मुंबई : एसटी को-ऑपरेटिव्ह बँकेच्या (ST Bank) संचालक मंडळाची बैठक शुक्रवार 5 जानेवारी रोजी पार पडली. या बैठकीमध्ये मुख्यत्वे दोन ठराव बहुमताने मंजूर करण्यात आलेत. यामध्ये व्यवस्थापकीय संचालक सौरभ पाटील यांची नियुक्ती वैध असल्याचा ठराव संमत करण्यात आलाय.  सौरभ पाटील यांच्या नियुक्तीवर विभागीय सहकार आयुक्तांनी निकषांच्या आधारे प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. तसेच त्यांना ना व्यवस्थापकीय संचालक पदावरून मुक्त करण्याचे आदेश देण्यात आले. दरम्यान या बैठकीला गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) आणि जयश्री पाटील हे देखील उपस्थित होते. परंतु ते कोणत्याही प्रकारचे सदस्य नसल्यामुळे त्यांच्या उपस्थितीवरही आक्षेप घेण्यात आला. 


मात्र आजच्या संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये सौरभ पाटील यांची व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती ही वैध असल्याचा ठराव बहुमताने संमत करण्यात आला. विभागीय सहकार आयुक्तांनी दिलेले आदेश चुकीचे असल्याचं या बैठकीत निर्णय घेण्यात आला. तसेच या ठरावानंतर संचालक मंडळ आणि आयुक्तांना पत्रव्यवहार आणि कागदपत्र सोपवून ठरावानुसार आणि न्यायालयाच्या निकालानुसार ही नियुक्ती वैध असल्याचं कळवणार आहेत. 


22 जानेवारीलाही सुट्टी


22 जानेवारीला आयोध्या राम मंदिर प्राणप्रतिष्ठेचा सोहळा पार पडणार आहे. या दिवशी  एसटी को-ऑपरेटिव्ह बँक येथील सर्व कर्मचाऱ्यांना सुट्टी देण्यासंदर्भातील ठराव देखील समंत करण्यात आलाय. मात्र या संपूर्ण बैठकीमध्ये संचालक मंडळामध्ये दोन गट पडल्याचा दिसून आलं. संचालक मंडळातील 19 पैकी नऊ सदस्यांनी संचालक मंडळातील बैठकीत गुणरत्न सदावर्ते आणि जयश्री पाटील हे कुठलेही प्रकारचे सदस्य नसताना सहभागी झाल्याच्या विरोधात आक्षेप घेतला. 


ठरावांना देखील विरोध


या बैठकीमध्ये गुणरत्न सदावर्ते आणि जयश्री पाटील यांच्या विरोधात काही जणांनी आक्षेप घेतला. तसेच बैठकीत मंजूर करण्यात आलेल्या दोन ठरावांना देखील काही जणांकडून विरोध करण्यात आला. मात्र बहुमताने सौरभ पाटील यांच्या व्यवस्थापकीय संचालक पदाच्या नियुक्तीला 10 संचालकांनी पाठिंबा देऊन हा ठराव संमत केल्याचं सांगण्यात आलंय


एसटी बँक अडचणीत?


द स्टेट ट्रान्सपोर्ट को - ऑप बँक अर्थातच एसटी बँकेच्या अडचणी मागील अनेक दिवसांपासून वाढत चालल्या आहेत.  त्याचप्रमाणे मागील अनेक दिवसांपासून एसटी बँकेच्या अडचणीत देखील वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. कारण  नवं संचालक मंडळ आल्यापासून बँकेत 466 कोटींच्या ठेवी काढण्यात आल्या. त्याचप्रमाणे  बँकेचा सीडी रेशो 95 टक्क्यांच्या वर गेलाय. त्यामुळे अडचणीत वाढ होण्याची शक्यता असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. दरम्यान सदावर्तेंमुळेच बँकेच्या अडचणीत वाढ झाल्याचं आरोप महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसने केला. 


हेही वाचा : 


Loksabha Election 2024 : आधी फैसला अपात्रतेचा नंतर लगीन आघाडीचं? मविआत काँग्रेस सर्वाधिक जागा लढवण्याच्या तयारीत