एक्स्प्लोर

डबल ड्युटी करुन घरी परतताना एसटी चालकाचा मृत्यू

हिंगोली आगारातील भास्कर अवचार यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. कामाच्या अति तणावामुळे त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचं बोललं जात आहे.

हिंगोली : डबल ड्युटी करुन घरी परतत असताना एसटी चालकाचा मृत्यू झाल्याची घटना हिंगोलीत घडली. हिंगोली आगारातील भास्कर अवचार यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. कामाच्या अति तणावामुळे त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचं बोललं जात आहे. गेल्या दोन दिवसांपासून राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरु आहे. यामध्ये काही कर्मचारी सहभागी आहेत, तर काही जण सेवेत आहेत. हिंगोली आगाराचं नियोजन गेल्या काही दिवसांपासून कोलमडलं असल्याचा आरोप आहे. चालक आणि वाहकांच्या ड्युटीच्या वेळाही वारंवार बदलल्या जात आहेत. त्यामुळे चालक आणि वाहक त्रस्त झाले आहेत. त्याचमुळे कर्मचाऱ्यांना अशा समस्यांना सामोरं जावं लागतंय. एसटी कामगार संघटना आक्रमक दरम्यान, या घटनेनंतर एसटी कामगार संघटना आक्रमक झाल्या आहेत. अधिकाऱ्यांनी भास्कर अवचार यांना जबरदस्तीने ड्युटी लावल्यामुळेच त्यांच्यावर ही वेळ ओढावली, असा आरोप आगारातील अधिकाऱ्यांवर करण्यात आला आहे. ''आगारातील अधिकाऱ्यांनी भास्कर अवचार यांना परत ड्युटीवर जाण्याचे आदेश दिले. मात्र आपली प्रकृती बरी नसल्याचं त्यांनी सांगितलं. तरीही आगाराच्या अधिकाऱ्यांनी त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं नाही. त्यामुळे कामाचा ताण येऊन अवचार यांच्या छातीत दुखू लागलं. त्यांनी हा प्रकार इतर सहकार्‍यांना सांगितला. त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात नेलं जात होतं, पण रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला,'' अशी माहिती देण्यात आली. या प्रकारामुळे आगारात एकच खळबळ उडाली असून वाहक आणि चालक संतप्त झाले. त्यानंतर पोलिसांना पाचारण करण्यात आलं. शिवाय आगाराची बस सेवाही बंद झाली आहे. आगार प्रमुखांनी आरोप फेटाळले दुसरीकडे आगारप्रमुख बाळासाहेब झरीकर यांनी मात्र या आरोपाचं खंडन केलं आहे. ड्युटी बुकिंग अधिकारी वाबळे यांनी देखील अवचार यांना पुढे तीन दिवसाची सुट्टी पाहिजे होती म्हणून त्यांनी ही डबल ड्युटी मागून घेतल्याचं सांगितलं. या घटनेत खरं काय आणि खोटं काय ते समोर येईलच, मात्र कामाचा ताण एसटी कर्मचाऱ्यांवर आहे, हे स्पष्टपणे या घटनेतून समोर येत आहे. त्यातच काही कर्मचारी संपावर असल्यामुळे त्याचा अतिरिक्त ताण ड्युटीवर असलेल्या कर्मचाऱ्यांवर आहे.

महत्त्वाच्या बातम्या

ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 ऑक्टोबर 2026 | बुधवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 ऑक्टोबर 2026 | बुधवार
दुष्काळामुळे भीषण परिस्थिती; धरणातील पाण्याच्या रक्षणासाठी खाकी, धामणा धरणावर पोलीस बंदोबस्त
दुष्काळामुळे भीषण परिस्थिती; धरणातील पाण्याच्या रक्षणासाठी खाकी, धामणा धरणावर पोलीस बंदोबस्त
नवनाथ बन यांच्याकडून चारित्र्यहननचा प्रयत्न,व्हिडिओतील तरुणी माध्यमांसमोर; म्हणाली, शिवराज माझ्या भावासारखा
नवनाथ बन यांच्याकडून चारित्र्यहननचा प्रयत्न,व्हिडिओतील तरुणी माध्यमांसमोर; म्हणाली, शिवराज माझ्या भावासारखा
बळीराजापुढं दुष्काळाचं ताट, जनावरांच्या चाऱ्याचाही गंभीर प्रश्न? 'कुट्टी'चा खर्च परवडेना; शेतकरी हवालदील
बळीराजापुढं दुष्काळाचं ताट, जनावरांच्या चाऱ्याचाही गंभीर प्रश्न? 'कुट्टी'चा खर्च परवडेना; शेतकरी हवालदील

व्हिडीओ

Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Sunetra Pawar : दादा खूप मोठ्या मनाचे होते,मी नाही; सुनेत्रा पवारांचा बंडखोरांना इशारा
Navnath Ban PC : रोहित पवारांवर गंभीर आरोप, नवनाथ बन यांची स्फोटक पत्रकार परिषद : ABP Majha
Rohini Khadse MPSC Protest Pune: काळ्याकुट्ट भुवया घेऊन..अगं बाई तू ये..रोहिणी खडसेंनी तोफ डागली, VIDEO

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Jayant Patil: पंढरपूरमध्ये शक्तिपीठ महामार्गासाठी पोलिस बंदोबस्तात जबरदस्तीने मोजणी, सरकारमध्ये बसलेल्यांना किंमत मोजावी लागेल; जयंत पाटलांचा इशारा
पंढरपूरमध्ये शक्तिपीठ महामार्गासाठी पोलिस बंदोबस्तात जबरदस्तीने मोजणी, सरकारमध्ये बसलेल्यांना किंमत मोजावी लागेल; जयंत पाटलांचा इशारा
दुष्काळामुळे भीषण परिस्थिती; धरणातील पाण्याच्या रक्षणासाठी खाकी, धामणा धरणावर पोलीस बंदोबस्त
दुष्काळामुळे भीषण परिस्थिती; धरणातील पाण्याच्या रक्षणासाठी खाकी, धामणा धरणावर पोलीस बंदोबस्त
Pune Police: पुणे पोलीस दलातील पोलिस उपनिरीक्षकाने राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून आयुष्याचा शेवट कला
पुणे पोलीस दलातील पोलिस उपनिरीक्षकाने राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून आयुष्याचा शेवट कला
नवनाथ बन यांच्याकडून चारित्र्यहननचा प्रयत्न,व्हिडिओतील तरुणी माध्यमांसमोर; म्हणाली, शिवराज माझ्या भावासारखा
नवनाथ बन यांच्याकडून चारित्र्यहननचा प्रयत्न,व्हिडिओतील तरुणी माध्यमांसमोर; म्हणाली, शिवराज माझ्या भावासारखा
सतेज पाटील काय आरोप करतात, याकडे लक्ष देण्याची गरज नाही, गोकुळमधील पराभवाच्या नैराश्यातूनच आरोप, 90 टक्के ठराव महायुतीकडेच; खासदार महाडिकांचा सतेज पाटलांना टोला
सतेज पाटील काय आरोप करतात, याकडे लक्ष देण्याची गरज नाही, गोकुळमधील पराभवाच्या नैराश्यातूनच आरोप, 90 टक्के ठराव महायुतीकडेच; खासदार महाडिकांचा सतेज पाटलांना टोला
बळीराजापुढं दुष्काळाचं ताट, जनावरांच्या चाऱ्याचाही गंभीर प्रश्न? 'कुट्टी'चा खर्च परवडेना; शेतकरी हवालदील
बळीराजापुढं दुष्काळाचं ताट, जनावरांच्या चाऱ्याचाही गंभीर प्रश्न? 'कुट्टी'चा खर्च परवडेना; शेतकरी हवालदील
Rupali Patil Thombare: हे तुमचं अपयश; रूपाली ठोंबरेंनी सुनील तटकरेंना सुनावलं, मुलाच्या आमदारकीचंही काढलं
हे तुमचं अपयश; रूपाली ठोंबरेंनी सुनील तटकरेंना सुनावलं, मुलाच्या आमदारकीचंही काढलं
Embed widget