मुंबई : सतत कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे काही ट्रेन्स रद्द करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. त्यामुळे आज आणि उद्या मुंबईत येणाऱ्या आणि जाणाऱ्या ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे रद्द करण्यात आलेल्या ट्रेनच्या प्रवाशांचे उद्या हाल होण्याची शक्यता आहे.
पावसामुळे मध्य रेल्वेची वाहतूक मुंबईत 10-15 मिनिटे उशिराने होती. तर हार्बर लाईनवरही हीच परिस्थिती होती. मात्र पावसातही वाहतूक सुरळीत सुरु राहिली. शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आल्यामुळे आज दिवसभर 80 टक्के लोकल सेवेत होत्या, अशी माहिती मध्य रेल्वेने दिली.
मुंबईसह ठाणे-कल्याण आणि वसई-विरार परिसरांना मंगळवारपासून मुसळधार पावसाने झोडपलं आहे. त्यामुळे लोकलसह रस्ते वाहतुकीवरही परिणाम झाला.
मुंबईत मंगळवारी दुपारपासून सुरु झालेल्या पावसानं रात्री उसंत घेतली होती. मात्र पहाटेपासूनच पावसाने पुन्हा जोर धरला. मुंबईतल्या पावसामुळे हिंदमाता, दादर, परेल, कुर्ला परिसरात पाणी भरलं. त्याचप्रमाणे वांद्रे, अंधेरी भागातही पाणी साचायला सुरुवात झाली.
रद्द करण्यात आलेल्या ट्रेन