एक्स्प्लोर
नकारात्मक बातम्यांवर फडणवीसांचा वॉच, विशेष कक्षाची स्थापना
मुंबई : सरकारविरोधी बातम्यांवर लक्ष ठेवण्यासाठी फडणवीस सरकार पावलं उचलत आहे. त्यासाठी विशेष 'मीडिया मॉनिटरींग सेल' बनवला जाणार आहे. या कक्षाच्या माध्यमातून वृत्तपत्र, वृत्तवाहिन्यांसह सोशल मीडियावरील नकारात्मक मजकुरावर लक्ष ठेवले जाणार आहे.
या सेलचे काम राज्याच्या सचिवालयातून चालणार असून 24 तास माध्यमांवर नजर ठेवली जाणार आहे. सरकारची प्रतिमा मलिन होऊ नये, समाजाता नकारात्मक संदेश जाऊ नये, यासाठी ही पावलं उचलली जात असल्याचं सांगण्यात येत आहे.
सरकारबाबत माध्यमांमध्ये दाखवल्या जाणाऱ्या नकारात्मक बातम्यांवर लक्ष ठेऊन, त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी एक विशेष कक्ष बनवला जाईल, असं एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं. हा कक्ष विविध डिजीटल प्लॅटफॉर्मवरील नकारात्मक बातम्यांनाही उत्तर देणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची केंद्राच्या धर्तीवर एक कक्ष बनवण्याची योजना आहे. केंद्र सरकार इलेक्ट्रॉनिक मीडिया मॉनिटरिंग सेंटरच्या माध्यमातून जवळपास 600 वाहिन्यांवर लक्ष ठेवते. तसेच सोशल मीडिया विंगच्या माध्यमातूनही केंद्र सरकार नकारात्मक मजकुरावर लक्ष ठेऊन असते.
या विशेष सेलसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 1.5 कोटींची विशेष तरतूद केली आहे.
टेलिव्हिजन नेटवर्क अॅक्टचा भंग करणाऱ्या वाहिन्यांवर कारवाई करण्याचा हक्क राज्य सरकारला आहे. त्यासाठी मीडिया मॉनिटरिंग सेंटरची गरज आहे. या सुसज्ज सेलमधून 20 वाहिन्यांवर लक्ष ठेवण्यात येणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement