एक्स्प्लोर

Tejas Thackeray | तेजस ठाकरेंना वडिलांकडून वाढदिवसानिमित्त 'हे' खास गिफ्ट

मुख्यमंत्र्यांचे धाकटे चिरंजीव तेजस ठाकरे यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या वडिलांकडून एक खास गिफ्ट मिळालं आहे.

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे धाकटे चिरंजीव तेजस ठाकरे यांचा काल वाढदिवस झाला, या वाढदिवसाला तेजस ठाकरेंना अनोखं गिफ्ट मिळालं आहे. आपल्या सर्वांनाच माहित आहे की तेजस ठाकरेंना जंगल क्षेत्रात फिरून नवनविन शोध लावण्याची आवड आहे. तेजस महाराष्ट्रासह देश विदेशातल्या जंगलात फिरून संशोधन करत असतात. कधी खेकड्यांच्या तर कधी पालीच्या प्रजातींचा शोध लावत असतात. काही दिवासांपूर्वी तेजसनं महाराष्ट्र शासनाकडे एक प्रस्ताव पाठवला होता. तो म्हणजे, उत्तर पश्चिम घाट संरक्षित क्षेत्रामध्ये अभ्यास करण्यासाठी होता. हा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांनी मंजूर करून तेजसला मोठं गिफ्ट दिलं आहे. वन्यजीव संरक्षण कलम 29 आणि 35 याच्या आधारे संरक्षित क्षेत्रात काम करायचं असेल तर वन्य जीव मंडळाची मान्यता लागते. या अतंर्गत तेजस ठाकरे, अनिकेत मराठे, स्वप्निल पवार, अमृत भोसले यांनी उत्तर पश्चिम घाट संराक्षित क्षेत्रामध्ये जमिनीवरील गोगल गाईचं संशोधन करण्याचा प्रस्ताव केला होता, तो मंजूर करण्यात आला आहे. राज्य वन्यजीव मंडळाची 15वी बैठक मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
Tejas Thackeray | तेजस ठाकरेंना वडिलांकडून वाढदिवसानिमित्त 'हे' खास गिफ्ट
खेकड्यांचा प्रजातींचा शोध 
तेजस हा आपल्यासारखा तोडफोड सेना आहे. अशा भाषेत बाळासाहेब ठाकरेंनी उल्लेख केला होता. पण आदित्य राजकारणात आल्यानंतरही तेजस अजुन राजकारणात आले नाही. कारण त्यांना राजकारणापेक्षा जंगलांमध्ये रमण्यात आवडतं. वाईल्ड लाईफ हा त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. तेजस ठाकरे यांनी जंगलात अभ्यास करताना खेकड्यांच्या आणि पालीच्या अनेक प्रजाती शोधून काढल्या आहेत. एका प्रजातीला त्यांनी ठाकरे कुटुंबियांचे नाव दिलं आहे. गॅटीएना पत्रोपर्पर्रीया, गॅटीएना स्पेंडीटा, गुबरमॅतोरिएना एग्लोकी, गुबरमॅतोरिएना वॅगी आणि भगव्या रंगाचा गुबरमॅतोरिएना थॅकरी अशी या खेकड्यांच्या प्रजातीची नावं आहेत. यातील शेवटचं नाव हे ठाकरे या आडनावावरुन देण्यात आलं आहे.
पालींच्या प्रजातींची शोध खेडकड्यांच्या संशोधनानंतर तेजस ठाकरेंनी पालींच्या विविध जातींचा शोध लावला आहे. कर्नाटकातील सकलेशपूरच्या जंगलात उभ्या खडकांमध्ये या दुर्मिळ प्रजातींच्या पाली आढळून आल्या आहेत. त्यामुळे पश्चिम घाटातील जैवविविधतेत भर पडली आहे. खेकडे, पाली आणि आता गोगलगाईंचा शोध लावण्यासाठी तेजस ठाकरे सज्ज झाले आहेत. त्यांच्यासोबत त्यांची एक टीम असणार आहे. त्यामुळे या दौऱ्यात आता काय शोध लागतोय यांची उत्सुकता वन्य जीव प्रेमींना आहे.
तेजस ठाकरे राजकारणात येणार?  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मंत्री आदित्य ठाकरे हे थेट राजकारणात आल्यावर तेजस ठाकरे राजकारणात कधी येणार अशी चर्चा आहे. आदित्य ठाकरे निवडणूकीच्या रिंगणात उतरले असताना, तेजस ठाकरे हे त्यांच्या प्रचारात सहभागी झालेले दिसले होते. तसेच उद्धव ठाकरे जेव्हा निवडणुकीदरम्यान महाराष्ट्र दौऱ्यावर होते, तेव्हा बऱ्याच वेळा तेजस ठाकरे हे मंचावर दिसले होते. त्यानंतर कधी शिवसेनेच्या शाखेत जाऊन भेटीगाठी घ्यायचे पण सध्यातरी राजकारणात येण्याचा त्याचा मानस नसल्याचं त्यांनी अनेकदा बोलून दाखवलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Manoj Jarange: मनोज जरांगेंनी ऑडिओ क्लिप ऐकवताच शिवसेनेत हालचाली; शिंदेंचे वरिष्ठ शिष्टमंडळ देवेंद्र फडणवीसांची घेणार भेट
मनोज जरांगेंनी ऑडिओ क्लिप ऐकवताच शिवसेनेत हालचाली; शिंदेंचे वरिष्ठ शिष्टमंडळ देवेंद्र फडणवीसांची घेणार भेट
Yuvraj Sambhajiraje Chhatrapati And Donald Tusk Meet: युवराज संभाजीराजे छत्रपती आणि पोलंडचे पंतप्रधान डोनाल्ड टस्क यांची बंगळुरूमध्ये भेट; वळीवडे संग्रहालय प्रकल्पाला गती मिळण्याची अपेक्षा
युवराज संभाजीराजे छत्रपती आणि पोलंडचे पंतप्रधान डोनाल्ड टस्क यांची बंगळुरूमध्ये भेट; वळीवडे संग्रहालय प्रकल्पाला गती मिळण्याची अपेक्षा
Uday Samant On Audio Clip : मनोज जरांगेंचा ऑडिओ बॉम्ब, उदय सामंत म्हणाले, ऑडिओ क्लिप खरी असल्यास भाजपने स्पष्टीकरण द्यावं!
मनोज जरांगेंचा ऑडिओ बॉम्ब, उदय सामंत म्हणाले, ऑडिओ क्लिप खरी असल्यास भाजपने स्पष्टीकरण द्यावं!
Manoj Jarange Audio Clip Marathi News: 500 कोटींचा बॉम्ब, श्रीकांत शिंदेंचं नाव; मनोज जरांगेंनी ऐकवलेल्या ऑडिओ क्लिपमधील आवाज कुणाचे?
500 कोटींचा बॉम्ब, श्रीकांत शिंदेंचं नाव; मनोज जरांगेंनी ऐकवलेल्या ऑडिओ क्लिपमधील आवाज कुणाचे?

व्हिडीओ

Manoj Jarange News : एकनाथ शिंदेंचा कुठला नेता कुठे जातो, कुठे पैसे जातात, हे सगळं माहितीय
Manoj Jarange: 500 कोटींचा बॉम्ब, आता मनोज जरांगेंनी ऐकवली राज्याला हादरवणारी ऑडिओ क्लिप, पाहा संपूर्ण VIDEO
Raj Thackeray News : पुढच्या 2-5 महिन्यात देशात काहीतरी मोठं होईल, छोटा काळा असा येईल देशाला पंतप्रधान नसेल
Shinde vs Fadnavis on Maharashtra CM : मुख्यमंत्रिपदाची भाषा, नव्या संघर्षाची दिशा? Special Report
Manoj Jarange vs Eknath Shinde : 500 कोटींचे दावे,उद्या देणार पुरावे? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune News:
"ते हात घेणारे नाहीत तर लाखोंना देणारे आहेत", पुण्यात शिवसेनेनं लावले फ्लेक्स, मनोज जरांगे पाटलांना टोला
Ramdas Kadam on Manoj Jarange : मनोज जरांगेंच्या ऑडिओ क्लिपमध्ये भाजपची माणसं; चौकशी व्हावी, मराठा समाजाला न्याय देण्याबाबत शिंदेंचं योगदान, रामदास कदमांचा टोन बदलला, म्हणाले 'जरांगे साहेब...'
मनोज जरांगेंच्या ऑडिओ क्लिपमध्ये भाजपची माणसं; चौकशी व्हावी, मराठा समाजाला न्याय देण्याबाबत शिंदेंचं योगदान, रामदास कदमांचा टोन बदलला, म्हणाले 'जरांगे साहेब...'
Gold : दिवाळीपूर्वी सोने खरेदी करावं की दिवाळी नंतर, कधी मिळेल जास्त फायदा? जाणून घ्या
दिवाळीपूर्वी सोने खरेदी करावं की दिवाळी नंतर, कधी मिळेल जास्त फायदा? जाणून घ्या
Vishwajeet Kadam: सांगली जिल्हा बँकेतील समझोता एक्स्प्रेसचा पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीवर होणार का? विश्वजीत कदम नेमकं काय म्हणाले?
सांगली जिल्हा बँकेतील समझोता एक्स्प्रेसचा पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीवर होणार का? विश्वजीत कदम नेमकं काय म्हणाले?
Manoj Jarange: मनोज जरांगेंनी ऑडिओ क्लिप ऐकवताच शिवसेनेत हालचाली; शिंदेंचे वरिष्ठ शिष्टमंडळ देवेंद्र फडणवीसांची घेणार भेट
मनोज जरांगेंनी ऑडिओ क्लिप ऐकवताच शिवसेनेत हालचाली; शिंदेंचे वरिष्ठ शिष्टमंडळ देवेंद्र फडणवीसांची घेणार भेट
Manoj Jarange : काल 500 कोटींचा आरोप, आज ऑडिओ क्लिप ऐकवली; मनोज जरांगे म्हणाले, आता ही लोक कोण? फडणवीस-शिंदेंनी शोधावं!
काल 500 कोटींचा आरोप, आज ऑडिओ क्लिप ऐकवली; मनोज जरांगे म्हणाले, आता ही लोक कोण? फडणवीस-शिंदेंनी शोधावं!
Hasan Mushrif on Gokul: माझ्या मुलाचा पराभव ठरवून केलेलं षड्यंत्र; गोकुळच्या महायुतीचे पॅनल प्रमुख हसन मुश्रीफांचाच नेत्यांवर , तिकडं सतेज पाटलांनी सुद्धा चिमटा काढला
माझ्या मुलाचा पराभव ठरवून केलेलं षड्यंत्र; गोकुळच्या महायुतीचे पॅनल प्रमुख हसन मुश्रीफांचाच नेत्यांवर , तिकडं सतेज पाटलांनी सुद्धा चिमटा काढला
Gokul Election: शशिकांत पाटील चुयेकरांच्या गोकुळ चेअरमनपदावर शिक्कामोर्तब, सतेज पाटलांनी निवडणुकीपूर्वीच केली होती घोषणा
शशिकांत पाटील चुयेकरांच्या गोकुळ चेअरमनपदावर शिक्कामोर्तब, सतेज पाटलांनी निवडणुकीपूर्वीच केली होती घोषणा
Embed widget