एक्स्प्लोर

सोलापूर विद्यापीठाच्या ऑनलाईन परीक्षांच्या वेबसाईटचे सर्व्हर क्रॅश, 6 ते 8 ऑक्टोबर रोजीच्या परीक्षा पुढे ढकलल्या

6, 7 आणि 8 ऑक्टोबर रोजी ज्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने होणार होत्या त्या सर्व परीक्षा 21, 22 आणि 23 ऑक्टोबर रोजी होणार आहेत.

सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या ऑनलाइन परीक्षेत दुसऱ्या दिवशी देखील विद्यार्थ्यांना तांत्रिक अडचणींना सामोरं जावं लागलं. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी विद्यापीठातर्फे ऑनलाइन परीक्षांचे नियोजन करण्यात आले आहे. ज्याची सुरुवात कालपासून झाली आहे. मात्र पहिल्या दिवशी अनेक विद्यार्थ्यांना तांत्रिक अडचणींना सामोरं जावं लागलं. त्यामुळे वेगवेगळ्या विद्यार्थी संघटनांनी याबाबत विद्यापीठ प्रशासनातकडे निवेदन देखील दिले होते. मात्र दुसऱ्या दिवशी देखील तांत्रिक अडचण यांची समस्या कायम राहिली.

सकाळी अकरा वाजताची वेळ असताना सर्व्हर डाऊन असल्या कारणाने चार वाजता लॉगिन करण्यात यावेत अशी सूचना वेबसाइटवर दिसत होती. मात्र चार वाजल्यानंतर देखील तीच समस्या विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा पाहायला मिळाली. तांत्रिक अडचणीमुळे जे विद्यार्थी परीक्षा देऊ शकले नाही त्यांच्या मनात संभ्रमावस्था निर्माण होत होती. वायरस अटॅक झाल्याने विद्यापीठाच्या परीक्षांच्या वेबसाईचे सर्व्हर क्रॅश झाले. त्यामुळे आज नियोजित एकही ऑनलाईन परीक्षा होऊ शकल्या नाहीत. तर उद्या आणि परवा (7 आणि 8 ऑक्टोबर) रोजीच्या परीक्षा देखील तांत्रिक कारणामुळे पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

6, 7 आणि 8 ऑक्टोबर रोजी ज्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने होणार होत्या त्या सर्व परीक्षा 21, 22 आणि 23 ऑक्टोबर रोजी होणार आहेत. तर एकाच वेळी सर्व्हरवर लोड येत असल्याने व्यावसायिक अभ्यासक्रम (इंजिनिअरिंग, फार्मसी, आर्किटेक्चर) परीक्षांची वेळ बदलण्यात आली आहे. सकाळी 11.30 ते 4.30 ऐवजी दुपारी 3 ते रात्री 9 वाजेपर्यंत या अभ्यासक्रमाच्या परीक्षा होणार आहेत. तर 9 ऑक्टोबरपासून ऑफलाईन आणि ऑनलाईन परीक्षा या पूर्व नियोजित वेळापत्रकाप्रमाणे होणार असल्याची माहिती परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाचे संचालक श्रेणीक शाह यांनी पत्राद्वारे कळवले आहे.

ऑनलाईन परीक्षा देताना विद्यार्थ्यांना आलेल्या अडचणी

  1.  व्हायरस अटॅकमुळे सर्व्हर क्रॅश झाला, विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यासाठी लॉगीन करता आले नाही.
  2. वेबसाईट वर जास्त ट्रॅफिक असल्याने पेज ओपन होत नव्हते.
  3. लॉगीन झाल्यानंतर परीक्षेची वेळ सुरु झाल्यानंतरही प्रश्नपत्रिका दिसत नव्हती.
  4. परीक्षा सुरु असताना सर्व्हर डाऊन झाल्यामुळे पेज हँग झालं, काऊंडाऊन मात्र सुरुच राहीलं
  5. वेबसाईटवर वारंवार एरर येत होते. रिफ्रेश केल्यास परिक्षा संपल्याचा मेसेज दिसत होता.
  6. विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठाने जाहीर केलेल्या हेल्पलाईनमधील नंबर लागत नसल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला.
  7. ऑनलाईन परीक्षांच्या गोंधळावरुन एनएसयुआय आक्रमक

ऑनलाईन परीक्षा देताना येणाऱ्या अडचणींमुळे एटीकेटी आणि बॅकलॉग असलेल्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा पुढे ढकलण्यात यावेत, या मागणीसाठी एनएसयुआयतर्फे निवेदन देण्यासाठी कार्यकर्ते दुपारी विद्यार्थी विद्यापीठात पोहोचले. मात्र यावेळी परीक्षा विभागाचे संचलाक हे कार्यालयात नसल्याने संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले. याचा निषेध म्हणून कार्यकर्त्यांनी परीक्षा नियंत्रकांच्या कार्यालयाला कुलूप लावलं. तांत्रिक अडचणीमुळे विद्यार्थ्यांना नुकसान होण्याची शक्यता आहे, याला सर्वस्वी जबाबदार कुलगुरू असून राज्यपाल देखील यामध्ये हस्तक्षेप करत नसल्याची टीका एनएसयुआय संघटनेचे जिल्हाध्यक्ष गणेश डोंगरे यांनी यावेळी केली.

संबंधित बातम्या :

सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षांना आजपासून सुरुवात, पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना तांत्रिक अडचणी

#FinalYearExam मुंबई विद्यापीठाच्या अंतिम वर्ष परीक्षेत तांत्रिक अडचणी, कलिनामध्ये विद्यार्थी-पालकांचा जोरदार गोंधळ

आफताब शेख हे एबीपी माझा वृत्त वाहिनीत सिनिअर करस्पॉन्डट म्हणून कार्यरत आहेत. मागील 9 वर्षांपासून एबीपी माझाच्या माध्यमातून कार्यरत असून आपल्या संवेदनशील आणि निष्पक्ष पत्रकारितेने त्यांनी स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. 3 जुलै 2017 रोजी मुंबई येथील एबीपी माझाच्या मुख्य कार्यालयातून त्यांनी पत्रकारितेच्या प्रवासाला सुरुवात केली. फेब्रुवारी 2019 पासून ते सोलापूर येथे सिनिअर करस्पॉन्डन्ट म्हणून कार्यरत आहेत. सध्या ते सोलापूर श्रमिक पत्रकार संघाचे सरचिटणीस म्हणूनही जबाबदारी सांभाळत आहेत.

सोलापूरच्या राजकीय घडामोडींपासून सामाजिक, शैक्षणिक, प्रशासकीय, औद्योगिक, मनोरंजन, क्रीडा आणि व्यावसायिक क्षेत्रांतील महत्त्वाच्या विषयांना त्यांनी एबीपी माझाच्या माध्यमातून राज्यस्तरीय व्यासपीठ मिळवून दिले आहे. ‘कामगारांचे शहर‘ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोलापूरमधील कामगारांचे प्रश्न, सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या आणि उपेक्षित घटकांचा आवाज शासनदरबारी पोहोचवण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न राहिला आहे. बहुभाषिक आणि समृद्ध सांस्कृतिक वारसा लाभलेल्या सोलापूरचा इतिहास, परंपरा आणि वर्तमानही त्यांनी आपल्या वार्तांकनातून प्रभावीपणे मांडले आहे. कोरोना काळात कोविड वॉर्डमध्ये प्रत्यक्ष जाऊन रुग्णांच्या व्यथा आणि आरोग्य व्यवस्थेतील वास्तव समोर आणला तर महापूर-दुष्काळातील रिपोर्ट्समधून त्यांनी आपल्या संवेदनशील पत्रकारितेचा प्रत्यय दिला. सोलापूरसह मुंबई, पुणे, धाराशिव, लातूर, बीड, नांदेड आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांतही त्यांनी वार्तांकन केले आहे.

त्यांनी सोलापूरच्या दयानंद कला व शास्त्र महाविद्यालयातून कला शाखेची पदवी, तर मुंबई विद्यापीठातून मास्टर ऑफ मास कम्युनिकेशन अँड जर्नलिझम ही पदव्युत्तर पदवी प्राप्त केली आहे. पत्रकारितेसोबतच सामाजिक कार्याचीही त्यांना विशेष आवड आहे. महाविद्यालयीन जीवनातील सामाजिक योगदानासाठी 2016 मध्ये तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते त्यांना इंदिरा गांधी राष्ट्रीय सेवा योजना पुरस्काराने (Indira Gandhi NSS Award-2016) सन्मानित करण्यात आले. याशिवाय, पत्रकारितेतील योगदानासाठी त्यांना विविध संस्था आणि संघटनांकडून अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.
 

Read More

महत्त्वाच्या बातम्या

Gokul Chairman Election 2026: गोकुळवर आज महायुतीचा अध्यक्ष; पण कोर्टाचा निकाल विरोधात गेल्यास काय?; हसन मुश्रीफांनी पुढचा प्लॅन सांगितला!
गोकुळवर आज महायुतीचा अध्यक्ष; पण कोर्टाचा निकाल विरोधात गेल्यास काय?; हसन मुश्रीफांनी पुढचा प्लॅन सांगितला!
मोठी बातमी : गोकुळमध्ये मोठा ट्विस्ट, राजेश पाटील वर्षभरासाठीच अध्यक्ष, धनंजय महाडिकांनी फॉर्म्युला सांगितला!
मोठी बातमी : गोकुळमध्ये मोठा ट्विस्ट, राजेश पाटील वर्षभरासाठीच अध्यक्ष, धनंजय महाडिकांनी फॉर्म्युला सांगितला!
Satej Patil and Chandrakant Patil: अरे बंटी, तू कधी साहेब झालाच नाही, दादा तुटून पडले, गोकुळ चौकात चंद्रकांत पाटलांनी सतेज पाटलांची औकात काढली
अरे बंटी, तू कधी साहेब झालाच नाही, दादा तुटून पडले, गोकुळ चौकात चंद्रकांत पाटलांनी सतेज पाटलांची औकात काढली
Maharashtra Live blog updates: गोकुळचा निकाल लागला, राजन पाटील हे चेअरमन झाले - मंत्री हसन मुश्रीफ
Maharashtra Live blog updates: गोकुळचा निकाल लागला, राजन पाटील हे चेअरमन झाले - मंत्री हसन मुश्रीफ

व्हिडीओ

Hasan Mushrif speech Gokul : ... ती बंटी पाटलांची शेवटची सभासमजा, 13 संचालकांना इशारा
Gokul Chairman Rajesh Patil: हसन मुश्रीफ भाषणाला उभे राहताच महायुतीचा उमेदवार जिंकला; गोकुळमध्ये काय घडलं?
Gokul Chairman Election 2026: गोकुळमध्ये शासननियुक्त 4 संचालक पोहोचले तेव्हा...काय घडलं?, VIDEO
Vivekanand Patil Gokul Morcha Speech : कोरमचं कौतुक सांगू नका, गोकुळ मोर्चातील धमाल भाषण
Varsha Usgaonkar Majha Katta: कॉलेजचे किस्से ते सिनेमातील प्रवास,वर्षा उसगांवकरांसोबत दिलखुलास गप्पा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gokul Chairman Election 2026: गोकुळच्या अध्यक्षपदी अजित पवारांचा 'राईट हँड' राजेश पाटील यांची निवड; महायुतीने अखेर कंडका पाडलाच, नेमकं काय काय घडलं?, A टू Z माहिती
गोकुळच्या अध्यक्षपदी अजित पवारांचा 'राईट हँड' राजेश पाटील यांची निवड; महायुतीने अखेर कंडका पाडलाच, नेमकं काय काय घडलं?, A टू Z माहिती
Gokul Chairman Election 2026: गोकुळवर आज महायुतीचा अध्यक्ष; पण कोर्टाचा निकाल विरोधात गेल्यास काय?; हसन मुश्रीफांनी पुढचा प्लॅन सांगितला!
गोकुळवर आज महायुतीचा अध्यक्ष; पण कोर्टाचा निकाल विरोधात गेल्यास काय?; हसन मुश्रीफांनी पुढचा प्लॅन सांगितला!
मोठी बातमी : गोकुळमध्ये मोठा ट्विस्ट, राजेश पाटील वर्षभरासाठीच अध्यक्ष, धनंजय महाडिकांनी फॉर्म्युला सांगितला!
मोठी बातमी : गोकुळमध्ये मोठा ट्विस्ट, राजेश पाटील वर्षभरासाठीच अध्यक्ष, धनंजय महाडिकांनी फॉर्म्युला सांगितला!
Satej Patil and Chandrakant Patil: अरे बंटी, तू कधी साहेब झालाच नाही, दादा तुटून पडले, गोकुळ चौकात चंद्रकांत पाटलांनी सतेज पाटलांची औकात काढली
अरे बंटी, तू कधी साहेब झालाच नाही, दादा तुटून पडले, गोकुळ चौकात चंद्रकांत पाटलांनी सतेज पाटलांची औकात काढली
UP Car Accident: दिवाळीसाठी निघाले, एक चूक आणि सगळे जिवंत जळाले; कार अपघातामध्ये 6 मित्रांचा मृत्यू, संपूर्ण गाव सुन्न!
दिवाळीसाठी निघाले, एक चूक आणि सगळे जिवंत जळाले; कार अपघातामध्ये 6 मित्रांचा मृत्यू, संपूर्ण गाव सुन्न!
Ajit Pawar family Visit Memorial: दिवाळी पाडव्याला सुनेत्रा वहिनी मुलं-सुनांसोबत अजितदादांच्या स्मृतीस्थळावर पोहोचल्या; कायनात दारा, ऋतुजा पवारांनी वाहिली श्रद्धांजली, दादांच्या बहिणीला अश्रू अनावर
सुनेत्रा वहिनी मुलं-सुनांसोबत अजितदादांच्या स्मृतीस्थळावर पोहोचल्या; कायनात दारा, ऋतुजा पवारांनी वाहिली श्रद्धांजली, दादांच्या बहिणीला अश्रू अनावर
Gokul Chairman Election Mahayuti: गोकुळच्या अध्यक्षपदाची वाटणी होणार, महायुतीचा संभाव्य फॉर्म्युला समोर; कोणत्या पक्षाचा पहिला अध्यक्ष होणार?
गोकुळच्या अध्यक्षपदाची वाटणी होणार, महायुतीचा संभाव्य फॉर्म्युला समोर; कोणत्या पक्षाचा पहिला अध्यक्ष होणार?
Gokul Chairman Election 2026: गोकुळ दूध संघावरील शासननियुक्त 4 संचालकांची नावं समोर; सरकारने कुणाकुणाची निवड केली?, पाहा यादी!
गोकुळ दूध संघावरील शासननियुक्त 4 संचालकांची नावं समोर; सरकारने कुणाकुणाची निवड केली?, पाहा यादी!
Embed widget