एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
सोनई हत्याकांडातील सहाही दोषींना फाशी
दोषींना प्रत्येकी 20 हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. हा दंड दोषींकडून वसूल केल्यानंतर, त्यातील 10 हजार रुपयांची रक्कम पीडितांच्या कुटुंबीयांना दिली जाईल.
नाशिक : अहमदनगरमधील सोनई हत्याकांडातील सहाही दोषींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. नाशिक सत्र न्यायालायाने निर्णय दिला.
दोषींना प्रत्येकी 20 हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. हा दंड दोषींकडून वसूल केल्यानंतर, त्यातील 10 हजार रुपयांची रक्कम पीडितांच्या कुटुंबीयांना दिली जाईल.
दोषी आरोपींनी सचिन सोहनलाल घारु (वय 23), संदीप राजू धनवार (वय 24) आणि राहुल कंडारे (वय 26) या सोनईतील गणेशवाडीत राहणाऱ्या तिघांची हत्या केली होती.
सोनई हत्याकांडातील एकूण 7 आरोपींपैकी 6 जणांना नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने दोषी ठरवलं होतं. 1 जानेवारी 2013 रोजी अहमदनगरमधील सोनई या गावी प्रेमप्रकरणातून 3 जणांची हत्या करण्यात आली होती.
कुणा-कुणाला फाशी?
- प्रकाश विश्वनाथ दरंदले
- रमेश विश्वनाथ दरंदले
- पोपट विश्वनाथ दरंदले
- गणेश पोपट दरंदले
- अशोक नवगिरे
- संदीप कुऱ्हे
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
ठाणे
महाराष्ट्र
Advertisement