एक्स्प्लोर

आचारसंहितेमुळे एसटी कर्मचाऱ्यांची वेतनवाढ पुन्हा लांबणीवर

एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीसंदर्भात 1 मे म्हणजे महाराष्ट्र दिनाच्या दिवशी निर्णय जाहीर केला जाईल, असं परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी जाहीर केलं होतं.

धुळे : राज्यातील लोकसभा आणि अन्य पोटनिवडणुकीच्या आचारसंहितेमुळे एसटी कर्मचाऱ्यांची पुन्हा एकदा घोर निराशा झाली आहे. एसटी कर्मचाऱ्यांची वेतनवाढ आचारसंहितेच्या कचाट्यात अडकली आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीसंदर्भात 1 मे म्हणजे महाराष्ट्र दिनाच्या दिवशी निर्णय जाहीर केला जाईल, असं परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी जाहीर केलं होतं. मात्र त्यानंतर दोन दिवसातच निवडणूक आयोगाने राज्यातील लोकसभा आणि अन्य पोटनिवडणुकांसाठी 02 जून 2018 अखेर आदर्श आचारसंहिता जाहीर केली. ही आचारसंहिता राज्यातील 35 पैकी 28 जिल्ह्यांना लागू झाली. या काळात कोणत्याही प्रकारची घोषणा करता येत नाही. दरम्यान, एसटी कर्मचाऱ्यांना दिलेलं वचन पाळण्याची तीव्र इच्छा असूनही आचारसंहितेमुळे काही काळ थांबणं भाग पडलं असल्याचं एसटी प्रशासनाने म्हटलं आहे. असं असलं तरी एसटी प्रशासनाने तातडीने निवडणूक आयोगाशी पत्र व्यवहार करुन प्रलंबित वेतनवाढ जाहीर करण्याबाबत विनंती केली आहे. निवडणूक आयोगाची मंजुरी मिळाली तर याबाबत सकारात्मक निर्णय होऊ शकेल. तसेच एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक रणजित सिंह देओल हे केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार कर्नाटकच्या विधानसभा निवडणुकीमध्ये 15 मे, 2018 पर्यंत निवडणूक निरीक्षक म्हणून नियुक्त आहेत. ते आल्यानंतर त्यांच्या उपस्थितीमध्ये वेतनवाढीसंदर्भात शक्य तेवढ्या लवकर निर्णय घेण्यात येईल, असं एसटी महामंडळाकडून सांगण्यात आलं. वेतनवाढीसाठी 1 मे, 2018 पर्यंत केलेली प्रतीक्षा नाईलाजाने काही काळ वाढवावी लागणार आहे. तरी कामगारांनी वेतन वाढी संदर्भात निश्चिंत रहावं, असं आवाहन एसटी महामंडळातर्फे करण्यात आलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Raut on Bankipur By-election Result: कुत्रा-मांजराला उभे केले तरी लोक निवडून देतील, हा अहंकार लोकांनी मोडून काढला; बांकीपूर पोटनिवडणुकीवरून संजय राऊतांचा भाजपवर घणाघात
कुत्रा-मांजराला उभे केले तरी लोक निवडून देतील, हा अहंकार लोकांनी मोडून काढला; बांकीपूर पोटनिवडणुकीवरून संजय राऊतांचा भाजपवर घणाघात
Mumbai Mayor Bunglow : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग; टीकेची झोड उठताच महापौर रितू तावडेंचं स्पष्टीकरण, म्हणाल्या महापौर बंगल्याचा चुकून उल्लेख
मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग; टीकेची झोड उठताच महापौर रितू तावडेंचं स्पष्टीकरण, म्हणाल्या महापौर बंगल्याचा चुकून उल्लेख
वाल्मिक कराडला नागपूर कारागृहात पाठवा, पोलिसांवरही गुन्हे दाखल करा; सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांकडे मागणी
वाल्मिक कराडला नागपूर कारागृहात पाठवा, पोलिसांवरही गुन्हे दाखल करा; सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांकडे मागणी
सुरेश धसांची हात जोडून अमृता फडणवीसांना विनंती, साहेबांना तेवढं सांगा; बीडसाठी केली विशेष मागणी
सुरेश धसांची हात जोडून अमृता फडणवीसांना विनंती, साहेबांना तेवढं सांगा; बीडसाठी केली विशेष मागणी

व्हिडीओ

Sunil Tatkare On Congress : काँग्रेसने वैचारिक दिवाळखोरी दाखवली; सुनील तटकरेंचा घणाघाती हल्ला
Mumbai Police Salary Scam | पोलिसात ‘घुसखोरी’ पगारात चोरी | ABP Majha Special Report
Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Mayor Bunglow : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग; टीकेची झोड उठताच महापौर रितू तावडेंचं स्पष्टीकरण, म्हणाल्या महापौर बंगल्याचा चुकून उल्लेख
मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग; टीकेची झोड उठताच महापौर रितू तावडेंचं स्पष्टीकरण, म्हणाल्या महापौर बंगल्याचा चुकून उल्लेख
FDA Raid Analog Paneer: संभाजीनगरमधील डेअरीवर एफडीएची धाड, ड्रममध्ये भरलेलं पनीर अन् तूप सापडलं, किळस आणणारे फोटो
संभाजीनगरमधील डेअरीवर एफडीएची धाड, ड्रममध्ये भरलेलं पनीर अन् तूप सापडलं, किळस आणणारे फोटो
वाल्मिक कराडला नागपूर कारागृहात पाठवा, पोलिसांवरही गुन्हे दाखल करा; सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांकडे मागणी
वाल्मिक कराडला नागपूर कारागृहात पाठवा, पोलिसांवरही गुन्हे दाखल करा; सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांकडे मागणी
Rahul Gandhi on Amit Shah: विद्यार्थ्यांचे गुन्हेगार असल्यानेच अमित शाह तोंड लपवत आहेत; गृहमंत्री संसदेत येत नसल्याने राहुल गांधींचा हल्लाबोल
विद्यार्थ्यांचे गुन्हेगार असल्यानेच अमित शाह तोंड लपवत आहेत; गृहमंत्री संसदेत येत नसल्याने राहुल गांधींचा हल्लाबोल
Babasaheb Patil Farmer Loan Waiver : ठरलेली तारीख उजाडली, पण शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीचे पैसे जाण्यात नवीन अडचण, मंत्र्यांनी सांगितलं कारण
ठरलेली तारीख उजाडली, पण शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीचे पैसे जाण्यात नवीन अडचण, मंत्र्यांनी सांगितलं कारण
कर्जदारांना दिलासा... महागाईचा दबाव कायम, तरी रेपो दर जैसे थे; आरबीआयची 'वेट अँड वॉच' भूमिका कायम
कर्जदारांना दिलासा... महागाईचा दबाव कायम, तरी रेपो दर जैसे थे; आरबीआयची 'वेट अँड वॉच' भूमिका कायम
सुरेश धसांची हात जोडून अमृता फडणवीसांना विनंती, साहेबांना तेवढं सांगा; बीडसाठी केली विशेष मागणी
सुरेश धसांची हात जोडून अमृता फडणवीसांना विनंती, साहेबांना तेवढं सांगा; बीडसाठी केली विशेष मागणी
Analogue paneer: महाराष्ट्रात ‘ॲनालॉग पनीर’वर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा आणखी एक तडाखा; हॉटेल, रेस्टॉरंट आणि केटरर्सनाही वापरास मनाई
महाराष्ट्रात ‘ॲनालॉग पनीर’वर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा आणखी एक तडाखा; हॉटेल, रेस्टॉरंट आणि केटरर्सनाही वापरास मनाई
Embed widget