एक्स्प्लोर

टिकाव-फावडे यांचं लग्न, वॉटर कप स्पर्धेत खास विवाह सोहळा!

इंदापूर : इंदापूर तालुक्यात एक अनोखा विवाह सोहळा पार पडला. निमित्त होते सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेच्या अखेरच्या दिवसाचे. या स्पर्धेत इंदापूर तालुक्यातील २२ गावांचा समावेश होता. अनेक गावे वेगवेगळ्या पध्दतीने श्रमदान करीत होते. तालुक्यातील कळस व निरगुडे या दोन्ही गावांनी मात्र एक अनोखी शक्कल लढविली. श्रमदानात महत्वाचे हत्यार असलेले टिकाव व फावडे (खोरे) यांचं लग्न लावून अनोख्या पद्धतीनं त्यांनी श्रमदान केलं. कळसगावचा नवरदेव तर निरगुडेगावची नवरीमुलगी यांचा विवाह करण्याचे ठरविले. सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेच्या अखेरच्या दिवशी या लग्नाची तारीख ठरविली गेली. कळसगावचा टिकावराव तर निरगुडेगावची फावडेताई. लग्न जरी या निर्जीव वस्तूंचे असले तरी खऱ्याखुऱ्या लग्नासारखे लग्न लावण्यात आले. पत्रिका काढण्यात आल्या. लग्नाच्या अगोदरच्या दिवशी नवरा व नवरी मुलीला हळद लावण्यात आली. हळदी समारंभ मोठ्या धूमधडाक्यात करण्यात आला. लग्नाच्या दिवशी नवरदेवाच्या गावी म्हणजेच कळसला लग्नाची तयारी करण्यात आली. मंडप टाकण्यात आला. निरगुडेकर नवरीमुलीला घेऊन वऱ्हाडी मंडळी कळसगावाला आली. नवरा नवरीला नटविण्यात आलं. त्याना मंडपात आणलं गेलं, अक्षता वाटण्यात आल्या. गुरुजींनी माईक घेतला अन् मंगलअष्ठका म्हणण्यास सुरुवात केली. दोन मंगलअष्ठका झाल्यानंतर आलेल्या वऱ्हाडी मंडळींनी शेजारी आसलेल्या ओढ्यात श्रमदान करण्यास सुरुवात केली. दोन्ही गावच्या लोकांनी काही वेळ एकत्र येऊन श्रमदान केले. अर्ध्या तासानंतर पुन्हा सगळी वऱ्हाडी मंडपात आली अन् अखेरच्या मंगलअष्ठका सुरु झाल्या आणि टिकावराव व फावडेताई यांचा शुभविवाह संपन्न झाला! आहेर म्हणून आणलेली झाडे व बिया स्वीकारण्यात आली. तर आलेल्या वऱ्हाडी मंडळीना जेवण देण्यात आले. अशा प्रकारे हा शुभविवाह पार पडला.

महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक! मुलाच्या ऑपरेशनसाठी पेरोलवर बाहेर; पण स्वतःला वाचवण्यासाठी सराईत गुन्हेगाराचा चक्क तुरुंगातच आश्रय
धक्कादायक! मुलाच्या ऑपरेशनसाठी पेरोलवर बाहेर; पण स्वतःला वाचवण्यासाठी सराईत गुन्हेगाराचा चक्क तुरुंगातच आश्रय
Ahilyanagar Crime News: माझं नाव माईकवर का घेतलं नाही? अहिल्यानगरमध्ये लग्नात तलाठ्याची गुंडगिरी; सूत्रसंचालकाच्या थेट डोक्यात मारला माईक
माझं नाव माईकवर का घेतलं नाही? अहिल्यानगरमध्ये लग्नात तलाठ्याची गुंडगिरी; सूत्रसंचालकाच्या थेट डोक्यात मारला माईक
प्रभू श्रीरामांचा बॅनर, भगवा झेंडा, गावागावात जाऊन सभा घेणार; राम मंदिर चोरीवरुन भास्कर जाधव आक्रमक
प्रभू श्रीरामांचा बॅनर, भगवा झेंडा, गावागावात जाऊन सभा घेणार; राम मंदिर चोरीवरुन भास्कर जाधव आक्रमक
MSRTC: राज्यातील ST महामंडळाच्या 1485 हेक्टर जागांच्या खासगीकरणाचा घाट, उत्पन्नवाढीच्या नावाखाली मोक्याच्या जागांवर डोळा
राज्यातील ST महामंडळाच्या 1485 हेक्टर जागांच्या खासगीकरणाचा घाट, उत्पन्नवाढीच्या नावाखाली मोक्याच्या जागांवर डोळा

व्हिडीओ

Kolhapur Crime : घरात मुलीच्या बारशासाठी लगबग सुरू असताना कोल्हापूर हादरलं
Vinayak Raut PC : १२ कोटींची मागणी; माझ्या बदनामीचे मोठे राजकीय षडयंत्र, विनायक राऊतांचे आरोप
Ladki Bahin Yojana : 'लाडकी बहीण' योजनेतून 92 लाख लाभार्थी वगळले
Jejuri Warkari Accident : जेजुरीजवळ वारकऱ्यांच्या टेम्पोचा अपघात, तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू
Majha Sanman Award 2026: अरुण फिरोदिया यांचा उद्योगक्षेत्रातील अतुलनीय कामगिरीबद्दल ‘माझा सन्मान’ पुरस्काराने गौरव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बारमध्ये पार्टी सुरु असतानाच आग लागल्याने 27 जणांचा कोळसा, 60 जण होरपळले; जीव वाचवण्यासाठी टाॅयलेटमध्ये लपले
बारमध्ये पार्टी सुरु असतानाच आग लागल्याने 27 जणांचा कोळसा, 60 जण होरपळले; जीव वाचवण्यासाठी टाॅयलेटमध्ये लपले
युद्ध पुन्हा पेटलं असतानाच इराणमध्ये अशा सिक्रेट रशियन विमानाची एन्ट्री, अमेरिकेसह डोनाल्ड ट्रम्पची सुद्धा पाचावर धारण बसली पाहिजे! या विमानाची माहिती कधीच उघड केली जात नाही कारण..
युद्ध पुन्हा पेटलं असतानाच इराणमध्ये अशा सिक्रेट रशियन विमानाची एन्ट्री, अमेरिकेसह डोनाल्ड ट्रम्पची सुद्धा पाचावर धारण बसली पाहिजे! या विमानाची माहिती कधीच उघड केली जात नाही कारण..
धक्कादायक! मुलाच्या ऑपरेशनसाठी पेरोलवर बाहेर; पण स्वतःला वाचवण्यासाठी सराईत गुन्हेगाराचा चक्क तुरुंगातच आश्रय
धक्कादायक! मुलाच्या ऑपरेशनसाठी पेरोलवर बाहेर; पण स्वतःला वाचवण्यासाठी सराईत गुन्हेगाराचा चक्क तुरुंगातच आश्रय
Mumbai Crime News: 'त्या' विषारी कॅप्सूलचे कनेक्शन थेट दिल्ली ते ओमानपर्यंत; इराण, इराक देशातील नंबरही मिळाले, आरोपीच्या मोबाइलमध्ये आक्षेपार्ह मेल अन् तपासात...
'त्या' विषारी कॅप्सूलचे कनेक्शन थेट दिल्ली ते ओमानपर्यंत; इराण, इराक देशातील नंबरही मिळाले, आरोपीच्या मोबाइलमध्ये आक्षेपार्ह मेल अन् तपासात...
प्रभू श्रीरामांचा बॅनर, भगवा झेंडा, गावागावात जाऊन सभा घेणार; राम मंदिर चोरीवरुन भास्कर जाधव आक्रमक
प्रभू श्रीरामांचा बॅनर, भगवा झेंडा, गावागावात जाऊन सभा घेणार; राम मंदिर चोरीवरुन भास्कर जाधव आक्रमक
Gold Silver Rate : अमेरिका इराण युद्धामुळं सोने- चांदीच्या दरात घसरण सुरु, आठवड्यात सोने 4000 रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या सोने-चांदीचे लेटेस्ट दर
सोने आणि चांदीच्या दरात घसरण सुरु, आठवड्यात सोने 4000 रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या सोने-चांदीचे लेटेस्ट दर
तुकाराम मुंढेंच्या FDA ची संभाजीनगरमध्ये ऑईल कंपनीवर धाड; पाम तेलासह 2 कोटी 93 लाखांचे खाद्यतेल जप्त
तुकाराम मुंढेंच्या FDA ची संभाजीनगरमध्ये ऑईल कंपनीवर धाड; पाम तेलासह 2 कोटी 93 लाखांचे खाद्यतेल जप्त
लाडकी बहिण योजनेत 14 लाख पुरुषांची नावे घुसवली; भाजप प्रवक्त्यांचा काँग्रेसवर आरोप, महिला संख्या कमी झाल्याने वाद
लाडकी बहिण योजनेत 14 लाख पुरुषांची नावे घुसवली; भाजप प्रवक्त्यांचा काँग्रेसवर आरोप, महिला संख्या कमी झाल्याने वाद
Embed widget