एक्स्प्लोर

परीक्षा सुरु होताच अवघ्या 10 मिनिटात दहावीचा मराठीचा पेपर वायरल

या परीक्षा केंद्रावर बाहेरून कॉप्या पुरवण्याचे प्रकार सुरु होते. मात्र भरारी पथक आणि परीक्षा प्रवेक्षकांच मात्र या प्रकाराकडे सोयीस्कर दुर्लक्ष केल्याचं चित्र दिसून आलं. दरम्यान एबीपी माझा वर बातमी झळकल्यानंतर प्रशासन खडबडून जागे झालं.

जालना : आजपासून दहावीची परीक्षा सुरु झाली असताना परीक्षेच्या पहिल्याच दिवशी पेपर व्हायरल झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातल्या दहिफळ खंदारे गावात मराठीचा पेपर व्हॉट्सअॅपवर व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. मंगळवारी सकाळी 11 वाजता मराठीच्या पेपरला सुरवात झाली. मात्र 11 नंतर अवघ्या 10 मिनिटात पेपर परीक्षा केंद्राबाहेर विद्यार्थ्यांच्या मोबाईलवर व्हायरल झालेला पाहायला मिळाला. तसेच या गावातील ज्ञानदीप हायस्कुल शाळेच्या आवारातील परीक्षा केंद्रावर कॉप्यांचा सुळसुळाट पाहायला मिळाला. या परीक्षा केंद्रावर बाहेरून कॉप्या पुरवण्याचे प्रकार सुरु होते. मात्र भरारी पथक आणि परीक्षा प्रवेक्षकांच मात्र या प्रकाराकडे सोयीस्कर दुर्लक्ष केल्याचं चित्र दिसून आलं. दरम्यान एबीपी माझा वर बातमी झळकल्यानंतर प्रशासन खडबडून जागे झालं. प्रशासनाच्या मते एखाद्या विद्यार्थ्यांने वर्गात जाऊन फोटो काढून तो व्हायरल केला असावा. मात्र प्रशासनाने या प्रकरणाच्या चौकशी करणार असल्याचं सांगीतलं. दरम्यान या वर्षी दहावीच्या परीक्षेला पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण विभागातून 17 लाख विद्यार्थी बसले आहेत. यामध्ये 7 लाख मुलींचा समावेश आहे. यासोबत यंदा तब्बल 8 हजार 800 दिव्यांग विद्यार्थी दहावीची परीक्षा देणार आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

पुण्यात सराईत गुन्हेगार ‘लाल्या येवले’ची निर्घृण हत्या, सीसीटीव्हीत कैद; मुंबईतील कुर्ल्यातही गोळीबाराचा थरार
पुण्यात सराईत गुन्हेगार ‘लाल्या येवले’ची निर्घृण हत्या, सीसीटीव्हीत कैद; मुंबईतील कुर्ल्यातही गोळीबाराचा थरार
दिवाळीसाठी पाहुण्यांकडे आले, ह्रदयद्रावक दुर्घटना; वडिलांसह दोन मुलींचा धरणाच्या पाण्यात बुडून मृत्यू
दिवाळीसाठी पाहुण्यांकडे आले, ह्रदयद्रावक दुर्घटना; वडिलांसह दोन मुलींचा धरणाच्या पाण्यात बुडून मृत्यू
Anil Patil : गृहराज्यमंत्री योगेश कदमांनी कर्तव्यात कसूर करून गोपनीयतेचा भंग केलाय; सर्वप्रथम त्यांचा राजीनामा घ्यायला पाहिजे; आमदार अनिल पाटील यांची मागणी, म्हणाले....
गृहराज्यमंत्री योगेश कदमांनी कर्तव्यात कसूर करून गोपनीयतेचा भंग केलाय; सर्वप्रथम त्यांचा राजीनामा घ्यायला पाहिजे; आमदार अनिल पाटील यांची मागणी, म्हणाले....
अँटॉप हिलमधील हिंदूंचे फ्लॅट बांगलादेशींना दिले; म्हाडाचे 110 फ्लॅट बळकावल्याचा किरीट सोमय्यांचा आरोप
अँटॉप हिलमधील हिंदूंचे फ्लॅट बांगलादेशींना दिले; म्हाडाचे 110 फ्लॅट बळकावल्याचा किरीट सोमय्यांचा आरोप

व्हिडीओ

Ravindra Dhangekar on Chandrakant Patil:Satej Patil यांच्यावरील टीकेला उत्तर,चंद्रकांत पाटलांवर टीका
Majha Katta Mrudula Dadhe EP 1 : अजरामर गाण्यांमागच्या अफलातून गोष्टी, मृदुला दाढेंसोबत शब्दसुरांची मैफल
Satej Patil PC : धमक्या कुणाला देताय? मी सुद्धा पाटील, ३-३ मंत्र्यांना उत्तर UNCUT PC
Hasan Mushrif speech Gokul : ... ती बंटी पाटलांची शेवटची सभासमजा, 13 संचालकांना इशारा
Gokul Chairman Rajesh Patil: हसन मुश्रीफ भाषणाला उभे राहताच महायुतीचा उमेदवार जिंकला; गोकुळमध्ये काय घडलं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nvidia CEO Jensen Huang and Alice Huang: अमेरिकेच्या बड्या टेक कंपनीच्या CEO चं चिनी गुप्तहेर महिलेसोबत लफडं कसं बाहेर आलं, जगाचं लक्ष का?
अमेरिकेच्या बड्या टेक कंपनीच्या CEO चं चिनी गुप्तहेर महिलेसोबत लफडं कसं बाहेर आलं, जगाचं लक्ष का?
पुण्यात सराईत गुन्हेगार ‘लाल्या येवले’ची निर्घृण हत्या, सीसीटीव्हीत कैद; मुंबईतील कुर्ल्यातही गोळीबाराचा थरार
पुण्यात सराईत गुन्हेगार ‘लाल्या येवले’ची निर्घृण हत्या, सीसीटीव्हीत कैद; मुंबईतील कुर्ल्यातही गोळीबाराचा थरार
Hardik Pandya : हार्दिक पांड्याची पंजाब किंग्जमध्ये दाखल होताच पहिली पोस्ट, हार्दिक नव्या टीमच्या कर्णधाराचं नाव जाहीर करत म्हणाला...
हार्दिक पांड्या पंजाबमध्ये दाखल, पहिल्याच सोशल मीडिया पोस्टमध्ये पंजाबच्या चाहत्यांची मनं जिंकली
दिवाळीसाठी पाहुण्यांकडे आले, ह्रदयद्रावक दुर्घटना; वडिलांसह दोन मुलींचा धरणाच्या पाण्यात बुडून मृत्यू
दिवाळीसाठी पाहुण्यांकडे आले, ह्रदयद्रावक दुर्घटना; वडिलांसह दोन मुलींचा धरणाच्या पाण्यात बुडून मृत्यू
अँटॉप हिलमधील हिंदूंचे फ्लॅट बांगलादेशींना दिले; म्हाडाचे 110 फ्लॅट बळकावल्याचा किरीट सोमय्यांचा आरोप
अँटॉप हिलमधील हिंदूंचे फ्लॅट बांगलादेशींना दिले; म्हाडाचे 110 फ्लॅट बळकावल्याचा किरीट सोमय्यांचा आरोप
Ravindra Dhangekar: महायुतीत असलो तरी जे काही चाललंय ते लोकशाहीला घातक; जे पेरलंय तेच उगवेल, शेवट वाईट होईल! रवींद्र धंगेकरांचा इशारा
महायुतीत असलो तरी जे काही चाललंय ते लोकशाहीला घातक; जे पेरलंय तेच उगवेल, शेवट वाईट होईल! रवींद्र धंगेकरांचा इशारा
अजित दादांच्या प्रथम स्मृतीदिनाआधी दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण व्हावं; अमोल मिटकरींनी नेमकं काय म्हटलं
अजित दादांच्या प्रथम स्मृतीदिनाआधी दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण व्हावं; अमोल मिटकरींनी नेमकं काय म्हटलं
Sunetra Pawar : 'जशी वेळ येईल तशा गोष्टी....', भेटीगाठी अन् राष्ट्रवादींच्या विलीनीकरणावर सुनेत्रा पवारांचं सूचक वक्तव्य, नेमकं काय म्हणाल्या?
'जशी वेळ येईल तशा गोष्टी....', भेटीगाठी अन् राष्ट्रवादींच्या विलीनीकरणावर सुनेत्रा पवारांचं सूचक वक्तव्य, नेमकं काय म्हणाल्या?
Embed widget