सिंधुदुर्ग : काँग्रेस नेते नारायण राणे उद्या (गुरुवार) पत्रकार परिषद घेऊन काँग्रेसला सोडचिठ्ठी देण्याची शक्यता आहे. अडीच वाजता कणकवलीमध्ये ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे.

नारायण राणे एकटेच काँग्रेसमधून बाहेर पडणार असल्याची माहिती आहे. त्यांचे पुत्र आणि काँग्रेसचे आमदार नितेश राणे आणि आमदार कालिदास कोळंबकर काँग्रेसचा राजीनामा देणार नाहीत.

विशेष म्हणजे नितेश राणे हे उद्याच्या पत्रकार परिषदेलाही उपस्थितीत नसतील. ते आजच मुंबईसाठी रवाना झाले आहेत. काँग्रेसकडून शिस्तभंगाची कारवाई होऊ शकते. त्यामुळे तर नितेश राणेंनी कणकवलीतून काढता पाय घेतला नाही ना अशी चर्चा सुरु आहे.

सुत्रांच्या माहितीनुसार, राज्यमंत्रिमंडळाचा विस्तार येत्या 5 किंवा 6 तारखेला अपेक्षित आहे. त्याआधी ते भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. राणे नवीन पक्षा स्थापन करण्याची शक्यता त्यांच्या निकटवर्तियांनी फेटाळून लावली आहे.

संबंधित बातम्या :

भाजपच्या साथीने नारायण राणे नवा पक्ष काढणार?


VIDEO : मला शिवसेनेकडूनही ऑफर, पण मी जाणार नाही : राणे


निलेश राणेंना अडीच लाख मतांनी हरवू: विनायक राऊत


...तोपर्यंत दाढी काढणार नाही : निलेश राणे


राणेंच्या ऐतिहासिक घोषणेला घटस्थापनेचा मुहूर्त!