मुंबई : दोन दिवसात नव्याने (CoronaVirus) कोरोना बाधित होणाऱ्यांची संख्या 10 हजाराच्या पार गेली आहे. गेल्या वर्षी 30 जुलैला राज्यात प्रथम नव्याने बाधित होणाऱ्या कोरोना बाधितांची संख्या 10 हजाराच्या वर गेली होती. त्यामुळे ज्या पद्धतीने सध्याची आकडेवारी वाढत आहे त्यामुळे 'जुलै 2020' या महिन्यांची पुनरावृत्ती होते की काय अशी शंका आल्याशिवाय राहत नाही.


गेल्यावर्षी त्या काळात लस नव्हती मात्र आता ती उपलब्ध आहे. शिवाय त्या काळात दिवसागणिक मृत्यू होण्याचे प्रमाणात खूप मोठ्या प्रमाणत होते. कोरोनाबाधितांची संख्या जुलै महिन्यात रोज हळू हळू वाढत जाऊन ती 30 जुलैला 11 हजारांच्या पार गेली आणि नंतर सातत्याने ती संख्या वाढतच राहिली.


30 जुलैला ज्यावेळी संख्या कोरोनाबाधितांची संख्या 11 हजारांच्या पार गेली होती त्यादिवशी राज्यातील मृतांचा आकडा हा 266 इतका होता. सध्या कोरोनाबाधितांची संख्या वाढत असली तरी मृत्यू होण्याचे प्रमाणात खूप कमी आहे. तसेच आरोग्य यंत्रणेने या आजाराविरोधात जी उपचारपद्धती विकसित केली आहे त्याला चांगले यश प्राप्त झाले आहे. मोठ्या प्रमाणत रुग्ण उपचार घेऊन बरे होऊन घरी जात आहे. तरीही ज्या पद्धतीने मोठ्या प्रमाणात या आजाराचा जो काही संसर्ग होत आहे तो टाळण्यासाठी सुरक्षिततेचे उपायांचे नागरिकांनी पालन केले पाहिजे असे मत वैद्यकीय क्षेत्रातून व्यक्त होत आहे.


Organ Donation | 44 तासात 4 अवयवदान, 7 व्यक्तींना जीवदान!


जानेवारी 2021, महिन्यात कोरोनाच्या वाढत्या संख्येवर आरोग्य यंत्रणा नियंत्रण मिळविण्यात यशस्वी झाली होती. मात्र फेब्रुवारी महिन्यात पुन्हा एकदा ही संख्या वेगाने इतकी वाढत गेली कि आत रोज नव्याने होणारी रुग्णसंख्या 10 हजाराच्या पार गेली आहे. विशेष म्हणजे राज्यातील बहुतांश गोष्टी दैनंदिन व्यवहारासाठी खुल्या करून देण्यात आल्या आहेत.


मुंबई, पुणे, नागपुरात कोरोना संकट


राज्याच्या आरोग्य विभागाच्या आकडेवारी 6 मार्च रोजी 10 हजार 187 नवीन रुग्णांचे निदान झाले असून 6 हजार 080 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर राज्यात 47 व्यक्तींचा या आजराने मृत्यू झाला आहे. अद्यापही राज्यात एकूण 92 हजार 817 अॅक्टिव्ह रुग्ण असून ते राज्याच्या विविध भागात उपचार घेत आहेत. राज्यात मुबंई शहरांसोबत पुणे, अमरावती आणि नागपूर शहरात या कोरोनाबाधितांचे प्रमाणात जास्त आहे.
याप्रकरणी मुंबई शहराच्या कोरोना मृत्यू विश्लेषण समितीचे अध्यक्ष डॉ अविनाश सुपे यांनी सांगितले की , " खरं तर रुग्ण संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे ही गंभीरच बाब म्हणावी लागेल. कारण संसर्गाचा फैलाव मोठ्या प्रमाणात होतोय हे यावरून सिद्ध होते. लोकांमध्ये बेफिकिरी वाढली आहे. मृत्यू दर आधीपेक्षा खूप कमी आहे. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात रुग्ण बरे होऊन घरी जात आहे. या सर्व चांगल्या गोष्टी असल्या तरी रुग्णसंख्या वाढणे कधीही धोकादायकच आहे. त्यामुळे नागरिकांनी दैनंदिन व्यवहार करताना सुरक्षिततेचे सर्व नियम पाळलेच पाहिजे. "