एक्स्प्लोर

मुंबई उच्च न्यायालयाचे ज्येष्ठ न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी यांचा राजीनामा

मुंबई उच्च न्यायालयाचे विद्यमान मुख्य न्यायमूर्ती प्रदिप नंदराजोग हे या महिन्याअखेरीस सेवानिवृत्त होत आहेत. त्यामुळे 150 वर्षांपेक्षा अधिकचा इतिहास असलेल्या मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीपदावर कुणाची वर्णी लागणार याकडे साऱ्यांच्या नजरा लागून आहेत. सेवा ज्येष्ठतेनुसार न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी यांची मुख्य न्यायमूर्ती पदासाठीची निवड नक्की होती.

मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाचे ज्येष्ठ न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी यांनी शुक्रवारी भर कोर्टात आपण राजीनामा देत असल्याचं जाहीर केलं . 'आता या खंडपीठासमोर नवी प्रकरणं सादर करू नका, आज माझ्या कामकाजाचा शेवटचा दिवस आहे.', असं धर्माधिकारी यांनी जाहीर करताच गेली काही दिवस हायकोर्टात सुरू असलेल्या चर्चांना अखेर पूर्ण विराम मिळाला. त्यानंतर त्यांनी स्पष्ट केलं की 11 फेब्रुवारीलाच त्यांनी राष्ट्रपतींकडे आपला राजीनामा पाठवला होता. मुंबई उच्च न्यायालयाचे विद्यमान मुख्य न्यायमूर्ती प्रदिप नंदराजोग हे या महिन्याअखेरीस सेवानिवृत्त होत आहेत. त्यामुळे 150 वर्षांपेक्षा अधिकचा इतिहास असलेल्या मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीपदावर कुणाची वर्णी लागणार याकडे साऱ्यांच्या नजरा लागून आहेत. सेवा ज्येष्ठतेनुसार न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी यांची मुख्य न्यायमूर्ती पदासाठीची निवड नक्की होती. मात्र मुंबई उच्च न्यायालयातच मुख्य न्यायमूर्ती पदावर नेमणूक व्हावी अशी त्यांची इच्छा असली तरी तांत्रिक दृष्ट्या हे शक्य नव्हतं आणि अल्प कालावधीसाठी बाहेरच्या राज्यात जाण्याची आपली तयारी नाही. त्यामुळे कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि काही वैयक्तिक कारणांसाठी आपण हा राजीनामा दिल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. एबीपी माझाशी बोलताना त्यांनी स्पष्ट केलं की, हल्ली लोकं आणि लोकप्रतिनिधी स्वत:च्या जबाबदा-या विसरू लागले आहेत. सारं काही कोर्टाच्या भरवशावर सोडू लागलेत, हे योग्य नाही, लोकांनीच प्रश्न विचारायला हवेत. मुंबई उच्च न्यायालय ही एक ऐतिहासिक संस्था आहे, ती आजवर कुणापुढेही झुकली नाही. त्यामुळे ही परंपरा यापुढेही जपली गेली पाहिजे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. रोहित पवार यांच्या आमदारकीला राम शिंदेंचं आव्हान, पैसे वाटल्याचा, व्हॉट्सअॅपवर अपप्रचार केल्याचा आरोप निवृत्तीनंतर आता बराचसा वेळ स्वत:साठी, कुटुंबियांसाठी आणि लिखाणासाठी देण्याचा प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. यावेळी त्यांनी आपले वडिल आणि ज्येष्ठ गांधीवादी व्यक्तिमत्व चंद्रशेखर धर्माधिकारी यांची आठवण काढताना सांगितलं की, ते आज असते तर चित्रचं वेगळं असतं. कदाचित ही वेळ आलीच नसती, आणि आज जरी ते असते तर ,'मी तुझ्या पाठीशी आहे', असंच म्हणाले असते असं त्यांनी सांगितलं. चंद्रशेखर धर्माधिकारी यांचं काही महिन्यांपूर्वी निधन झालं आहे. न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारींचा अल्प परिचय - 60 वर्षीय सत्यरंजन धर्माधिकारी यांनी बी. कॉम., एलएलबीचे शिक्षण पूर्ण करत 28 जून 1983 साली वकिलीला सुरुवात केली. 14 नोव्हेंबर 2003 साली मुंबई उच्च न्यायालयात अतिरिक्त न्यायमूर्ती म्हणून त्यांची नियुक्ती झाली. नागरी समस्या, जनहित याचिका तसेच निवडणुकांसंदर्भातील याचिका हाताळताना त्यांनी नेहमीच आपली स्पष्ट आणि परखड मतं मांडली. हायकोर्टाशी संबंधित 16 समित्यांवरील सदस्यपद, 6 समित्यांचं अध्यक्षपद अशा अनेक जबाबदाऱ्या ते सांभाळत होते. दाभोलकर - पानसरे हत्याकांड, आरे कॉलनीतील मेट्रो कारशेड, ठाणे मेट्रो, मुंबई-ठाण्यातील वृक्षतोड, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा, पीएनबी बँक घोटाळा, निवडणूक प्रक्रियेसंदर्भातील प्रकरणं यांसह अनेक महत्त्वाच्या प्रकरणांची सुनावणी न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठापुढे सुरू होती.

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! जयंत पाटील मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीसाठी वर्षावर दाखल, सुनील तटकरेंसह प्रफुल्ल पटेलही उपस्थित, राजकीय घडामोडींना वेग
मोठी बातमी! जयंत पाटील मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीसाठी वर्षावर दाखल, सुनील तटकरेंसह प्रफुल्ल पटेलही उपस्थित, राजकीय घडामोडींना वेग
3 महिलांसह बनावट पोलीस, रात्रीची नाकाबंदही लावली; माऊलींच्या पालखीपूर्वी सातारा पोलिसांची कारवाई, 7 जणांना बेड्या
3 महिलांसह बनावट पोलीस, रात्रीची नाकाबंदही लावली; माऊलींच्या पालखीपूर्वी सातारा पोलिसांची कारवाई, 7 जणांना बेड्या
बांधकाम कामगारांना सुधारित कल्याणकारी योजना लागू; निवृत्ती वेतनही मिळणार, मुलांच्या शिक्षणासाठी 60 हजार
बांधकाम कामगारांना सुधारित कल्याणकारी योजना लागू; निवृत्ती वेतनही मिळणार, मुलांच्या शिक्षणासाठी 60 हजार
उद्धव ठाकरेंचं नागपुरात रामरक्षा आंदोलन; संजय राऊत पोहोचले, म्हणाले, देवेंद्र फडणवीसांनाही निमंत्रण, शिंदेंवर टीका
उद्धव ठाकरेंचं नागपुरात रामरक्षा आंदोलन; संजय राऊत पोहोचले, म्हणाले, देवेंद्र फडणवीसांनाही निमंत्रण, शिंदेंवर टीका

व्हिडीओ

Uddhav Thackeray Nagpur Ramraksha Andolan : नागपुरात रामरक्षा आंदोलनाची नवी कक्षा Special Report
Zero Hour Full : राष्ट्रवादीतील अंतर्गत कलह ते नागपुरात रामरक्षा आंदोलन, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
Eknath Shinde Delhi Visit to Meet Amit Shah : दिल्लीवारीचं कारण विस्तार की राजकारण? Special Report
Praful Patel On Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांना पक्षातूनच चॅलेंज, थेट नोटीसही पाठवली; आता प्रफुल पटेल यांची पहिली प्रतिक्रिया
Sunetra Pawar यांच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदावर आक्षेप घेणारे Sachchidanand Singh माझावर EXCLUSIVE

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : 'विहानचा जीव नेमका कुणामुळे गेला?' चेंबूर दुर्घटनेवरून भाजप नेते अमित साटम यांचा BMC वर थेट हल्लाबोल!
'विहानचा जीव नेमका कुणामुळे गेला?' चेंबूर दुर्घटनेवरून भाजप नेते अमित साटम यांचा BMC वर थेट हल्लाबोल!
Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंचा धडाका कायम! मुंबईतील तीन सुप्रसिद्ध हॉटेल्सवर कारवाई, अस्वच्छतेमुळे जागेवरच परवाना रद्द
तुकाराम मुंढेंचा धडाका कायम! मुंबईतील तीन सुप्रसिद्ध हॉटेल्सवर कारवाई, अस्वच्छतेमुळे जागेवरच परवाना रद्द
मोठी बातमी! जंयत पाटील मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीसाठी वर्षावर दाखल, सुनील तटकरेंसह प्रफुल्ल पटेलही उपस्थित, राजकीय घडामोडींना वेग
मोठी बातमी! जंयत पाटील मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीसाठी वर्षावर दाखल, सुनील तटकरेंसह प्रफुल्ल पटेलही उपस्थित, राजकीय घडामोडींना वेग
IND vs ENG : कोट्यवधी चाहत्यांची निराशा, इंग्लंडमध्ये पहिल्या वनडेत विराट कोहली, रोहित शर्मा फ्लॉप, शुभमन गिल, श्रेयस अय्यरनं किल्ला लढवला
कोट्यवधी चाहत्यांची निराशा, इंग्लंडमध्ये पहिल्या वनडेत विराट कोहली, रोहित शर्मा फ्लॉप
बांधकाम कामगारांना सुधारित कल्याणकारी योजना लागू; निवृत्ती वेतनही मिळणार, मुलांच्या शिक्षणासाठी 60 हजार
बांधकाम कामगारांना सुधारित कल्याणकारी योजना लागू; निवृत्ती वेतनही मिळणार, मुलांच्या शिक्षणासाठी 60 हजार
3 महिलांसह बनावट पोलीस, रात्रीची नाकाबंदही लावली; माऊलींच्या पालखीपूर्वी सातारा पोलिसांची कारवाई, 7 जणांना बेड्या
3 महिलांसह बनावट पोलीस, रात्रीची नाकाबंदही लावली; माऊलींच्या पालखीपूर्वी सातारा पोलिसांची कारवाई, 7 जणांना बेड्या
आधी बस स्टँड, आता बारामती रेल्वे स्थानकाचं रुपडं पालटलं; 11.4 कोटी खर्चून पुनर्विकास, लवकरच लोकार्पण

Embed widget