एक्स्प्लोर

स्पेशल रिपोर्ट : रियाज भाटी, भाजप आणि दाऊद

मुंबई: मुंबई क्रिकेट असोसिएशन अर्थात एमसीएच्या मार्केटिंग कमिटीचे सदस्य असलेल्या रियाज भाटी यांचे अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीमशी संबंध असल्याचा सनसनाटी आरोप करुन, राष्ट्रवादीनं खळबळ उडवून दिली आहे. इतकंच नाही तर गंभीर गुन्हे दाखल असलेल्या भाटींना वाचवण्यासाठी भाजप सरकार आणि आशिष शेलार काम करत असल्याचा आरोप, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी म्हटलं आहे. ज्या मोदींनी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीमच्या मुसक्या आवळण्याची प्रतिज्ञा केली होती, त्याच दाऊदशी भाजप नेत्यांचे संबंध असल्याचा सनसनाटी आरोप राष्ट्रवादीनं केला आहे. त्यातली महत्वाची कडी ठरलाय तो रियाज भाटी. स्पेशल रिपोर्ट : रियाज भाटी, भाजप आणि दाऊद विल्सन जिमखान्याचा सर्वेसर्वा. एमसीएत शरद पवार आणि शेलारांच्या मांडीला मांडी लावून बसणारा रियाज भाटी. रियाज भाटीचं प्रकरण गंमतीशीर आहे. फुलजी भाटी नावानं एक माणूस दाऊदच्या लोकांना भेटण्यासाठी जोहान्सबर्गला जाणार आहे, अशी टीप आयबीला होती. त्यामुळं फुलजी भाटी नावाच्या माणसाबद्दल आयबीनं रेडअलर्ट जारी केला. त्यानुसार वर्षभरापूर्वी म्हणजे ऑक्टोबर 2015 मध्ये फुलजी भाटीला मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर अटक करण्यात आली. सहार पोलिसांनी त्याची चौकशी केली. यात तो फुलजी नव्हे तर रियाज भाटी असल्याचं समोर आलं. फुलजी उर्फ रियाज भाटीकडे 2 पासपोर्ट आढळून आल्याची माहिती आहे.  याप्रकरणी फुलजी उर्फ रियाज भाटीवर गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र इतक्या संवेदनशील प्रकरणात रियाजला अवघ्या 15 दिवसात जामीन मिळाला. 90 दिवसात रियाजवर आरोपपत्र दाखल होणं आवश्यक असताना वर्षभरानंतरही कारवाई झाली नाही. भाजपशी जवळीक असल्यानंच रियाजची सुटका झाली, आणि त्यानंतर आशिष शेलारांच्या कृपेनं त्यानं एमसीएत शिरकाव केल्याचा आरोपही नवा मलिकांनी केला आहे. अर्थात भाजपनं हे सगळे आरोप फेटाळून लावलेत आणि भाटीनंही आपण मलिकांविरोधात अब्रूनुकसानीचा दावा टाकणार असल्याचं म्हटलंय. कधीकाळी गुंडांशी आरोप असल्यानं राष्ट्रवादी बदनाम होती. आता काळाची चक्र उलटी फिरु लागलीत. परवाच कुख्यात पप्पू घोलप आणि शाम शिंदेला भाजपनं पावन करुन घेतल्यानं लोकांचे डोळे फिरले होते. आता तर थेट दाऊदशी संबंध असल्याचा आरोप होतोय.. राजकारण परसेप्शनवर चालतं.. त्यामुळं स्वच्छ चारित्र्याच्या फडणवीसांनी याची गांभीर्यानं दखल घेणं गरजेचं आहे.

संबंधित बातमी

ना भाजपशी संबंध, ना दाऊदशी, रियाज भाटींचं स्पष्टीकरण  रियाज भाटी कोण हे पवारांनाच विचारा, भाजपचा राष्ट्रवादीवर पलटवार

महत्त्वाच्या बातम्या

मराठा आरक्षण कक्ष पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करा, सात दिवसांमध्ये अधिकारी व कर्मचाऱ्यांची पदे भरा, विखे पाटलांचे निर्देश 
मराठा आरक्षण कक्ष पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करा, सात दिवसांमध्ये अधिकारी व कर्मचाऱ्यांची पदे भरा, विखे पाटलांचे निर्देश 
दिल्लीत राजकीय घडामोडींना वेग, अमित शाहनंतर सुनील तटकरेंनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट 
दिल्लीत राजकीय घडामोडींना वेग, अमित शाहनंतर सुनील तटकरेंनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट 
..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा, सौरव दास यांनीही दिला सुप्रीम कोर्टाचा दाखला
..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा, सौरव दास यांनीही दिला सुप्रीम कोर्टाचा दाखला
राज्यातील 16 लाख 96 हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ, अहिल्यानगर जिल्ह्यात सर्वाधिक पात्र शेतकरी, सहकार आयुक्तांची माहिती 
राज्यातील 16 लाख 96 हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ, अहिल्यानगर जिल्ह्यात सर्वाधिक पात्र शेतकरी, सहकार आयुक्तांची माहिती 

व्हिडीओ

Sharad Pawar To Meet PM Modi | वाढल्या भेटी, जुळणार गाठी? | ABP Majha Special Report
Dharmendra Pradhan Welcome After Resignation: गमावला पदभार... तरी हार, तुरे, सत्कार | Special Report
Aaditya Thackeray NEET: नीट आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या ठाकरेंची मदत, केस लढण्यासाठी वकील मैदानात उतरवणार, आदित्य ठाकरेंची माहिती
Aditya Thackeray On Fadnavis : सीईटी परीक्षेबाबत मुख्यमंत्र्यांनी माध्यमासमोर येऊन उत्तर द्यावं
Sharad Pawar On NCP Merger: राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vaibhav Sooryavanshi: वैभव सूर्यवंशीच्या समर्थनार्थ रविचंद्रन अश्विन मैदानात, थेट रिकी पाँटिंगचा दाखला देत म्हणाला...
वैभव सूर्यवंशीच्या समर्थनार्थ रविचंद्रन अश्विन मैदानात, थेट रिकी पाँटिंगचा दाखला देत म्हणाला...
Chief Minister Wealth : देशातील सर्वाधिक श्रीमंत मुख्यमंत्री कोण? सर्वात कमी संपत्ती कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे?
देशातील सर्वाधिक श्रीमंत मुख्यमंत्री कोण? सर्वात कमी संपत्ती कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे? 
Karja Mafi Scheme : पहिल्या टप्प्यात कर्जमाफीसाठी मराठवाड्यात किती शेतकरी पात्र? पाहा संपूर्ण यादी
पहिल्या टप्प्यात कर्जमाफीसाठी मराठवाड्यात किती शेतकरी पात्र? पाहा संपूर्ण यादी
Arvind Sawant : जंतर मंतरवर ठिणगीचं रुपांतर ज्वालामुखीत झालं, विद्यार्थ्यांनी संविधान आणि तिरंगा हाती घेत लढा दिला : अरविंद सावंत
जंतर मंतरवर ठिणगीचं रुपांतर ज्वालामुखीत झालं, विद्यार्थ्यांनी संविधान आणि तिरंगा हाती घेत लढा दिला : अरविंद सावंत
..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा, सौरव दास यांनीही दिला सुप्रीम कोर्टाचा दाखला
..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा, सौरव दास यांनीही दिला सुप्रीम कोर्टाचा दाखला
पुणे विद्यापीठातून बोगस पदवी प्रमाणपत्र; 3 लाख रुपयांत बी.कॉम सर्टिफिकेटचा सौदा, रिक्षावाल्याच्या दाव्याने खळबळ
पुणे विद्यापीठातून बोगस पदवी प्रमाणपत्र; 3 लाख रुपयांत बी.कॉम सर्टिफिकेटचा सौदा, रिक्षावाल्याच्या दाव्याने खळबळ
L&T Q1 Results: एल अँड टीची पहिल्या तिमाहीत दमदार कामगिरी, निव्वळ नफा 4123 कोटींवर,शेअरमध्ये तेजी येणार?
एल अँड टीची पहिल्या तिमाहीत दमदार कामगिरी, निव्वळ नफा 4123 कोटींवर,शेअरमध्ये तेजी येणार?
भरधाव ट्रकची धडक; दुचाकीवरील दोन महिला जागेवरच ठार, अपघाताच्या भीषण घटनेनंतर वाहनांच्या रांगाच रांगा
भरधाव ट्रकची धडक; दुचाकीवरील दोन महिला जागेवरच ठार, अपघाताच्या भीषण घटनेनंतर वाहनांच्या रांगाच रांगा
Embed widget