एक्स्प्लोर
औरंगाबादमधील खड्डयांमुळे सैन्यदलाचा जवान गंभीर जखमी

औरगाबाद : औरंगाबाद शहरात जागोजागी पडलेले खड्डे वाहतुकीचा वेग मंदावण्याबरोबरच अनेक दुर्देवी अपघातांचे कारण ठरत आहेत. रविवारी आभादेव जाधव हे भारतीय सैन्यदलातील जवान रस्त्यातील खड्ड्यांमुळे गंभीर जखमी झाले. सध्या अरुणाचल प्रदेशमध्ये नियुक्तीवर असलेले आभादेव जाधव दुचाकीवरुन रेल्वे स्थानकाच्या दिशेने जात असताना रस्त्यातील खड्ड्यांमुळे त्यांच्या दुचाकीला अपघात झाला. यामध्ये आभादेव यांच्या डोक्याला गंभीर मार लागला असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान, पाच दिवसांपूर्वी औरंगाबाद शहरातील खड्ड्यांच्या प्रश्नावरुन महापालिकेची सर्वसाधारण सभा झाली. यामध्ये नगरसेवकांनी रस्त्यांच्या दुरावस्थेसाठी पालिका अधिकाऱ्यांना जबाबदार धरले. पालिका अधिकाऱ्यांना काही नगरसेवकांनी अपशब्द वापरल्याने अधिकाऱ्यांनी बैठकीवर बहिष्कार टाकला. नगरसेवक आणि अधिकाऱ्यांमधील वादामुळे खडड्यांचा प्रश्न मात्र तसाच राहिला.
Before You Go
Sanjay Raut Vs Devendra Fadnavis Special Report : राऊतांनी डिवचलं, बावनकुळे, फडणवीसांना शुभेच्छा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र






















