एक्स्प्लोर

छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख करणाऱ्या सोनी टीव्हीची दिलगिरी, शिवप्रेमींच्या संतापानंतर जाग

केबीसी या शोमध्ये अमिताभ बच्चन यांनी शिवरायांचा एकेरी उल्लेख केल्यानं सोशल मीडियावर संतापाची लाट उठलीये. केबीसीमध्ये एका प्रश्नासाठी 4 ऑप्शन दिले जातात, यावेळी शिवरायांच्या नावासमोर छत्रपती किंवा महाराज असा उल्लेखही करण्यात आलेला नव्हता, शिवाय अमिताभ बच्चन यांनीही तसा आदरार्थी उल्लेख केला नाही.

मुंबई : कौन बनेगा करोडपती'चा 11 वा सीजन वादात अडकला आहे. केबीसीमध्ये विचारण्यात आलेल्या एका प्रश्नामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख करण्यात आला. सोशल मीडियातून केबीसी आणि सोनी टीव्हीवर पूर्णपणे बहिष्कार टाकण्याची मागणी नेटिझन्सकडून केली जात असताना अखेर आपली चूक मान्य करत सोनी टीव्हीने वादावर पडदा टाकला आहे. केबीसी या शोमध्ये अमिताभ बच्चन यांनी शिवराजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्यानं सोशल मीडियावर संतापाची लाट उठली होती. यावर आता सोनी टीव्हीने ट्विट करत  माफी मागितली आहे. बुधवारी प्रसारित झालेल्या केबीसीच्या भागात छत्रपती शिवाजी महाराजांचा संदर्भ देताना अनावधानानं त्यांच्या नावाचा उल्लेख एकेरी शब्दात झाला. अनावधानानं प्रेक्षकांच्या भावना दुखवल्याबद्दल आम्ही प्रेक्षकांची माफी मागतो असं वाहिनीनं आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. सोनी टीव्हीच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरून व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. कालच्या एपिसोडमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संदर्भात अनावधानानं जी चूक झाली त्याबद्दल आम्ही प्रेक्षकांची माफी मागतो, असा माफीचा स्क्रोल येणाऱ्या एपिसोडमध्ये चालवला आहे. केबीसी या शोमध्ये अमिताभ बच्चन यांनी शिवरायांचा एकेरी उल्लेख केल्यानं सोशल मीडियावर संतापाची लाट उठलीये. केबीसीमध्ये एका प्रश्नासाठी 4 ऑप्शन दिले जातात, यावेळी शिवरायांच्या नावासमोर छत्रपती किंवा महाराज असा उल्लेखही करण्यात आलेला नव्हता, शिवाय अमिताभ बच्चन यांनीही तसा आदरार्थी उल्लेख केला नाही. त्यामुळे सोशल मीडियावर अमिताभ बच्चनविरोधात टीकेची झोड उठली आहे. तसंच बायकॉट केबीसी, बायकॉट सोनी टीव्ही असे हॅशटॅगही ट्रेंड होत आहे. सोनी टीव्हीने जाहीर माफी मागितली असली मात्र अमिताभ बच्चन यांनी या संदर्भात मौन बाळगणे पसंत केले आहे. KBC | ‘केबीसी 11’मध्ये शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख, बिग बींवर सोशल मीडियातून टीका | ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Supriya Sule : गडकरी चांगले, देवाभाऊ दोन पक्ष फोडून पास झाले, सुप्रिया सुळेंचा फडणवीसांना टोला; म्हणाल्या,'तुमसे ये उम्मीद नहीं थी'
गडकरी चांगले, देवाभाऊ दोन पक्ष फोडून पास झाले, सुप्रिया सुळेंचा फडणवीसांना टोला; म्हणाल्या,'तुमसे ये उम्मीद नहीं थी'
Uddhav  Thackeray on Dhananjay Mahadik : धमकी देतोस की काय? मुन्ना, तुझा हात जागेववर ठेवणार नाही मी! उद्धव ठाकरेंचा धनजंय महाडिकांवर सोलापुरातही हल्लाबोल
धमकी देतोस की काय? मुन्ना, तुझा हात जागेववर ठेवणार नाही मी! उद्धव ठाकरेंचा धनजंय महाडिकांवर सोलापुरातही हल्लाबोल
Sunil Tingre: 'पोर्शे प्रकरणातील ती दोन माणसं आमदाराच्या जवळची...', सरोदेंचा सुनील टिंगरेंवर हल्लाबोल, पोलीस स्टेशला गेल्याबाबत केला उलट सवाल
'पोर्शे प्रकरणातील ती दोन माणसं आमदाराच्या जवळची...', सरोदेंचा सुनील टिंगरेंवर हल्लाबोल, पोलीस स्टेशला गेल्याबाबत केला उलट सवाल
Radhanagari Vidhan Sabha : मुदाळ तिट्ट्याला आमदार प्रकाश आबिटकरांच्या पोस्टरची फाडाफाडी; आबिटकर म्हणाले, फलक फाडाल पण जनतेच्या मनातून फाडू शकणार नाही!
मुदाळ तिट्ट्याला आमदार प्रकाश आबिटकरांच्या पोस्टरची फाडाफाडी; आबिटकर म्हणाले, फलक फाडाल पण जनतेच्या मनातून फाडू शकणार नाही!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sunil Kedar Vs Aashish Jaiswal : जैस्वालांना धडा शिकवण्यासाठी बंडखोरी - केदारABP Majha Headlines :  12 PM : 14 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सCity 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा :11 AM :14 नोव्हेंबर  2024 :  ABP MajhaSanjay Raut Full PC : राज ठाकरेंकडे फारसं लक्ष देण्याची गरज नाही - राऊत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Supriya Sule : गडकरी चांगले, देवाभाऊ दोन पक्ष फोडून पास झाले, सुप्रिया सुळेंचा फडणवीसांना टोला; म्हणाल्या,'तुमसे ये उम्मीद नहीं थी'
गडकरी चांगले, देवाभाऊ दोन पक्ष फोडून पास झाले, सुप्रिया सुळेंचा फडणवीसांना टोला; म्हणाल्या,'तुमसे ये उम्मीद नहीं थी'
Uddhav  Thackeray on Dhananjay Mahadik : धमकी देतोस की काय? मुन्ना, तुझा हात जागेववर ठेवणार नाही मी! उद्धव ठाकरेंचा धनजंय महाडिकांवर सोलापुरातही हल्लाबोल
धमकी देतोस की काय? मुन्ना, तुझा हात जागेववर ठेवणार नाही मी! उद्धव ठाकरेंचा धनजंय महाडिकांवर सोलापुरातही हल्लाबोल
Sunil Tingre: 'पोर्शे प्रकरणातील ती दोन माणसं आमदाराच्या जवळची...', सरोदेंचा सुनील टिंगरेंवर हल्लाबोल, पोलीस स्टेशला गेल्याबाबत केला उलट सवाल
'पोर्शे प्रकरणातील ती दोन माणसं आमदाराच्या जवळची...', सरोदेंचा सुनील टिंगरेंवर हल्लाबोल, पोलीस स्टेशला गेल्याबाबत केला उलट सवाल
Radhanagari Vidhan Sabha : मुदाळ तिट्ट्याला आमदार प्रकाश आबिटकरांच्या पोस्टरची फाडाफाडी; आबिटकर म्हणाले, फलक फाडाल पण जनतेच्या मनातून फाडू शकणार नाही!
मुदाळ तिट्ट्याला आमदार प्रकाश आबिटकरांच्या पोस्टरची फाडाफाडी; आबिटकर म्हणाले, फलक फाडाल पण जनतेच्या मनातून फाडू शकणार नाही!
Ajit Pawar on Supriya Sule : भाऊबीजला सुद्धा गेला नाही, सुप्रिया सुळेंशी संपर्क करता की नाही? अजितदादा म्हणाले, 'तेव्हा मी सांगितले होते की..'
भाऊबीजला सुद्धा गेला नाही, सुप्रिया सुळेंशी संपर्क करता की नाही? अजितदादा म्हणाले, 'तेव्हा मी सांगितले होते की..'
Rupali Chakankar : हॉटेलमध्ये दीड हजारांची टीप देणाऱ्यांना पैशांची किंमत काय कळणार? रुपाली चाकणकरांचा सुप्रिया सुळेंवर हल्लाबोल
हॉटेलमध्ये दीड हजारांची टीप देणाऱ्यांना पैशांची किंमत काय कळणार? रुपाली चाकणकरांचा सुप्रिया सुळेंवर हल्लाबोल
Maharashtra Assembly Election 2024 : शिवतीर्थावर 17 नोव्हेंबरला राज की उद्धव? कुणाची तोफ धडाडणार? समोर आली मोठी अपडेट
शिवतीर्थावर 17 नोव्हेंबरला राज की उद्धव? कुणाची तोफ धडाडणार? समोर आली मोठी अपडेट
Harishchandra Chavan : निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजपसाठी वाईट बातमी, दिंडोरीचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचे निधन
निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजपसाठी वाईट बातमी, दिंडोरीचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचे निधन
Embed widget