होण्यापूर्वी बँक (Bank Holiday) एकूण किती दिवस बंद राहणार आहेत, हे जाणून घेणं फार महत्वाचं आहे. बँक हा सर्वसामान्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. आजकाल इंटरनेट बँकिंग (Internet Banking), मोबाईल बँकिंगमुळे (Mobile Banking) लोकांची बरीचशी कामे घरबसल्याच होतात. पण मोठ्या प्रमाणात रोख रक्कम काढायची असल्यास (Cash Withdrawal), डिमांड ड्राफ्ट (Demand Draft) इत्यादी कामांसाठी बँकेची गरज भासते. अशा परिस्थितीत, जर तुम्ही डिसेंबर महिन्यात कोणतेही महत्त्वाचे काम पूर्ण करण्यासाठी बँकेत जात असाल, तर या संपूर्ण महिन्यातील सुट्ट्यांची यादी जाणून घेणं गरजेचं आहे. 


डिसेंबर महिन्यात 18 दिवस बॅंका बंद राहणार आहेत. या सुट्ट्या संपूर्ण देशभरात लागू होणार आहेत. नुकत्याच, रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने (RBI) जाहीर केलेल्या परिपत्रकानुसार डिसेंबर महिन्यात कोणत्या दिवशी बॅंका बंद असणार आहेत याची यादी जाहीर केली आहे.  


रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) च्या कॅलेंडरनुसार डिसेंबर महिन्यात एकूण 18 दिवस बँकांची सुट्टी असेल. राज्य आणि तिथल्या सणानुसार या सुट्ट्या बदलू शकतात. बँक सुट्ट्यांची यादी आरबीआय (RBI) 3 आधारावर जारी करते. ही यादी देशभरात आणि राज्यांमध्ये साजरा केल्या जाणाऱ्या सणांवर आधारित आहे.


सुट्ट्यांची संपूर्ण यादी (Bank Holidays List in December 2023) : 


1 डिसेंबर 2023 : या दिवशी, अरुणाचल प्रदेश आणि नागालँडमध्ये राज्य उद्घाटन दिनानिमित्त बँक सुट्टी असेल.


3 डिसेंबर 2023 : रविवारमुळे या दिवशी बँकेला सुट्टी असेल.


4 डिसेंबर 2023 : सेंट फ्रांसिस जेवियर पर्वानिमित्त बॅंकेला सुट्टी असेल.


9 डिसेंबर 2023 : सेंट फ्रान्सिस झेवियर सणानिमित्त गोव्यात बँकेला सुट्टी, महिन्याचा दुसरा शनिवार


10 डिसेंबर 2023 : रविवारमुळे या दिवशी बँकेला सुट्टी असेल.


12 डिसेंबर 2023 : पा-तोगन नेंगमिंजा संगमामुळे बँकेला सुट्टी असेल.


13 डिसेंबर 2023 : लोसुंग/नामसुंगमुळे सिक्कीममध्ये बँकेला सुट्टी असेल.


14 डिसेंबर 2023 : Losung/Namsung मुळे सिक्कीममध्ये बँकांना सुट्टी असेल.


17 डिसेंबर 2023 : रविवारमुळे बँका बंद राहतील.


18 डिसेंबर 2023 : मेघालयात यू सोसो थाम यांच्या पुण्यतिथीनिमित्त बँकेला सुट्टी असेल.


19 डिसेंबर 2023 : गोवा मुक्ती दिनानिमित्त गोव्यात बँकेला सुट्टी असेल.


23 डिसेंबर 2023 : महिन्याचा चौथा शनिवार 


24 डिसेंबर 2023 : रविवारमुळे बँका बंद राहतील.


25 डिसेंबर 2023 : ख्रिसमसमुळे देशभरात बँका बंद राहतील.


26 डिसेंबर 2023 : मिझोराम, नागालँड आणि मेघालयमध्ये नाताळनिमित्त बँका बंद राहतील. 


27 डिसेंबर 2023 : नाताळनिमित्त मेघायलमध्ये बॅंकांना सुट्टी असेल. 


30 डिसेंबर 2023 :  मेघालयमध्ये U Kiang Nangbah मुळे बँका बंद राहतील.


31 डिसेंबर 2023 : रविवारमुळे बँका बंद राहतील.


वरील नमूद केलेल्या दिवसांच्या सुट्ट्या रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने (RBI) जाहीर केलेल्या सुट्ट्यांनुसार लागू होणार आहेत. या बॅंकेच्या सुट्ट्या असल्या तरी खातेधारकांनी बॅंकेचे काही काम करण्यासाठी नेट बँकिंग आणि मोबाईल बँकिंग वापरु शकतात. तुम्ही या सुट्ट्यांचा मागोवा ठेवल्यास, तुम्ही बँकेच्या व्यवहाराची अधिक चांगल्या पद्धतीने योजना करु शकता. लाँग वीकेंडसाठी, तुम्ही तुमच्या सुट्ट्यांचे उत्तम नियोजन देखील करु शकता.


महत्त्वाच्या बातम्या : 


Post Office : 'या' पोस्ट ऑफिस योजनांमध्ये ऑनलाइन गुंतवणूक सुविधा, घरबसल्या फक्त करा 'हे' काम; स्टेप-बाय-स्टेप प्रक्रिया वाचा