एक्स्प्लोर

भाजपच्या स्पेशल ट्रेनने कार्यकर्त्यांना नागपुरातच सोडलं

भाजपच्या स्थापना दिनानिमित्त उद्या बीकेसीत होणाऱ्या महामेळाव्यासाठी नागपूरहून एका विशेष रेल्वेची सुविधा करण्यात आली होती. मात्र ही रेल्वे वेळेच्या जरा जास्तच आधी निघाल्यानं भाजप कार्यकर्त्यांची चांगलीच तारांबळ उडाली.

नागपूर : भाजपच्या स्थापना दिनानिमित्त उद्या बीकेसीत होणाऱ्या महामेळाव्यासाठी नागपूरहून एका विशेष रेल्वेची सुविधा करण्यात आली होती.  मात्र ही रेल्वे वेळेच्या जरा जास्तच आधी निघाल्यानं भाजप कार्यकर्त्यांची चांगलीच तारांबळ उडाली. या विशेष ट्रेनची वेळ सकाळी साडे दहा वाजता सांगण्यात आली होती. मात्र सकाळी 9 वाजता जेव्हा कार्यकर्ते रेल्वे स्टेशनवर दाखल झाले, तेव्हा ती ट्रेन सकाळी 7 वाजताच रवाना झाल्याची माहिती कार्यकर्त्यांना देण्यात आली. विशेष म्हणजे, त्यावेळी ट्रेनमध्ये फक्त 32 कार्यकर्ते होते. ट्रेनच्या बदललेल्या वेळेची माहिती रेल्वे प्रशासनानं भाजपच्या नेत्यांना मेल केल्याचं सांगितलं. मात्र, तसे कोणतेही मेल आपल्याला मिळाले नसल्याचं सांगत भाजप नेत्यांनी हात वर केले. अखेर वर्ध्यातून एक विशेष ट्रेन नागपूरला आणून नंतर ती मुंबईला रवाना करण्याची मागणी करण्यात आली. आता वर्ध्यातून नागपूरला ट्रेन पोहोचेपर्यंत दुपारचे साडे तीन वाजले.  आणि अखेर साडे तीन वाजता हजारो कार्यकर्त्यांसह ही ट्रेन मुंबईला रवाना झाली. दरम्यान, भाजपच्या उद्या होणाऱ्या महामेळाव्यासाठी राज्यभरातून कार्यकर्ते मुंबईत दाखल होत आहेत. या रॅलीसाठी भाजपने जय्यत तयारी केली आहे. राज्यासह देशभरातून सुमारे 4 लाख कार्यकर्त्यांची फौज मुंबईत दाखल होणार असल्याचा दावा भाजपने केला आहे. याशिवाय स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मेळाव्यासाठी जातीने लक्ष घातलं आहे. या जल्लोष सभेनंतर अमित शाह मंत्री, आमदार, खासदार आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांचं परफॉर्मन्स ऑडिट करणार आहेत. कार्यकर्त्यांना ऊर्जा दिल्यानंतर नेत्यांची झाडाझडती होणार आहे. दुसरीकडे या रॅलीसाठी भाजपाध्यक्ष अमित शाहांच्या मुंबईत दाखल झाले. पण मुंबईतील ट्रॅफिकचा फटका अमित शाहांनाही बसला. अमित शाह मुंबई विमानतळावरुन बीकेसी मैदानाकडे रवाना झाले. यावेळी काढण्यात आलेली बाईक रॅली मुंबईच्या वाहतूक कोंडीत अडकली. संबंधित बातम्या भाजपच्या शक्तिप्रदर्शनाला सलमानच्या जामीन निकालाचा फटका बसणार? 6 एप्रिलला भाजपचा महामेळावा, मुंबईत शक्तीप्रदर्शन

महत्त्वाच्या बातम्या

Ramdas Kadam On Tejas Thackeray : तेजस ठाकरेंनी राजकारणात यावं, मात्र आदित्यने जसं नाव खराब केलं तसं करू नये; रामदास कदमांकडून वडिलकीचा सल्ला, म्हणाले, 'ते आमच्या मुलांसारखेच...'
तेजस ठाकरेंनी राजकारणात यावं, मात्र आदित्यने जसं नाव खराब केलं तसं करू नये; रामदास कदमांकडून वडिलकीचा सल्ला, म्हणाले, 'ते आमच्या मुलांसारखेच...'
Vijay Wadettiwar : जो-जो मोदींच्या, चोर ज्ञानेश कुमारच्या विरोधात आंदोलन करेल, त्या सर्वांना आमचा पाठिंबा; विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल, म्हणाले, होळीपर्यंत महायुतीचे सरकार नष्ट होईल
जो-जो मोदींच्या, चोर ज्ञानेश कुमारच्या विरोधात आंदोलन करेल, त्या सर्वांना आमचा पाठिंबा; विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल, म्हणाले, होळीपर्यंत महायुतीचे सरकार नष्ट होईल
किलोला 500 रुपये मिळवून देणारा हुरडा यंदा करपला! संभाजीनगरच्या 2 गावातल्या 14 कोटींच्या उलाढालीवर दुष्काळ संकट
किलोला 500 रुपये मिळवून देणारा हुरडा यंदा करपला! संभाजीनगरच्या 2 गावातल्या 14 कोटींच्या उलाढालीवर दुष्काळ संकट
Maharashtra Live blog updates: मालेगाव शहरात आजपासून 10 मिनिटांची पाणी कपात
Maharashtra Live blog updates: मालेगाव शहरात आजपासून 10 मिनिटांची पाणी कपात

व्हिडीओ

Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Asaduddin Owaisi On Elon Musk : मोदींवर टीका करणाऱ्या इलॉन मस्कला ओवैसींचा इशारा, परदेशी व्यक्तीने पंतप्रधानांवर बोललेलं ऐकून घेणार नाही...
मोदींवर टीका करणाऱ्या इलॉन मस्कला ओवैसींचा इशारा, परदेशी व्यक्तीने पंतप्रधानांवर बोललेलं ऐकून घेणार नाही...
Gopichand Padalkar: 'ही लढाई केवळ एका खुर्चीसाठी किंवा संचालक पदासाठी नाही, तर..' सुप्रीम कोर्टात सांगली जिल्हा बँकेसाठी अर्ज वैध होताच गोपीचंद पडळकर म्हणाले..
'ही लढाई केवळ एका खुर्चीसाठी किंवा संचालक पदासाठी नाही, तर..' सुप्रीम कोर्टात सांगली जिल्हा बँकेसाठी अर्ज वैध होताच गोपीचंद पडळकर म्हणाले..
Tesla Roadster Car Elon Musk: एलन मस्कच्या टेस्लाची हवेत उडणारी कार पाहून चाट पडाल; चार्जिंग, स्पीड, स्पेसशीपसारखा लूक, काय आहेत 'रोडस्टर'ची वैशिष्ट्ये
एलन मस्कच्या टेस्लाची हवेत उडणारी कार पाहून चाट पडाल; चार्जिंग, स्पीड, स्पेसशीपसारखा लूक, काय आहेत 'रोडस्टर'ची वैशिष्ट्ये
Ramdas Kadam On Tejas Thackeray : तेजस ठाकरेंनी राजकारणात यावं, मात्र आदित्यने जसं नाव खराब केलं तसं करू नये; रामदास कदमांकडून वडिलकीचा सल्ला, म्हणाले, 'ते आमच्या मुलांसारखेच...'
तेजस ठाकरेंनी राजकारणात यावं, मात्र आदित्यने जसं नाव खराब केलं तसं करू नये; रामदास कदमांकडून वडिलकीचा सल्ला, म्हणाले, 'ते आमच्या मुलांसारखेच...'
Sandeep Deshpande : तुम्ही सत्तेत असताना फेल ठरलाय, आम्हाला तुमची सत्ता नकोय, आम्ही मतदानाद्वारे बदल करणार, संदीप देशपांडेंचं भाजपला प्रत्युत्तर
तुम्ही अपयशी ठरलाय,आम्हाला तुमची सत्ता नकोय, आम्ही मतदानाद्वारे बदल करणार, संदीप देशपांडेंचं भाजपला प्रत्युत्तर
Yuzvendra Chahal: 'दारूच्या आहारी गेलो, पॅनिक अटॅकने तोंड वाकडं व्हायचं, ओठ एका बाजूला ओढल्याने बोलता सुद्धा येत नव्हतं, त्यामुळे 26 दिवस..' ; घटस्फोटानंतरची चहलने सांगितली भयावह कहाणी
'दारूच्या आहारी गेलो, पॅनिक अटॅकने तोंड वाकडं व्हायचं, ओठ एका बाजूला ओढल्याने बोलता सुद्धा येत नव्हतं, त्यामुळे 26 दिवस..' ; घटस्फोटानंतरची चहलने सांगितली भयावह कहाणी
Amravati Teacher Constituency : अमरावती शिक्षक मतदारसंघात महायुतीत वाद पेटला! वंचितच्या पाठिंब्यासाठी एकनाथ शिंदेंची मोठी खेळी; खास दूत 'राजगृहा'वर
अमरावती शिक्षक मतदारसंघात महायुतीत वाद पेटला! वंचितच्या पाठिंब्यासाठी एकनाथ शिंदेंची मोठी खेळी; खास दूत 'राजगृहा'वर
Pune News: पुण्यात ‘रॅपिडो’ची ‘बाईक टॅक्सी’ बंद; जिल्हाधिकाऱ्यांचे ‘पुणे आरटीए’च्या बैठकीत आदेश, नेमकं काय आहे कारण?
पुण्यात ‘रॅपिडो’ची ‘बाईक टॅक्सी’ बंद; जिल्हाधिकाऱ्यांचे ‘पुणे आरटीए’च्या बैठकीत आदेश, नेमकं काय आहे कारण?
Embed widget